सागर भस्मे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील लेखातून आपण महाराष्ट्रातील ऊर्जा साधनसंपत्तीबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्तीबाबत जाणून घेऊया. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती बेसॉल्ट खडकाच्या बाह्य क्षेत्रात रुपांतरित व स्फटिकयुक्त खडकामध्ये आढळते. बेसॉल्ट खडक हा दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतिपूर्व भाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो. देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ३.९ टक्के आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळापैकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रफळात खनिजसंपत्ती सापडते. महाराष्ट्रात मुख्य पूर्व विदर्भ, कोकण व दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात खनिज संपत्ती आढळते. यामध्ये पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर व यवतमाळ तर कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : महाराष्ट्रातील ऊर्जा साधनसंपत्ती
महाराष्ट्रात आर्कियन खडक प्रणालीमध्ये प्रामुख्याने लोह खनिज आढळते. आर्कियन खडक प्रणाली प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळते. धारवाड खडक प्रणालीमध्ये मॅग्नीज आढळत असून ही खडक प्रणाली प्रामुख्याने नागपूर, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळते. कडप्पा खड़क प्रणालीमध्ये चुनखडी किंवा मार्बल आढळत असून ही खडक प्रणाली प्रामुख्याने चंद्रपूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यात आढळते. गोंडवाना खडक प्रणालीमध्ये प्रामुख्याने कोळसा आढळतो. ही खड़क प्रणाली प्रामुख्याने चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अमरावती व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळते. कोकणातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात जांभा खडक प्रणाली आढळते आणि या खडक प्रणालीमध्ये बॉक्साईट आढळते.
लोह खनिज
देशातील २०१७ लोह खनिजाचे साठे महाराष्ट्रात आहेत. भारतातील एकूण लोह खनिज साठ्यांपैकी २० टक्के लोह खनिज महाराष्ट्रात आढळते. उत्तम प्रकारचे लोह खनिज धारवाड संघाच्या खडकाशी निगडित आहे. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये टॅकोनाईट आणि कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सातारा या जिल्ह्यांमध्ये जांभा खडकात लोह खनिज आढळते. पूर्व विदर्भातील लोह खनिजाचे प्रमाण अधिक असून एकूण महाराष्ट्राच्या ६० ते ७० टक्के आहे. महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे प्रमाण चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सर्वाधिक आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगावचा प्रदेश भागात उच्च प्रतीच लोह खनिजाचे साठे आढळतात.
चंद्रपूर जिल्ह्यात राजूर, ब्रह्मपुरी व चिमूर तालुक्यात लोह खनिजाचे साठे आढळतात, तर गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड, भामरागढ़, देऊळगाव, दमकोट, पडवी आणि ऐरापल्ली या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आढळतात. गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्यात लोह खनिजाचे साठे आढळतात. कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी व राधानगरी या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आढळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला, सावंतवाडी, रेड्डी या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आढळतात.
मॅग्नीज
भारतात आढळणाऱ्या एकूण मॅग्नीज साठ्यांपैकी ४० टक्के साठा एकट्या महाराष्ट्रात असून देशातील जवळपास २० टक्के मॅग्नीजचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. मॅग्नीजचे हे खनिज अग्निजन्य खडकातील गोंडाईट मालेतील मिलोमिलोन या मुख्य खडकात आढळते. मॅग्नीजचे प्रमुख साठे भंडारा व नागपूर या दोन जिल्ह्यांमध्ये आहेत. भंडारा जिल्ह्यात तुमसर, डोंगरी, सितासांगवी व चिखला या ठिकाणी मॅग्नीज आढळते, तर नागपूर जिल्ह्यात सावनेर, कादरी, रामडोगरी, गुमगाव, कन्हान, पेंच व खापा या ठिकाणी मॅॅग्नीज आढळते. कन्हान व तुमसर या ठिकाणी फेरो मॅग्नीज बनवण्याची संयंत्रे उभारण्यात आलेली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी मॅग्नीज आढळते. तसेच, कणकवली तालुक्यात फोंडा येथे मॅग्नीज साठे आहेत.
चुनखडी
महाराष्ट्रात चुनखडीचे चार हजार दशलक्ष टन इतके साठे असून ते विविध प्रकारच्या वैज्ञानिक समूहात आढळतात. यवतमाळमध्ये महाराष्ट्रातील चुनखडीचे सर्वात जास्त साठे आढळतात. यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विध्ययन खडकांत चुनखडीचे साठे आहेत; तर नांदेड, नागपूर, धुळे, नंदुरबार, पुणे, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा व रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये आंतरट्रॉपी थरामध्ये चुनखडीचे साठे आहेत. प्रामुख्याने राजूर स्टेशन, वणी, मांजरी येथे चुनखडीचे साठे आढळतात. नागपूर जिल्ह्यात रामटेक व सावनेर येथे साठे आढळतात. गडचिरोली जिल्ह्यात देवलमारी, काटेपल्ली येथे साठे आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात वरोडा, राजुरा, नांदगाव व बलारपूर तालुक्यात चुनखडीचे साठे आढळतात.
हेही वाचा – UPSC-MPSC : भूगोल : पृथ्वीच्या अंतरंगांची रचना
डोलोमाईट
डोलोमाईटच्या एकूण उत्पन्नापैकी ९० टक्के उत्पादन लोह पोलाद निर्मितीसाठी तर उर्वरित खत कारखान्यामध्ये वापरले जाते. महाराष्ट्रात डोलोमाईट हे खनिज विध्ययन खडकात आढळते. महाराष्ट्रामध्ये यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये डोलोमाईटचे साठे आहेत.
बॉक्साईट
महाराष्ट्रात बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने जांभा खडकात आढळतात. भारतातील सुमारे २१ टक्के बॉक्साईटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वेकरून अल्युमिनिअम निर्मितीसाठी केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडी, राधानगरी या ठिकाणी बॉक्साईटचे साठे आढळतात. रायगड जिल्ह्यात मुरुड, रोहा, श्रीवर्धन या ठिकाणी बॉक्साईटचे साठे आढळतात. ठाणे जिल्ह्यात सालसेट बेट आणि तुंगार टेकड्यांच्या प्रदेशात बॉक्साईटचे साठे आढळतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगढ़ व सणापूर या ठिकाणी बॉक्साईटचे साठे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाटाच्या परिसरात वेंगुर्ला व सावंतवाडी या ठिकाणी बॉक्साईटचे साठे आहेत. सांगली जिल्ह्यात बत्तीस शिराळा या ठिकाणी बॉक्साईटचे साठे आढळतात. मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरिवली, जोगेश्वरी व गोरेगाव या ठिकाणी बॉक्साईटचे साठे आढळतात.
क्रोमाईट
भारतातील एकूण साठ्यांपैकी सुमारे दहा टक्के क्रोमाईटचा साठा महाराष्ट्रात आहे. किमती खड्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग आणि रसायन उद्योगामध्ये क्रोमाईटचा उपयोग होतो. भंडारा जिल्ह्यात मौनी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, जानोली आणि बागदा तसेच नागपूर जिल्ह्यात टाका येथे क्रोमाईट आढळते. तसेच, गोंदिया व रत्नागिरी जिल्ह्यातही क्रोमाईट आढळते.
कायनाईट व सिलीमनाईट
भारताच्या कायनाईटच्या एकूण उत्पादनापैकी १५ टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. हिऱ्यांना पैलू पाडणे, काच उद्योग व वीज उपकरणात याचा उपयोग होतो. महाराष्ट्रात भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात हे साठे आढळतात.