तुकाराम जाधव

संघ लोकसेवा आयोगाच्या सनदी सेवा (नागरी सेवा) परीक्षेतील ‘पूर्व परीक्षा’ हा पहिला टप्पा, त्यातील वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्न  व नकारात्मक गुणपद्धतीमुळे आव्हानात्मक ठरतो. मर्यादित जागा आणि परीक्षेला बसणाऱ्या  विद्यार्थ्यांचे मोठे प्रमाण यातील व्यस्त संबंधामुळे पूर्व परीक्षेची ही चाळणी प्रक्रिया दरवर्षीच गतिशील राहील याची लोकसेवा आयोग पुरेपूर काळजी घेत असतो. परिणामी, या परीक्षेचा अभ्यासक्रम व स्वरूप सर्वानाच माहिती असतांनादेखील त्यातील प्रश्नी विद्यार्थ्यांचा गोंधळ उडवणारे ठरतात. म्हणूनच या सतत बदलणाऱ्या टप्प्याचे योग्य आकलन करून घेणे ही जणू परीक्षेच्या तयारीची पूर्वअट ठरते.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
MPSC Preparation Group B Services Prelims Exam History of Modern India
एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास
Idol exam today but some students don't have admit cards for exam Mumbai
‘आयडॉल’ची आज परीक्षा; मात्र काही विद्यार्थ्यांच्या हातात ‘प्रवेशपत्र’च नाही; मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
UGC, recruit professors, Instructions UGC,
आयोगामार्फत प्राध्यापक भरतीस नकार; प्रचलित नियमांनुसारच प्रक्रिया राबवण्याच्या ‘यूजीसी’च्या सूचना

त्यादृष्टीने पूर्वपरीक्षेची योजना समजून घेतांना त्यातील सामन्य अध्ययन (१०० प्रश्नच; २०० गुण) आणि नागरी सेवा कल चाचणी (अर्थात सी-सॅट) (८० प्रश्न; २०० गुण) या दोन्ही पेपर्सची रचना व अभ्यासक्रम बारकाईने अभ्यासावा. नागरी सेवा कल चाचणी हा पेपर केवळ पात्रता पेपर (२०० पैकी ३३ टक्के प्राप्त करणे अनिवार्य) असल्याने सामान्य अध्ययनासच तयारीचे मुख्य लक्ष्य करावे लागणार यात शंका नाही. अर्थात नागरी सेवा कल चाचणीस गृहीत न धरता आपापल्या स्थितीनुसार सातत्यपूर्ण सरावासाठी निश्चित वेळ देऊ करावा, जेणेकरून वरचेवर बदलणाऱ्या या पेपरमध्ये अपेक्षित ३३ टक्के गुण प्राप्त करणे सुलभ होईल.

दोन्ही पेपर्सच्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म अवलोकन केल्यानंतर नितांत महत्त्वाची ठरणारी बाब म्हणजे आयोगाच्या मागील वर्षांच्या (२०११ ते २०२३) पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण होय. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणात सर्व प्रश्नपत्रिकांचे काळजीपूर्वक वाचन करणे आणि त्यातून प्रत्येक विषयावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप समजून घेणे पायाभूत ठरते. त्यादृष्टीने प्रारंभी सालानुसार, त्यानंतर विषयानुसार, मग विषयातील विभागानुसार आणि शेवटी विषयातील प्रकरणनिहाय प्रश्नांचे वर्गीकरण करावे. अशा विविध पद्धतीने केलेल्या प्रश्नांच्या वाचनामुळे प्रत्येक विषयाच्या तयारीची व्याप्ती व खोली समजून घेता येते. प्रश्न संकल्पनात्मक, माहितीप्रधान-तथ्यात्मक, विश्लेषणात्मक, समकालीन-चालू घडामोडींवर आधारित की सामान्य ज्ञानावर आधारित आहे हे समजून घ्यावे. निराळय़ा शब्दात पूर्व परीक्षेचा ‘डीएनए’च उलगडणे शक्य होते. ही सुरुवातीची, मूलभूत प्रक्रियाच अभ्यासाची खरी सुरुवात मानावी. कारण त्यामुळेच प्रत्येक विषयासाठी वाचावयाच्या संदर्भपुस्तकांना कसे सामोरे जावे याचा योग्य अंदाज घेता येतो. एखाद्या विषयाचे प्रकरण वाचताना त्यात नेमके काय पहावे, ते कसे पहावे, त्यावर प्रक्रिया कशी करावी, त्यासंबंधी विचार-चिंतन कसे करावे इ. महत्त्वपूर्ण बाबी ध्यानात घेता येतात. थोडक्यात, अभ्यासाची पद्धत व दिशाच निर्धारित करण्यासाठी मागील प्रश्नेपत्रिकांचे पद्धतशीरपणे केलेले विश्लेषण कळीची भूमिका बजावते यात शंका नाही.

पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे अवलोकन व प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण याआधारे सामान्य अध्ययन व नागरी सेवा कल चाचणीच्या अभ्यासाची नेमकेपणाने सुरुवात करता येईल. प्रत्येक विषयाच्या अभ्यास प्रकियेत पुढील ३ मूलभूत घटकांचा समावेश असेल याची खातरजमा करावी. पहिला घटक म्हणजे त्या-त्या विषयातील पायाभूत संकल्पना ज्याद्वारे संबंधित विषय योग्यरितीने समजून घेता येतो. त्यासाठी ‘एनसीईआरटी’ची पाठय़पुस्तके मूलभूत मानली जातात. दुसरा घटक म्हणजे प्रत्येक विषयात समाविष्ट असणारा तथ्यात्मक, माहितीप्रधान, स्पष्टीकरणात्मक व विश्लेषणात्मक तपशील. याचे निव्वळ माहितीप्रधान व विश्लेषणात्मक असे उपविभाग करून त्यास सुसंगत अभ्यास पद्धती अवलंबावी. म्हणजे माहितीप्रधान भागाचे पुन्हा पुन्हा वाचन करणे तर विश्लेषणात्मक भाग समजून घेण्यावर भर द्यावा. शेवटचा घटक म्हणजे समकालीन-चालू घडामोडींचा पैलू होय. या घटकाची तयारी करताना तथ्य व विश्लेषण या दोहोंकडे पुरेसे लक्ष दिले जाईल याची काळजी घ्यावी.

पूर्व परीक्षेचे स्वरूप (उपरोक्त म्हटल्याप्रमाणे) वस्तुनिष्ठ-बहुपर्यायी व नकारात्मक गुणपद्धती असे असल्यामुळे कोणत्याही घटकाचा अभ्यास अचूक व नेमका करणे अनिवार्य ठरते. त्यासाठी एकदा-दोनदा केलेले वाचन पुरेसे ठरत नाही तर अनेक वाचनं म्हणजे बऱ्याच उजळण्या (किमान ३ वाचनं; २ उजळण्या) करणे जरूरीचे ठरते. उजळणीची ही प्रक्रिया प्रभावी ठरण्यासाठी वाचन करताना त्यावर योग्य प्रक्रिया करण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे. त्यामुळे प्रत्येक विषयाच्या आपापल्या गरजेनुसार ‘मायक्रो नोट्स? काढणे सोईचे ठरते.

वाचन साहित्यावरील ही प्रक्रिया जितकी पद्धतशीर तितके त्याच्या उजळणीची प्रक्रिया परीक्षाभिमुख ठरते. म्हणून विद्यार्थ्यांनी स्वत:ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन वाचनसाहित्याचे आपल्याला हवे तसे रूपांतरण करावे. परीक्षा जसजशी जवळ येईल तसतसे या मायक्रो-नोट्सच्या उजळण्या वाढवाव्यात आणि त्यावर आणखी सूक्ष्मपणे प्रक्रिया करावी. शेवटी कोणत्याही विषयाची काही तासांतच उजळणी करता येईल एवढीच छोटी नोट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवावे.

उपरोक्त बाबींसह करावयाची आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे नमुना प्रश्न-

प्रश्नपत्रिकांचा सराव होय. प्रत्येक विषयाच्या वाचन-उजळणी सोबतच त्यावरील नमुना प्रश्नांचा सराव हा तयारीचा अभिन्न भाग असला पाहिजे. त्यातही प्रत्येक प्रकरण, विभाग, विषय आणि शेवटी समग्र पेपर अशा क्रमाने प्रश्नांचा सराव हाती घ्यावा. नमुना प्रश्नांच्या सरावाची ही पद्धत अत्यंत शिस्तबद्ध व कठोर असेल याची खात्री बाळगावी. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधताना आपली तोपर्यंतची तयारी कशी झाली आहे, ती पुरेशी आहे का, त्यात कोणत्या उणिवा राहिल्या-राहत आहेत हे कठोर व पारदर्शीपणे तपसावे. सरावासाठी निवडलेला प्रश्नसंच सोडवून झाल्यानंतर प्रत्येकवेळी अशा प्रकारचे चिकित्सक मूल्यमापन करून अभ्यासात नेमक्या काय सुधारणा करणे गरजेचे आहे, हे ठरवता येईल. विविध प्रकारे नमुना प्रश्नांचा सराव केल्यामुळे नवनव्या अडचणी व उणिवा लक्षात येतात.

परिणामी, त्यावर मात करण्यासाठी सुसंगत उपाय हाती घेता येणे सोईचे ठरते. वाचनातील सघनता व सूक्ष्मता, उजळण्यांची वारंवारिता, तथ्यात्मक-माहितीप्रधान भागावरील प्रभुत्व, समकालीन-चालू घडामोडीवर नियंत्रण, विषयनिहाय तार्किक विचाराची क्षमता असे तयारीचे विविध पैलू विकसित करण्यासाठी नमुना प्रश्नांचा सातत्यपूर्ण सराव निर्णायक ठरतो.

Story img Loader