प्रस्तुत लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-२ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकामध्ये अंतर्भूत आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाविषयी माहिती घेणार आहोत. साधारण दरवर्षी त्या-त्या वर्षी विविध कारणांमुळे महत्त्वपूर्ण ठरलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांवर प्रश्न विचारला जातो. यावर्षी 1st International Conference on Steel Slag Road आणि The Global INDIAai Summit 2024 या दोन परिषदा भारतात नवी दिल्ली येथे पार पडल्या. तर विकसित राष्ट्रांची G7 या संघटनेची वार्षिक शिखर परिषद १३ ते १५ जून २०२४ दरम्यान इटलीमध्ये पार पडली. या परिषदेसाठी भारताला निमंत्रित केले होते. जागतिक पातळीवर भारताचे उंचावत असलेले स्थान, जागतिक दक्षिण गोलार्धाचे नेतृत्व करण्याची क्षमता, गेल्यावर्षी G20 परिषदेचे भूषविलेले यजमानपद आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्था/संघटनांशी तसेच देशांशी सुधारलेले संबंध या पार्श्वभूमीवर G7 परिषदेतील भारताची भूमिका कळीची ठरली. त्यामुळे यावर्षीच्या मुख्य परीक्षेत या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो.

सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय संघटना म्हणजे काय? त्याचे स्वरूप, उद्दिष्ट्ये याविषयी चर्चा करणे इष्ट ठरेल. आपल्या गरजा, सामूहिक हितसंबंध व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी लोकांचा गट एकत्र येऊन संघटना बनवतो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले हितसंबंध व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून समान हितसंबंध असणारी राष्ट्रे संघटित होतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहुतांश संघटना १९ व्या शतकामध्ये उदयास आल्या व २० व्या शतकामध्ये त्यांचा विकास झालेला दिसून येतो. २१ व्या शतकाच्या प्रारंभी राष्ट्र-राज्ये व अशासकीय घटकांबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटना आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अत्यावश्यक भाग बनल्या आहेत.

Success Story Of Safin Hasan In Marathi
Success Story : जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देताच मनात जागं झालं स्वप्न; यूपीएससी परीक्षेला जाताना बसला मोठा धक्का अन्…; वाचा ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
MPSC GR
MPSC च्या विद्यार्थ्यांना खूशखबर! कमाल वयोमर्यादेत वाढ; राज्य सरकारच्या जीआरमध्ये नेमकं काय म्हटलंय?
Ukraine spy agency Sluzhba bezpeky Ukrainy SBU
विश्लेषण : युक्रेनची गुप्तचर संघटना इस्रायलच्या ‘मोसाद’पेक्षा धोकादायक? रशियाचा काटा काढणाऱ्या ‘एसबीयू’चा इतिहास काय?
pune Govind Dev Giri Batenge to katenge
‘घटेंगे तो कटेंगे’ हेही लक्षात घेतले पाहिजे, गोविंददेव गिरी यांचे पुण्यात विधान
reasearcher obc fellowship delay by government
ओबीसी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपला केंद्र सरकारकडून विलंब, विद्यार्थी अडचणीत; कारण काय?
What is the decision of the Union Home Ministry regarding educational institutions Pune news
केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय, शिक्षण संस्थांना होणार लाभ…
Loksatta explained What is the new controversy related to the Bangladesh war victory
विश्लेषण: बांगलादेश युद्धविजयाशी संबंधित नवा वाद काय?

आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रांमधील सामाजिक, आर्थिक, राजकीय व सुरक्षाविषयक सहकार्य सुकर करण्याचे कार्य पार पाडतात. युद्धे टाळून शांतता व सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये खाजगी व सार्वजनिक, वैश्विक व प्रादेशिक, बहुउद्देशीय व विशेषीकृत अशा सविस्तर संरचना दिसून येतात. सामान्य अध्ययन पेपर-2 साठी संयुक्त राष्ट्रसंघ व त्याच्याशी संबंधित इतर संस्था यामध्ये युनिसेफ, युनेस्को, यूएनइपी, जागतिक आरोग्य संघटना या व याप्रकारची इतर अभिकरणे, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, आसियान, युरोपीयन संघ, ओइसीडी, ओपेक, अॅपेक, अरब लीग इ. संघटनांचे अध्ययन महत्वपूर्ण ठरते.

आंतरराष्ट्रीय संघटनांचे अध्ययन करताना त्यांची संरचना, Mandate या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांचा अभ्यास चालू घडामोडींच्या आनुषंगाने करणे संयुक्तिक ठरते. बऱ्याचदा परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय संघटनेशी संबंधित एखादी बाब चर्चेत असल्यास त्यावर प्रश्न विचारला गेला आहे. उदा. २०२३ च्या मुख्य परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेसंबंधी (IMO) पुढील प्रश्न विचारण्यात आला होता – ‘समुद्र हा ब्रह्मांडाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे.’ वरील विधानाच्या प्रकाशात आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या पर्यावरण संरक्षण आणि सागरी सुरक्षा आणि बचाव यांना चालना देण्यातील भूमिकेची चर्चा करा. (गुण १५०, शब्दमर्यादा २५०).

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील सुधारणा आणि भारताचा स्थायी सदस्यात्वासाठी दावा हा देखील चर्चेत असणारा विषय आहे. जागतिक सुरक्षाविषयक मुद्द्यांवर या सुरक्षा परिषदेची भूमिका महत्त्वाची ठरते. त्या अनुषंगाने सुरक्षा परिषद हा संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन हे सुरक्षा परिषदेचे कायमस्वरुपी सदस्य आहेत. त्यांना नकाराधिकाराच्या (व्हेटो पॉवर) माध्यमातून प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या भारत, ब्राझील, जपान आणि जर्मनी या देशांकडून सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व प्राप्त व्हावे याकरिता मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेला कालानुरूप आपल्या संरचनेमध्ये सुसंगत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून ही मागणी उचित ठरते. भारताने वेगवेगळ्या व्यासपीठांवरून सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्यत्व मिळावं याकरिता सातत्याने मागणी केली आहे. जगातील चीन वगळून अनेक देशांनी भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळावं याकरिता पाठिंबा दर्शविला आहे. मात्र भारताला सुरक्षा परिषदेमध्ये सदस्य व मिळण्याच्या दृष्टीने अजूनही ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे भारताच्या स्थायी सदस्यत्वासंबंधी देखील वारंवार प्रश्न विचारले जातात.

क्वाड ज्याला ‘चतुर्भुज सुरक्षा संवाद’ (QSD) म्हणूनही ओळखले जाते, हा एक अनौपचारिक धोरणात्मक मंच आहे ज्यामध्ये युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए), भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार राष्ट्रांचा समावेश आहे. २००७ मध्ये दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या (ASEAN) बाजूने या गटाची पहिल्यांदा बैठक झाली. ही सागरी लोकशाहीची युती मानली जाते. सर्व सदस्य देशांच्या बैठका, अर्ध-नियमित शिखर परिषद, माहितीची देवाणघेवाण आणि लष्करी कवायतींद्वारे मंचाची देखभाल केली जाते. २००७ मध्ये क्वाडच्या निर्मितीसाठी जपानचे माजी पंतप्रधान, शिंजो आबे यांनी सर्वप्रथम कल्पना मांडली होती. २००७ मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, चार सदस्यीय राष्ट्रांचे प्रतिनिधी वेळोवेळी भेटत आहेत. इंडो-पॅसिफिकमधील सामरिक सागरी मार्ग कोणत्याही लष्करी किंवा राजकीय प्रभावापासून मुक्त ठेवणे हा क्वाडमागील हेतू आहे. याकडे मुळात चिनी वर्चस्व कमी करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक गटबाजी म्हणून पाहिले जाते. नियम-आधारित जागतिक व्यवस्था, नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य आणि उदारमतवादी व्यापार प्रणाली सुरक्षित करणे हे क्वाडचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या काही प्रमुख संघटनांशिवाय यावर्षी विविध कारणांमुळे चर्चेत राहिलेल्या इतर काही आंतरराष्ट्रीय संघटनांच्या विविध आयामांचादेखील अभ्यास करावा. उदा. भारत-आसियानची २० वी परिषद, COP 28, नाटो संघटना (एप्रिल २०२४ मध्ये या संघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाली त्या पार्श्वभूमीवर), G20 आणि ब्रिक्स, आणि अलिप्तराष्ट्रांची संघटना (NAM) इत्यादी.

आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाची तयारी त्या संघटनांविषयीच्या पारंपरिक माहिती बरोबर चालू घडामोडींच्या पार्श्वभूमीवर करणे आवश्यक ठरते. ही बाब वर नमूद केलेल्या प्रश्नांवरून अधोरेखित होते. आंतरराष्ट्रीय संघटनांविषयीची माहिती संबंधित संघटनेच्या वेबसाईटवरून मिळते. याबरोबरच या संघटनांशी संबंधित चालू घडामोडीच्या तयारी करीता ‘द इंडियन एक्स्प्रेस’, ‘द हिंदू’, ‘वर्ल्ड फोकस’ यासारखी वृत्तपत्रे आणि नियतकालिके उपयुक्त ठरतात.

Story img Loader