मागील लेखातून आपण चंपारण सत्याग्रह नेमका काय होता? तसेच त्याची वैशिष्ट्ये आणि परिणामांबाबत माहिती घेतली. या लेखातून खेडा सत्याग्रहाविषयी जाणून घेऊ. खेडा सत्याग्रह हा भारतातील महात्मा गांधींच्या सत्याग्रहांपैकी तिसरा सत्याग्रह होता. हा सत्याग्रह गुजरातमधील खेडा या ठिकाणी करण्यात आला. त्यामुळे तो ‘खेडा सत्याग्रह’ म्हणून ओळखला जातो. खेडा सत्याग्रह हा ब्रिटिश सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात उभारलेला अहिंसात्मक लढा होता.

हेही वाचा – UPSC-MPSC : चंपारण सत्याग्रह नेमका काय होता? त्याची वैशिष्ट्ये अन् परिणाम

Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Baramati Assembly Constituency Assembly Election 2024 Ajit Pawar Yugendra Pawar print politics news
लक्षवेधी लढत: बारामती : बारामती कोणत्या पवारांची?
Ramesh Chennithala
Ramesh Chennithala : “हरियाणाच्या निवडणुकीतून खूप शिकायला मिळालं, त्यामुळे ८० टक्के बंडखोरांनी…”, रमेश चेन्निथला यांचं महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत मोठं भाष्य
Chandrashekhar Bawankule fb
Chandrashekhar Bawankule : अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र

पार्श्वभूमी आणि कारणे

१९१८ मध्ये गुजरातमधील खेडा जि्ल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला होता. या दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. परिणामत: शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. तसेच या दरम्यानच्या काळात प्लेग आणि कॉलराची साथही पसरली होती. त्यामुळे हजारो जण मृत्युमुखी पडले होते. खेडा येथील शेतकरी संकटात होते. अशा परिस्थितीतही ब्रिटिश सरकारने शेतसाऱ्याची रक्कम २३ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आधीच संकटात असलेला शेतकरी आणखी आर्थिक संकटात सापडला. खेडामधील स्थानिक नेत्यांनीही सरकारच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला. मात्र, ब्रिटिश सरकार काहीही एक ऐकायला तयार नव्हते. अखेर मोहनलाल पांडे नावाच्या नेत्याने गांधीजींना खेडा येथे येऊन शेतकऱ्यांचा लढ्याचे नेतृत्व करण्याची मागणी केली.

खेडा सत्याग्रह नेमका काय होता?

ज्यावेळी खेडा येथील शेतकरी ब्रिटिशांविरोधात आंदोलन करीत होते, त्यावेळी गांधीजी अहमदाबाद येथे गिरणी कामगारांचा लढा लढत होते. गिरणी कामगारांचा संप संपताच गांधींनी खेडा येथे पोहोचून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गांधींच्या मार्गदर्शनाखाली वल्लभभाई पटेल, शंकरलाल बनकर, महादेव देसाई आणि इतरांसारख्या अनेक नेत्यांनी सर्वप्रथम ब्रिटिश सरकारला शेतसाऱ्याची रक्कम कमी करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. मात्र, ब्रिटिश सरकारने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे गांधींनी सरकारविरोधात सत्याग्रह सुरू केला. जोपर्यंत शेतसाऱ्याची रक्कम कमी होत नाही तोपर्यंत कोणताही शेतकरी शेतसारा भरणार नाही, अशी विनंती त्यांनी केली. त्यानुसार हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला. अखेर गांधींच्या चळवळीची दखल घेत ब्रिटिश सरकारने दुष्काळी कालखंडामध्ये जमीन महसूलवसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन शांततापूर्ण आणि यशस्वी झाले.

हेही वाचा – UPSC-MPSC : मुस्लीम लीगची स्थापना का करण्यात आली? त्यामागे नेमका उद्देश काय होता?

खेडा सत्याग्रहाचे परिणाम

  • ब्रिटिश सरकारने १९१८-१९१९ दुष्काळी वर्षातील शेतसारा वसुलीला स्थगिती दिली.
  • जे शेतकरी शेतसारा भरू शकतात, त्यांनीच तो भरावा, असा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला.
  • त्याशिवाय शेतसाऱ्याची रक्कम २३ टक्क्यांनी वाढवण्याचा जो निर्णय घेण्यात आला होता, तोसुद्धा रद्द करण्यात आला.
  • या आंदोलनादरम्यान ज्या शेतकऱ्यांची जमीन जप्त करण्यात आली होती, ती जमीन शेतकऱ्यांना परत करण्यात आली.