Modern Indian History In Marathi : मागील लेखामधून आपण मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेल्या अवध आणि बंगाल राज्याच्या निर्मितीविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण बंगालमधील नवाब आणि ब्रिटिशांमधील संघर्ष, बक्सरचे युद्ध आणि अहालाबादच्या तहाबाबत जाणून घेऊ या.

मुर्शिद कुली खानच्या मृत्यूनंतर त्याचा जावई शुजाउद्दीन याने इ.स. १७३९ पर्यंत बंगालवर राज्य केले. शुजाउद्दीननंतर त्याचा मुलगा सरफराज खान बंगालचा नवाब बनला. मात्र, एका वर्षाच्या आत बिहारचा नायब सुभेदार अलीवर्दी खान याने सरफराजची हत्या करीत स्वत:ला बंगालचा नवाब म्हणून घोषित केले. पुढे इ.स. १७५६ मध्ये सिराजउद्दौला बंगालचा नवाब बनला. सिराजउद्दौला हा कर्तृत्ववान नवाब होता. मात्र, आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी त्याला म्हणावा तसा वेळच मिळाला नाही. दरम्यानच्या काळात ब्रिटिशांना बंगालमध्ये मुक्त व्यापार करण्याचे अधिकार मिळाले होते. तसेच त्यांनी फोर्ट विल्यमची ( कलकत्ता ) घेराबंदी करण्यास सुरुवात केली होती. मात्र, सिराजउद्दौलाने नवाब बनताच ही घेराबंदी रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच फोर्ट विल्यमची जागा ही ईस्ट इंडिया कंपनीची नसून नवाबांची असल्याचे स्पष्ट केले. याबरोबरच त्याने कलकत्त्याचे नामांतर करीत ‘अलीनगर’ असे केले. याच संघर्षातून पुढे सिराजउद्दौला आणि ब्रिटिशांमध्ये युद्ध झाले. इतिहासात या युद्धाला ‘प्लासीचे युद्ध’ म्हणून ओळखले जाते. या युद्धात सिराजउद्दौलाचा पराभव झाला. त्यानंतर ब्रिटिशांनी बंगालवर नियंत्रण मिळवत सिराजउद्दौलाचा सेनापती मीर जाफरला बंगालचा नवाब म्हणून घोषित केले. इ.स. १७५७ ते १७६० पर्यंत तो बंगालचा नवाब होता.

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
NIA Raids on suspicion of links with Jaish e Mohammed terror outfit Mumbai news
एनआयएचे ८ राज्यांमध्ये १९ ठिकाणी छापे; राज्यातील अमरावती, संभाजी नगर व भिवंडीचा समावेश
proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
article 370 jammu and kashmir
संविधानभान : पूल, भिंत की बोगदा?
India Alliance News
INDIA Alliance : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम
article 370 jammu kashmir loksatta news
संविधानभान : अनुच्छेद ३७० मध्ये नेमके काय होते?
kalyan session and district court verdict on mandir masjid issue at durgadi fort
कल्याणमधील दुर्गाडी किल्ला शासनाच्या मालकीचा; न्यायालयाने मुस्लिम संघटनेचा दावा फेटाळला

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग २

इ.स. १७५७ मध्ये बंगालचा नवाब बनल्यानंतर मीर जाफर आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात अनेक कारणांवरून मतभेद सुरू झाले. १७६० पर्यंत हे मतभेद इतके वाढले की ब्रिटिशांनी मीर जाफरला नवाब पदावरून दूर करीत त्याचा जावई मीर कासीमला बंगालचा नवाब बनवले. मात्र, बंगालचा नवाब बनताच मीर कासीमने ईस्ट इंडिया कंपनीवरच नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम त्याने आपली राजधानी मुर्शिदाबादवरून मुंगेरला हलवली. तसेच त्यानी बंदूक आणि तोफनिर्मितीचा कारखानाही सुरू केला. शिवाय ब्रिटिशांकडून होणाऱ्या दस्तकच्या ( मुक्त व्यापार करण्याचा परवाना) गैरवापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याने स्थानिक व्यापारांनाही मुक्त व्यापार करण्याचे अधिकार दिले. याबरोबरच त्याने सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी जर्मन अधिकारी वाल्टर याची नियुक्ती केली.

या निर्णयांमुळे मीर कासीम आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला. याच तणावातून पुढे ब्रिटिश आणि मीर कासीम यांच्यात चार युद्धे झाली. या युद्धात ब्रिटिशांचा विजय झाला. दरम्यानच्या काळात आणखी एक महत्त्वपूर्ण घटना घडली. मीर कासीमने सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी जर्मन अधिकाऱ्याची नियुक्ती केल्यानंतर नाराज झालेल्या ब्रिटिशांनी एलिस या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली १४८ सैनिकांची तुकडी मीर कासीमविरोधात पाठवली. मात्र, मीर कासीमने एलिससह १४८ सैनिकांना बंदी बनवले आणि त्यांची हत्या केली. त्या घटनेला इतिहासात ‘पटना हत्याकांड’ या नावाने ओळखले जाते.

ब्रिटिशांविरोधात झालेल्या पराभवानंतर मीर कासीमने अवधच्या नवाबाकडे आश्रय घेतला आणि त्याला ब्रिटिशांविरोधात युद्ध करण्यासाठी राजी केले. त्या वेळी शुजाउद्दौला अवधचा नवाब होता. विशेष म्हणजे जो व्यक्ती अवधचा नवाब असायचा तोच व्यक्ती मुघल साम्राज्याचा वजीर असे. या काळात शुजाउद्दौला आणि मुघल बादशहा शाहआलम द्वितीय यांचेही ब्रिटिशांबरोबर असलेले संबंध तणावपूर्ण होते. त्यामुळे दोघेही ब्रिटिशांविरोधात एकत्र आले. पुढे इ.स. १७६४ त्यांच्यात बक्सर येथे युद्ध झाले. या युद्धाला ‘बक्सरचे युद्ध’ म्हणून ओळखले जाते. या युद्धात ब्रिटिशांनी मीर कासीम, शुजाउद्दौला आणि मुघल बादशहा शाहआलम द्वितीय यांचा पराभव केला. इ.स. १७६४ मध्ये झालेले बक्सरचे युद्ध हे इतिहासातील महत्त्वाच्या युद्धांपैकी एक मानले जाते. कारण या युद्धानंतरच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी एक राजकीय शक्ती म्हणून उदयास आली.

हेही वाचा – UPSC-MPSC : आधुनिक भारताचा इतिहास : मुघलांच्या पतनानंतर उदयास आलेली राज्ये – भाग १

दरम्यान, बक्सरच्या युद्धातील विजयानंतर ब्रिटिशांनी मुघल बादशहा शाहआलम द्वितीय आणि अवधचा नवाब शुजाउद्दौला यांच्याशी दोन वेगवेगळे तह केले. या तहांना ‘अलाहाबादचा तह’ या नावाने ओळखले जाते. यापैकी पहिला तह मुघल बादशहा शाहआलम द्वितीय आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यात १२ ऑगस्ट १७६४ रोजी झाला. या तहानुसार ब्रिटिशांना बंगाल, बिहार आणि उदिशाचे दिवाणी अधिकार मिळाले. तसेच ब्रिटिशांनी मुघल बादशहाला २६ लक्ष रुपये वार्षिक पेन्शन देण्याचे कबूल केले. तर दुसरा तह ईस्ट इंडिया कंपनी आणि अवधचा नवाब शुजाउद्दौला यांच्यात १६ ऑगस्ट १७६४ रोजी झाला. या तहानुसार ब्रिटिशांनी अवधच्या नवाबाकडून ५० लक्ष रुपयांचा दंड वसूल केला. तसेच अवधमध्ये व्यापार करण्याचे अधिकार प्राप्त केले.

Story img Loader