विक्रांत भोसले

विद्यार्थी मित्रांनो, मागील लेखामध्ये आपण  CSAT ची मागणी आणि परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे अभ्यासक्रमाच्या घटकांनुसार विश्लेषण केले होते. ते करत असताना आपण हे पाहिले होते की, उताऱ्यावरील आकलन क्षमता या घटकावर सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसेच इंग्रजी भाषेच्या आकलनाची किमान क्षमता निर्माण करणे ही या पेपरची प्राथमिक आणि मुख्य मागणी आहे. आज आपण या दोन्हीही मुद्दय़ांवर चर्चा करणार आहोत.

Success Story: झोपडीत राहिले, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला; अनेक अडथळ्यांवर मात करून झाले डीएसपी
Success Story: झोपडीत राहिले, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला; अनेक अडथळ्यांवर मात करून झाले डीएसपी
Western railway recruitment 2024
Western Railway मध्ये नोकरीची सर्वात मोठी संधी! पाच…
elephant census
UPSC Key : यूपीएससी सूत्र : भारतातील हत्ती गणना होणारा विलंब अन् नामिबियामध्ये ७०० प्राण्यांच्या कत्तलीचे आदेश, वाचा सविस्तर…
success story of Diganta Das owner of Daily Fresh Food
Success Story : शून्यातून शिखरापर्यंत…! कामगार ते स्वतःचा ब्रँड; वाचा पराठ्यांचा व्यवसाय सुरू करणाऱ्या दास यांचा प्रवास
CRPF Constable Recruitment 2024 CRPF is conducting the recruitment process for 11541 posts
सीआरपीएफमध्ये दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही तगडा, जाणून घ्या पात्रता
kerala Childhood friends start halwa business
Success Story: बालपणीच्या मित्रांनी सुरू केला हलवा विकण्याचा व्यवसाय; एका वर्षात कमावले लाखो रुपये
father son pilot loksatta article
चौकट मोडताना: सर्व करूनही अलिप्त
new india assurance company marathi news
नोकरीची संधी: न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेडमधील संधी
BMC Bharati 2024 BMC MCGM Recruitment
BMC Bharti 2024: मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! दर महिना ९२ हजारापर्यंत पगार; ‘कोण’ करु शकतं अर्ज

इंग्रजी भाषेचे आकलन सुधारण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे परीक्षेला काही महिने शिल्लक असताना या घटकाची तयारी सुरू करणे. याचे कारण बऱ्याच उमेदवारांना इंग्रजी वाचताना आपल्याला सर्व काही अचूक समजत आहे असेच वाटते. यालाच आपण ‘Illusion of Knowledge’ असे म्हणतो. ही बाब लवकर लक्षात येत नाही आणि जेव्हा ती लक्षात येते तेव्हा परीक्षा जवळ येऊन ठेपलेली असते. म्हणूनच या घटकावर सर्वात आधीपासून काम सुरू करावयास हवे.

दर्जेदार इंग्रजी साहित्याचे नियमित आणि सजगतेने वाचन करणे हा इंग्रजी भाषेचे आकलन वाढवण्याचा उत्तम मार्ग आहे. पण हे करत असताना एक चांगला इंग्रजी शब्दकोश आणि इंग्रजी व्याकरण पुस्तक सतत संदर्भासाठी वापरावे. तरच असे वाचन आकलन क्षमता वाढवण्यास फायदेशीर ठरेल. मोबाइलमध्ये असणाऱ्या शब्दकोशाचा वापर टाळावा, कारण त्यामध्ये उजळणीसाठी काहीच पर्याय असत नाही. आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या आणि तुम्हाला परिचित नसलेल्या शब्दांची तसेच दररोजच्या वाचनात येणाऱ्या शब्दांची नियमित सूची करण्याची सवय विद्यार्थ्यांनी लावणे आवश्यक आहे. या सूचीमध्ये शब्दांचे अर्थ लिहू नयेत. या ऐवजी ते अर्थ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. दर दोन दिवसांनी या शब्दांची उजळणी करावी आणि त्यातील किती शब्दांचे अर्थ आपल्या आठवतात हे पाहावे. त्यामध्ये ज्या शब्दांचे अर्थ आठवतात त्यातील काही शब्द परत एकदा Dictionary मध्ये पाहून खात्री करून घ्यावी. आणि ज्या शब्दांचे अर्थ आठवत नाहीत त्या सर्व शब्दांचे अर्थ परत एकदा  Dictionary मध्ये पाहावेत. काही काळानंतर अशा शब्दांची संख्या कमी होईल. ज्या शब्दांचे अर्थ आपण पाहिले आहेत त्यांना  Dictionary अधोरेखित करावे म्हणजे एखादा नवीन शब्द पाहताना अगोदर पाहिलेली शब्दांची नकळतच उजळणी होईल.

परीक्षेमध्ये उताऱ्यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे दोन गटांत वर्गीकरण केले जाते.

१) सर्वसमावेशक प्रश्न जसे की उताऱ्याची मुख्य संकल्पना, उताऱ्यावरून निघणारे अनुमान, लेखकाचा उद्देश आणि त्याने काय गृहीत धरले आहे इ. या गटामध्ये शब्द, वाक्य आणि त्यामधील संबंध यावरून अर्थ लावून उत्तर द्यावे लागते.

२) विशिष्ट ठरावीक माहितीवर आधारित प्रश्न. यामध्ये उताऱ्यातील एखाद्या विशिष्ट भागावर प्रश्न विचारले जातात. या गटात फक्त उत्तर हे उताऱ्यामध्ये नेमके कुठे आहे हे शोधावे लागते. अशा विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना वेगवेगळी रणनीती वापरावी लागते. खाली दिलेला तक्ता माहिती आकलन या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे त्यांच्या प्रकारानुसार विश्लेषण देतो.

मुख्य संकल्पना ही अशी सर्वसमावेशक संकल्पना वा वाक्य असते की ज्याला उताऱ्यातील बाकीच्या गोष्टी आधार देत असतात.  Main idea, central theme,  best sums up, passage refers to इ. वाक्यांशांचा वापर करून मुख्य संकल्पनेवर प्रश्न विचारले जातात.

जी गोष्ट लेखक उताऱ्यामध्ये अप्रत्यक्षरित्या सांगत असतो तिला अनुमान वा कयास असे म्हणतात. अनुमानाबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांसाठी वापरले जाणारे काही वाक्यांश inference,  passage implies,  view implied,  conclusion,  implications इ. आहेत. उताऱ्यामध्ये केलेला युक्तिवाद हा अनुमानाला आधार देत असतो. अनुमान आणि मुख्य संकल्पना यांतील सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे अनुमान हे मुख्य संकल्पनेसारखे सर्वसमावेशक असेलच असे नाही कारण ते संपूर्ण उताऱ्यावर आधारित असेलच असे नाही.

गृहीतक (Assumption) ही अशी बाब आहे की, जिच्याबद्दल लेखक पुरेशी माहिती देणे आवश्यक समजत नाही वा तो असे समजतो की, हे वाचकांना माहिती आहे. अशाप्रकारे गृहीतक देखील अप्रत्यक्षरीत्या सांगितलेले असते पण ते लेखकाच्या युक्तिवादाला आधार देत असते. इथे अनुमान आणि गृहीतक यातील फरक लक्षात घ्यावा कारण दोन्हीही अप्रत्यक्षरीत्या सांगितलेले असतात. पण गृहीतक हे लेखकाच्या युक्तिवादाला आधार देत असते आणि लेखकाचा युक्तिवाद हा अनुमानाला आधार देत असतो.

जर उतारा हा दोन वा जास्त परिच्छेदांचा असेल तर आधी प्रश्न वाचून घ्यावेत आणि त्यातील महत्त्वाचे कळीचे शब्द लक्षात ठेवावेत आणि उतारा वाचताना ते अधोरेखित करावेत म्हणजे विशिष्ट प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी परत शोधाशोध करावी लागणार नाही. या व्यतिरिक्त मोठय़ा उताऱ्यासाठी  Structure of the Passage Approach,  Story- line Approach आणि  Optimized Reading Approach इ. चा गरजेनुसार वापर करावा. पण हे करण्याअगोदर वरील पद्धतींची माहिती घेऊन पुरेसा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. या नंतरच्या लेखामध्ये आपण तार्किक क्षमता आणि विश्लेषणात्मक क्षमता या घटकाच्या तयारीवर चर्चा करणार आहोत.