प्रा. ज्ञानेश्वर जाधव

सामान्य अध्ययन पेपर २ या विषयात आपल्याला जे घटक अभ्यासायचे आहेत, त्यातील भारतीय संविधान, राज्यकारभार आणि गव्हर्नन्स या घटकांत आपल्याला व्यवस्थित विभागणी करता येत नाही. याचे कारण हे तीनही घटक परस्परांवर अवलंबून आहेत, तसेच त्यांचा संबंध गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे सरकार (गव्हर्मेंट) आणि शासन व्यवहार (गव्हर्नन्स) या दोन्ही शब्दांत नेहमी गफलत होते. अनेकदा तर हे दोन्ही शब्द परस्परांसाठी वापरले जातात. यामुळे अनेकदा त्या विधानाचे दोन वेगवेगळे अर्थ निघण्याचीदेखील शक्यता संभवते. त्यामुळे गव्हर्नन्स या घटकाचा अभ्यास करताना आपण सुरुवातीलाच गव्हर्मेंट आणि गव्हर्नन्स यात नेमका काय फरक आहे, याचा ऊहापोह करणार आहोत.

हेही वाचा – UPSC-MPSC : वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे भूरूपे कशी तयार होतात?

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Ashok Uike, Vasant Purke
राळेगावमध्ये भाजपचा अतिआत्मविश्वास काँग्रेसच्या पथ्यावर ! दोन माजी मंत्र्यांमध्ये थेट लढत
Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Priyanka Gandhi Kolhapur, Priyanka Gandhi criticizes Narendra Modi, Priyanka Gandhi,
सत्ता, पैशाचा गैरवापर करत मोदींकडून महाराष्ट्रात सरकार – प्रियांका गांधी
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका

सरकार या संकल्पनेत मुख्यतः शासन व्यवस्थेची संरचना, नियम आणि राज्य यांचे मध्यवर्ती स्थान आहे. राज्य समाजासाठी काय करू शकते, या अंगाने सरकार ही यंत्रणा कार्य करत असते; तर शासन व्यवहार या संकल्पनेत समाजाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. समाजातील विविध घटक शासन संरचनेचा कसा उपयोग करतात आणि त्यातून समाजाला जास्तीत जास्त लाभ कसा मिळवता येईल, याचा गव्हर्नन्स या संकल्पनेत विचार केला जातो.

गव्हर्नन्स या संकल्पनेत उत्तरदायित्व, प्रतिसादात्मकता, पारदर्शकता, स्थिरता, कायद्याचे अधिराज्य, समता आणि सर्वसमावेशकता प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच्या प्रक्रिया आणि संरचनेचा समावेश होतो. त्यासोबतच गव्हर्नन्स या संकल्पनेत मूल्य, तत्व आणि व्यवस्थेचे नियम यांचादेखील अंतर्भाव होतो. या संरचनेअंतर्गत नागरिक आणि विविध भागधारक यांचा आपसातील सुसंवाद, तसेच सार्वजनिक व्यवहारात सक्रिय सहभाग अंतर्भूत आहे. या विविध भागधारकांत स्वयंसेवी संस्था, नागरी समाज, संशोधन संस्था, वित्तीय संस्था, शैक्षणिक संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, माध्यमे, सहकारी संस्था इत्यादींचा समावेश होतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : वाऱ्याच्या निक्षेपणामुळे भूरूपांची निर्मिती कशी होते?

सरकार आणि शासन व्यवहार यांच्यातील सहसंबंध

शासन ही एक अशी संरचना आहे, जी शासन व्यवहारास सहाय्य करते; तर शासन व्यवहार ही अशी प्रक्रिया आहे, ज्या अंतर्गत वेगवेगळे घटक लोक कल्याणासाठी कार्य करत असतात. तर सरकार ही एक अशी यंत्रणा आहे, ज्याच्या अंतर्गत राज्याची सत्ता चालवली जाते. जिच्यात कार्यपालिका, कायदेमंडळ आणि न्यायपालिकेचा समावेश होतो. त्याचवेळी शासन व्यवहारांतर्गत मात्र सरकार व सरकारच्या बाहेरील संस्थांचा अंतर्भाव होतो, ज्यामध्ये नागरी समाज, गैर सरकारी संस्था इत्यादींचा समावेश होतो. सरकार या यंत्रणेत एका ठराविक चौकटीमध्ये सुसंवाद स्थापन होऊन कार्य पार पाडले जाते; तर शासन व्यवहार ही संकल्पना सरकारचे कार्यक्षेत्र वाढवून तिच्या सेवा पुरवठ्याच्या संरचनेला सक्षम करते.

शासन व्यवहाराचे विविध घटक

शासन व्यवहाराच्या घटकांना मुख्यतः दोन भागात विभागता येते. त्यातील पहिला भाग हा सत्ता आणि अधिसत्ता यांच्या अंमलबजावणीशी संबंधित आहे, तर दुसरा भाग हा सरकारचे निहित कर्तव्य पार पाडण्याच्या क्षमता आणि कौशल्य यांच्याशी निगडित आहे.

शासन व्यवहाराच्या सत्ता आणि अधिसत्ता अंमलबजावणीशी संबंधित घटकात पुढील बाबींचा समावेश होतो. जसे की देशांतर्गत अधिसत्ता अमलात आणताना कोणत्या प्रकारच्या प्रक्रिया आणि संस्थांचा वापर केला जातो. तसेच सरकार कसे निवडले जाते, त्यावर अंकुश कसा ठेवला जातो व सरकारला उत्तरदायी ठरवण्यासाठी नेमकी कोणती यंत्रणा कार्य करते, याचा समावेश होतो. सामाजिक जीवनावर प्रभाव टाकणारे घटक तसेच आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या निर्णयांवर नागरी समाज, स्वयंसेवी संस्था कशा प्रकारे प्रभाव टाकतात, याचा अंतर्भाव या घटकांतर्गत होतो. मूल्य, धोरण आणि संस्थात्मक संरचना यांच्या व्यवस्थात्मक ढाच्याचा उपयोग राज्य, नागरी समाज आणि खासगी क्षेत्राच्या सुसंवादात कशा प्रकारे केला जातो, याचादेखील समावेश या घटकात होतो.

शासन व्यवहाराच्या सरकारचे निहित कर्तव्य पार पाडण्याच्या क्षमता आणि कौशल्याशी निगडित घटकांत, सरकारची संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याची क्षमता तसेच योग्य धोरण निर्मिती आणि अंमलबजावणीचे कौशल्य यांचा समावेश होतो. या घटकात सरकारची गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, जलद न्याय प्रदान करण्याची व्यवस्था निर्माण करणे, सुसज्ज आरोग्य यंत्रणा स्थापित करण्याच्या क्षमतेचादेखील आढावा घेतला जातो.

हेही वाचा – UPSC-MPSC : हिमनदीच्या निक्षेपणातून भूरूपाची निर्मिती कशी होते?

शासन व्यवहाराचे विविध आयाम

शासन व्यवहारास राजकीय, कायदा व न्यायप्रक्रिया, प्रशासकीय, आर्थिक व सामाजिक आणि पर्यावरणीय अश्या पाच आयामांमध्ये विभाजित करण्यात येते. यातील प्रत्येक आयामावर आपण आता चर्चा करणार आहोत.

शासन व्यवहाराच्या राजकीय आयामात राजकीय संवादाची गुणवत्ता, लोकप्रतिनिधींच्या वैयक्तिक आणि संस्थात्मक अभिव्यक्तीची पातळी, राजकीय अधिसत्तेचा विधायक आणि घटनाबाह्य वापर, सत्तेचे विकेंद्रीकरण, नागरिकांचा राजकीय संरचनेतील विश्वास आणि एकंदरीत सामाजिक संरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा समावेश होतो. या आयामात नागरिकांचे राजकीय जीवन, तसेच संस्थात्मक राजकीय व्यवस्थेचा नागरिकांच्या एकंदरीत विकासावर होणारा परिणाम यासंदर्भात मांडणी करण्यात येते. यातून समाजाचे राजकीय चर्चाविश्व आपल्या दृष्टिक्षेपात येते.

शासन व्यवहाराच्या कायदा व न्यायप्रक्रिया या आयामात, राज्य आपले अधिकार हे निर्धारित सीमारेषेत पार पाडत आहे का, तसेच राज्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची क्षमता आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठीचे राज्याचे कार्य यांचा समावेश होतो. या आयामात कायदा व सुव्यवस्था, अंतर्गत सुरक्षा, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण, पोलीस प्रशासन आणि नागरिक स्नेही पोलीस यंत्रणा, न्यायदान व्यवस्थेपर्यंतची नागरिकांची पोच आणि न्यायदान व्यवस्थेच्या उत्तरदायित्वाचादेखील समावेश होतो.

आपण सर्व, ज्या प्रशासनात जाण्यासाठी या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहात, अशा प्रशासनाच्या बाबतीत शासन व्यवहाराचा नेमका आयाम काय आहे, ते देखील या ठिकाणी बघणे अगत्याचे आहे. प्रशासनाची सेवा पुरवठा कार्यक्षमता, भ्रष्टाचार विरोधी कारवाया, संस्थात्मक पारदर्शकता, यंत्रणेची उत्तरदायित्वाची भावना; तसेच सेवा पुरवठ्याची कामगिरी या संदर्भात चिकित्सक मांडणी या आयामात केली जाते. या आयामात शासन व्यवहारातील नागरिकांचा सहभाग, त्यांच्याशी साधण्यात येणारा संवाद, आर्थिक तसेच मानवी संसाधनांचे सरकार पातळीवरील व्यवस्थापन, मूलभूत सेवा पुरवठ्यांतील वक्तशीरपणा, भ्रष्टाचार विषयी दृष्टिकोन व दक्षता यांचीदेखील चर्चा केली जाते.

शासन व्यवहाराच्या आर्थिक आयामात शासनाचे वित्तीय गव्हर्नन्स, उद्योगस्नेही भूमिका आणि प्राथमिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग यांचा समावेश होता. ज्या अंतर्गत देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी सरकारचे कर्तव्य, गुंतवणूक वृद्धीसाठीचे धोरणात्मक निर्णय इत्यादी बाबींचा समावेश होतो. शासन व्यवहाराच्या सामाजिक आयामाच्या संदर्भात समाजातील वंचित दुर्बल घटकांच्या संरक्षणाची सरकारची क्षमता आणि कार्यप्रणाली, नागरी समाज आणि माध्यमांमधील वंचित दुर्बल घटकांचे स्थान, तसेच त्यांच्या न्याय हक्कांसाठी निर्माण करण्यात आलेली संरचना याचा समावेश होतो.

शेवटचा आणि सध्याच्या काळातील सर्वात महत्त्वाचा शासन व्यवहाराचा आयाम म्हणजेच पर्यावरणीय व्यवस्थापन. या अंतर्गत प्रदूषणाचे मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर होणारे विपरीत परिणाम, त्या संदर्भात शासकीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात येणाऱ्या उपाय योजना आणि नागरिकांना या उपाय योजनात असलेले स्थान; या सर्वांचा ऊहापोह करण्यात येतो. पर्यावरणीय अरिष्टांना सामोरे जाताना सर्वसमावेशक भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरी समाज, सरकार आणि नागरिक यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न महत्त्वाचे ठरतात.