Indian Modern History : मागील लेखातून आपण १८५७ च्या उठावामागील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व लष्करी कारणे; तसेच १८५७ पूर्वी झालेले उठाव, १८५७ च्या उठावाची सुरुवात आणि वाटचाल याबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण १८५७ चा उठाव अपयशी ठरण्याची कारणे कोणती? याबाबत जाणून घेऊ या….

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : १८५७ चा उठाव भाग-३

Devendra Fadnavis first reaction on nagpur audi car hit and run case
संकेत बावनकुळेची वैद्यकीय चाचणी करणे का टाळले ?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Support for science and development through two new policies
दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…
Facebook
Facebook Logo : फेसबूकने लोगो अचानक का बदलला? मेटानं दिलं स्पष्टीकरण! ॲप अपडेट करण्याचं सर्वांना आवाहन, नेमकं कारण काय?
Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
Use of force against rape is justified says Madras High Court
‘बलात्काराविरोधात बळाचा वापर समर्थनीयच…’
Loksatta vyaktivedh Army Chief General Sundararajan Padmanabhan Terrorist attack army
व्यक्तिवेध: जनरल (नि.) एस. पद्मानाभन
Secular civil code
चतु:सूत्र : समान नागरी कायदा आणि संविधान सभा

१८५७ चा उठाव अपयशी ठरण्याची कारणे पुढीलप्रमाणे :

१) केंद्रीय नेतृत्वाचा अभाव

१८५७ चा उठावाला योग्य आणि केंद्रीय नेतृत्व न मिळणे, हे उठाव अपयशी ठरण्यामागचे महत्त्वाचे कारण होते. याच्या उलट ब्रिटिशांचे नेतृत्व एका अत्यंत अनुभवी व्यक्तीकडे होते. नानासाहेब, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी परस्परांना सहकार्य केले; मात्र त्यांच्यातून सर्वमान्य नेतृत्व तयार होऊ शकले नाही.

२) आधुनिक शस्त्रांची कमतरता

आधुनिक शस्त्रांची कमी हेसुद्धा १८५७ चा उठाव अपयशी ठरण्याचे महत्त्वाचे कारण होते. या उठावदरम्यान भारतीयांनी पारंपरिक शस्त्रांचा वापर केला. याउलट ब्रिटिशांकडे बंदुका, तोफा यांसारखी एकापेक्षा एक सरस आधुनिक शस्त्रे होती.

३) उठावाचे क्षेत्र मर्यादित असणे

१८५७ च्या उठावाचे क्षेत्र मर्यादित होते. या उठावाचे मुख्य केंद्र उत्तर भारत होते. तसेच हा उठाव उत्तर आणि मध्य भारतातील काही क्षेत्रांपर्यंतच मर्यादित होता. दक्षिण, पश्चिम व पूर्व भारतात हा उठाव पसरूच शकला नाही. त्यामुळे ब्रिटिशांना उठाव दडपून टाकण्यात यश मिळाले.

४) सुशिक्षित युवकांचा पाठिंबा न मिळणे

या उठावाला सुशिक्षित युवकांचा पाठिंबा न मिळणे, हेसुद्धा हा उठाव अपयशी ठरण्यामागचे एक महत्त्वाचे कारण होते. ब्रिटिशांद्वारे ज्या प्रकारच्या कायदेशीर सुधारणा (सती प्रथाविरोधी कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा) करण्यात येत होत्या; त्या योग्य आहेत, अशी या युवकांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी या उठावात सहभागच घेतला नाही.

५) एकाच ध्येयाचा अभाव

१८५७ च्या उठावावेळी राष्ट्र ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती, त्यामुळे हा उठाव एका राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित झालेला नव्हता. या उठावात भाग घेणाऱ्या प्रत्येकाचा स्वत:चा स्वार्थ होता. नानासाहेबांना स्वत:चे निवृत्तिवेतन हवे होते; तर झाशीची राणी व हजरत महल यांना स्वत:चे राज्य हवे होते. तसेच बहादूरशहा जफर याला बादशाही निर्माण करायची होती.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : १८५७ चा उठाव भाग-२

६) नियोजनाचा अभाव

१८५७ च्या उठावाचे योग्य प्रकारे नियोजन न करणे हेसुद्धा हा उठाव अपयशी ठरण्यामागचे महत्त्वाचे कारण होते. कोणी कुठे उठाव करावा, नेमके काय करावे, हा उठाव यशस्वी झाल्यास पुढची वाटचाल कशी असेल, याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. काही इतिहासकारांच्या मते- ३१ मार्च ही उठावाची तारीख निश्चित करण्यात आली होती; मात्र, त्यापूर्वीच या उठावाला सुरुवात झाली.

७) ब्रिटिशांकडून दळणवळणाच्या साधनांचा वापर

दळणवळणांच्या साधनांमुळे १८५७ चा उठाव दडपण्यात ब्रिटिशांना यश आले. या उठावात रेल्वे, पोस्ट, रस्ते यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तारयंत्राद्वारे ब्रिटिशांना बंडांची माहिती मिळत होती. तसेच रेल्वेद्वारे ते त्या ठिकाणी सैनिकांना पाठवू शकत होते. त्यामुळे १८५७ चा उठाव अपयशी ठरण्यामागे हेसुद्धा एक महत्त्वाचे कारण होते.