मागील लेखातून आपण १८५७ चा उठाव आणि त्यामागील राजकीय व आर्थिक कारणांबाबत माहिती घेतली. या लेखातून आपण १८५७ च्या उठावामागील प्रशासकीय, सामाजिक-सांस्कृतिक व धार्मिक कारणांबाबत जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१८५७ च्या उठावामागील प्रशासकीय कारण

ब्रिटिशांनी १७५७ ते १८५७ या १०० वर्षांच्या भारतात काळात सिव्हिल सेवा, पोलिस सेवा व रेल्वे यांसारख्या अनेक प्रशासकीय सुधारणा केल्या. मात्र, काही वर्षांतच या व्यवस्थांमध्ये भ्रष्टाचार फोफावला. अशातच सिव्हिल सेवेने शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण झाला.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : १८५७ चा उठाव भाग – १

सामाजिक-सांस्कृतिक कारण

भारतीयांच्या सामाजिक जीवनात बदल करण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी १७५७ ते १८५७ या काळात अनेक कायदे पारित केले. त्यामध्ये सतीप्रथाविरोधी कायदा, विधवा पुनर्विवाह संमती कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा यांसह अनेक कायद्यांचा समावेश होता. मात्र, हे कायदे आपला धर्म आणि संस्कृती संपवण्याचे षडयंत्र आहे, अशी भारतीयांची धारणा झाली. शिवाय ब्रिटिशांनी १९५० मध्ये जातिभेदाविरोधातही कायदा पारित केला. तसेच त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी देशभरात ख्रिश्चन मिशनरीही सुरू केल्या. याबरोबरच ब्रिटिशांकडून मिळणाऱ्या तुच्छतेच्या वागणुकीमुळे भारतातील समाजात असंतोष निर्माण झाला. १८५७ च्या उठावाला हा असंतोषही कारणीभूत ठरला.

धार्मिक कारण

१८ व्या शतकात अनेक ख्रिश्चन धर्मप्रसारक भारतात येऊ लागले. त्यांनी भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रचार सुरू केला. त्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मिशनरींची स्थापना केली. ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना त्या काळी वडिलोपार्जित संपत्तीचा अधिकार मिळत असे; तसेच ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना सरकारी नोकरीत समाविष्ट केले जाई, याबरोबर कैद्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास त्यांची शिक्षा रद्द केली जात असे. ब्रिटिशांनी अनेक हिंदू आणि मुस्लिम मशिदींची वतनेही काढून घेतली. त्यामुळे भारतीय समाजात धार्मिक असंतोषही वाढीस लागला, हेदेखील १८५७ च्या उठावामागील महत्त्वाचे कारण होते.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग ८

लष्करी कारण

ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकांना मिळणाऱ्या अयोग्य वागणुकीमुळे सैनिकांमध्ये नाराजी होती. सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून भारतीय सैनिकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असे. ब्रिटिशांनी लष्करी कायदे पारित करीत भारतीय सैनिकांवर अनेक निर्बंध लादले. त्यांना गंध न लावणे, दाढी करणे सक्तीचे केले. तसेच या भारतीय सैनिकांना ब्रिटिश सैनिकांपेक्षा पगारही कमी दिला जाई. त्यामुळे या सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. हाच असंतोष १८५७ च्या उठावाचे तत्कालीन कारणही ठरला.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc modern indian history revolt of 1857 socio cultural and religious reasons part 2 spb