शिवाजी काळे
विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेखापासून आपण यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर १ मधील भारतीय समाज या अभ्यासघटकाविषयी जाणून घेणार आहोत.

यूपीएससी ने हा घटक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून का समाविष्ट केला आहे?

MPSC Preparation Group B Services Prelims Exam History of Modern India
एमपीएससी तयारी: गट ब सेवा पूर्व परीक्षा; आधुनिक भारताचा इतिहास
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
यूपीएससीची तयारी : ‘जीएस’ची तयारी
Idol exam today but some students don't have admit cards for exam Mumbai
‘आयडॉल’ची आज परीक्षा; मात्र काही विद्यार्थ्यांच्या हातात ‘प्रवेशपत्र’च नाही; मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण
nashik online application for school admission starts to integrate children from deprived sections
सर्वांना शिक्षण हक्क प्रक्रियेत ४०७ शाळा सहभागी
CET registration, students, Ticket facility, CET ,
सीईटी नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ‘तिकीट सुविधा’
nadi tarangini latest news in marathi
‘नाडी तरंगिणी’द्वारे अचूक नाडी परीक्षा! पुण्यातील नवउद्यमीने विकसित केले डिजिटल उपकरण
Maharashtra Board s Class 12admit card will be available online from Friday January 10
राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात ‘भारतीय समाज आणि सामाजिक प्रश्न’ या घटकाचा समावेश GS पेपर १ मध्ये केला आहे. हा घटक स्पर्धकांना भारतीय समाजातील विविध समस्या आणि त्यांचे निराकरण याबाबत जागरूक करतो. तसेच, हा घटक समाजातील विविध घटकांमधील समता, न्याय, सहअस्तित्व आणि सामाजिक सक्षमीकरण यांचे महत्त्व अधोरेखित करतो.

अभ्यासक्रमातील विषय

यूपीएससीच्या सामान्य अध्ययन पेपर १ मधील ‘भारतीय समाज आणि सामाजिक प्रश्न’ या घटकांत खालील विषयांचा समावेश आहे:

भारतीय समाजाची मूलभूत गुणवैशिष्ट्ये : भारतीय समाजात विविधता आणि एकता यांचा सुंदर संगम दिसतो. विविध भाषाभाषिक, धर्म, संस्कृती, जात आणि प्रांतीयता यांच्या मिश्रणाने समाजाची संरचना होते. भारतीय समाजाचे मूलभूत गुण म्हणजे बहुसांस्कृतिकता, सहिष्णुता आणि विविधतेमध्ये एकता.

समाजातील विविधता : भारतीय समाजात धार्मिक, भाषिक, जातीय, प्रादेशिक आणि आर्थिक विविधता मोठ्या प्रमाणात आढळते. ही विविधता भारतीय समाजाची संपत्ती आहे, जरी ती कधी कधी सामाजिक समस्या निर्माण करू शकते. विविधतेचा अभ्यास करताना त्याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रभाव समजून घेणे आवश्यक आहे.

महिलांचे वर्तमानकालीन प्रश्न : महिलांच्या संदर्भात लैंगिक भेदभाव, कौटुंबिक हिंसा, शिक्षणाचा अभाव आणि कामाच्या ठिकाणी असमानता यासारख्या अनेक प्रश्न उद्भवतात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध सरकारी योजना आणि कायदे कार्यान्वित आहेत, ज्यांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.

लोकसंख्या, दारिद्र्य आणि विकासाच्या मुद्द्यांमधून उद्भवणारे प्रश्न : भारताची लोकसंख्या वेगाने वाढत आहे, ज्यामुळे संसाधनांची कमतरता, दारिद्र्य, बेरोजगारी, आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासकीय धोरणे आणि उपाय योजनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

नागरीकरणाची समस्या आणि उपाय : नागरीकरणामुळे झोपडपट्टींची वाढ, वाहतूक समस्या, आणि प्रदूषण यासारख्या समस्या निर्माण होतात. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शहरी नियोजन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन, आणि स्वच्छतेच्या उपाययोजनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

जागतिकीकरणाचे भारतीय समाजावर होणारे परिणाम : जागतिकीकरणामुळे भारतीय समाजात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बदल घडून येतात. आर्थिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या असल्या तरी, विषमता वाढली आहे. सांस्कृतिक क्षेत्रात पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढला आहे, ज्यामुळे पारंपारिक मूल्यांवर परिणाम होतो.

सामाजिक सक्षमीकरणाचे मुद्दे: समाजातील दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी विविध सरकारी योजना आणि कायदे आहेत. सामाजिक सक्षमीकरणासाठी शिक्षण, रोजगार, आरोग्य, आणि सामाजिक सुरक्षा योजना महत्त्वाच्या आहेत.

जातिवाद, प्रादेशिकता आणि धर्मनिरपेक्षता यासंबंधी मुद्दे : भारतीय समाजात जातिवादाचे प्रचलन अद्यापही आहे, ज्यामुळे सामाजिक असमानता निर्माण होते. प्रादेशिकतेमुळे राज्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर आधारित भारतीय संविधान समाजातील सर्व घटकांना समान वागणूक देण्याचा प्रयत्न करते.

वरील सर्व विषयांच्या सखोल अभ्यासाने स्पर्धकांना भारतीय समाजाची समज येईल आणि विविध सामाजिक प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रभावी उपाययोजना सुचवता येतील.

GS १ मध्ये ‘समाज’ घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचे गुण

यूपीएससीने ‘भारतीय समाज आणि सामाजिक प्रश्न’ या घटकावर मागील काही वर्षांमध्ये किती गुणांचे प्रश्न विचारले आहेत, हे खालील तक्त्यामध्ये दिले आहे :

वरील तक्त्यांनुसार, समाज भागावर दरवर्षी साधारणपणे ६० ते १०० गुण विचारले जातात.

अभ्यास पद्धती

NCERT च्या पुस्तकांमधील स्थिर भाग आणि चालू घटनांमधील परिवर्तनशीलता.

स्थिर भागाचा अभ्यास : भारतीय समाज आणि सामाजिक प्रश्नाच्या स्थिर भागाचा अभ्यास करण्यासाठी NCERT च्या समाजशास्त्र विषयक पुस्तकांचा आधार घ्यावा. या पुस्तकांमध्ये भारतीय समाजाची रचना, समाजातील विविधता, सामाजिक समस्या, आणि त्यांच्या उपाययोजना यांचा सखोल अभ्यास दिला आहे. काही महत्त्वाची NCERT पुस्तकं पुढीलप्रमाणे आहेत:

भारतीय समाज (Indian Society) – इयत्ता १२ वी, NCERT

भारतामध्ये सामाजिक बदल आणि विकास ( Social Change and Development in India) इयत्ता १२ वी, NCERT भारतीय समाजाची ओळख (महाराष्ट्र बोर्ड)

मासिके आणि वर्तमानपत्रे : योजना, कुरुक्षेत्र मासिक (मराठी आवृत्ती): सरकारी योजनांची आणि सामाजिक प्रश्नांची सखोल माहिती मिळविण्यासाठी उपयुक्त आहे.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय दैनिके: द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, लोकसत्ता या सारखी वर्तमानपत्रे वाचावीत. विशेषत: संपादकीय पृष्ठे आणि सामाजिक प्रश्नांवरील लेख अभ्यासावेत.

चालू घटनांचा अभ्यास: सामाजिक प्रश्नांच्या परिवर्तनशीलतेचा अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडींचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी नियमितपणे विविध वर्तमानपत्रे, मासिके, आणि सरकारी अहवाल वाचावेत.

निष्कर्ष

भारतीय समाज आणि सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाचा यूपीएससी CSE GS पेपर १ च्या तयारीत महत्त्वाचा वाटा आहे. या घटकाच्या अभ्यासासाठी स्थिर भागासाठी NCERT च्या पुस्तकांचा वापर आणि चालू घटनांच्या अभ्यासासाठी विविध स्राोतांचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच, या विषयाच्या सखोल अभ्यासाने स्पर्धकांना समाजातील विविध प्रश्नांची समज येईल आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रभावी उपाययोजना सुचवता येतील.

Story img Loader