Modern Indian History In Marathi : मागील लेखामधून आपण मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेल्या हैदराबाद आणि कर्नाटक राज्यांविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण अवध ( अयोध्या ) आणि बंगाल विषयी जाणून घेऊया. हैदराबाद आणि कर्नाटकप्रमाणेच बंगाल आणि अवध ( अयोध्या ) ही सुद्धा वारसा राज्ये होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघल साम्राज्याचा उत्तरार्ध – भाग ३

अवध (अयोध्या )

अवधची स्थापना सादत खान याने केली होती. त्यालाच बुरहान उल मुल्क या नावानेही ओळखलं जात. सादत खान हा उत्तम प्रशासक आणि मुघल साम्राज्यातील अतिशय धाडसी सुभेदार होता. त्याला मुघल बादशाहाने इ.स. १७२२ साली अवधच्या सुभेदारपदी नियुक्त केले. मात्र, मुघल बादशाहा महम्मदशहाची चंचल वृत्ती बघून त्याने स्वत:ला मुघल साम्राज्यापासून अगल करत अवधची स्थापना केली. दरम्यानच्या काळात त्याने जमीनदारांचे अनेक उठाव मोडीत काढले. मात्र, इ.स. १७३९ मध्ये नादिरशहाच्या भीतीने त्याने आत्महत्या केली.

सादत खानच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या सफदरजंग अवधचा नवाब बनला. इ.स. १७४८ मध्ये त्याची मुघल साम्राज्याच्या वजीरपदी नियुक्ती झाली. तसेच त्याला अलाहाबादची जाहगिरदारी देण्यात आली. पुढे इ.स. १७५४ मध्ये सफदरजंगचा मृत्यू झाला. त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अवधमध्ये शांतता होती.

पुढे इ.स. १८५६ ब्रिटिशांनी अवधचा बंगालमध्ये विलय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अवधच्या नवाबवर प्रशासन चालवण्यास अपयशी ठरल्याचा आरोप केला. त्यावेळी वाजिद अलीशा हा अवधचा नवाब होता. तोच अवधचा शेवटचा नवाब ठरला.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग १

बंगाल

इ.स. १७०० मध्ये मुघल बादशाहा औरंगजेबने मुर्शिद कुली खान याची बंगालच्या दिवाणपदी नियुक्ती केली. तेव्हापासूनच मुर्शिद कुली खानने बंगालवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, इ.स. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत त्याने बंगालवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले होते. पुढे हाच मुर्शिद कुली खान इ.स. १७१७ मध्ये बंगालचा सुभेदारही बनला. सुभेदार बनल्यानंतर त्याने संपूर्ण बंगालवर आपले नियंत्रम मिळवले आणि मुघलांपासून अगल होत स्वतंत्र बंगालची स्थापना केली. आपल्या कार्यकाळ्यात त्याने बंगालमध्ये शांतता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक उठाव मोडीत काढले. दरम्यान, इ.स. १७२७ मध्ये त्याचा मृत्यू झाला.