ऋषिकेश बडवे

यूपीएससी मुख्य परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन पेपर ३ हा २५० गुणांचा पेपर आहे. यामध्ये अर्थशास्त्र, पर्यावरण शास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान, अंतर्गत सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विषयांचा समावेश होतो. त्यापैकी अर्थशास्त्राची तयारी कशी करावी याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

mpsc preparation strategy
MPSC ची तयारी : पर्यावरण भूगोल, अवकाशीय तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन    
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Artificial intelligence in recommender systems
कुतूहल: ऑनलाइन शिफारशींचे इंगित
Coastal heavy rainfall, artificial rainfall, IITM,
किनारपट्टीवरील अतिवृष्टी कृत्रिम पावसाद्वारे टाळणे शक्य, सविस्तर वाचा ‘आयआयटीएम’मधील शास्त्रज्ञांचा अभ्यास
Support for science and development through two new policies
दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…
UPSC Preparation Social Justice UPSC Mains General Studies Paper Two
upscची तयारी: सामाजिक न्याय
hsc result
HSC Result : इयत्ता बारावीच्या निकालात आता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण समाविष्ट होणार? NCERT चा नवा प्रस्ताव काय?
What is the engineering admission status in the state and Job opportunities
राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशाची स्थिती काय? या शाखांमध्ये नोकरीची संधी

 या पेपरच्या तयारीची सुरुवात अभ्यासक्रम समजून घेण्यापासून करावी. यूपीएससी पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम जितका अपूर्ण पद्धतीने दिला गेला आहे तितकाच विस्तृत व निश्चित असा अभ्यासक्रम मुख्य परीक्षेसाठी दिला गेला आहे. मुख्य परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न बहुतांश वेळा अभ्यासक्रमाच्या कक्षेमध्येच विचारले जातात. परंतु हे प्रश्न सरळ रीतीने न विचारता विविध मूलभूत संकल्पनांच्या परस्पर संबंधांवर अथवा अनुप्रयोगांवर (Concept Application) अवलंबून असतात. त्याच बरोबर चालू घडामोडींमध्ये चर्चेत असलेल्या विषयांवर देखील प्रश्न विचारलेले दिसून येतात.

बहुतांशवेळा चालू घडामोडींमध्ये चर्चेत असलेल्या विषयाच्या मुळाशी जाऊन ज्या मूलभूत संकल्पनेवर तो विषय अवलंबून आहे अशा मूलभूत संकल्पनेवर प्रश्न विचारले जातात. अर्थशास्त्राचे असे गतिशील (डायनॅमिक) स्वरूप असल्यामुळे या विषयाची तयारी विशिष्ट पद्धतीनेच करावी लागते. या पद्धतीला एका प्रक्रियेचे स्वरूप देऊन ते आत्मसात करणे परीक्षार्थीना गरजेचे असते. या प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे वर उल्लेखित केल्याप्रमाणे अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रम समजून घेताना अभ्यासक्रमातील प्रत्येक संकल्पनेची व्याप्ती समजून घेणे गरजेचे असते त्यासाठी प्राथमिक पातळीवर अर्थशास्त्राचा आभ्यास असणे ही पूर्वअट आहे. यूटय़ूबवर उप्लब्ध व्हिडीओ पाहून विद्यार्थी प्राथमिक पातळीवर अभ्यास न करता मागील वर्षीच्या प्रश्नांचे विश्लेषण करण्यापासून सुरवात करतात. परंतु जर संकल्पना व त्यांची व्याप्ती स्पष्ट नसेल तर त्याचे विश्लेषण कसे करता येईल? यासाठी अर्थव्यवस्थेच्या मूलभूत संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. त्या समजून घेण्यासाठी NCERT ची इयत्ता नववी ते बारावीची पुस्तके वाचणे किंवा तमिळनाडू बोर्डाची पुस्तके वाचणे फायद्याचे ठरू शकते.

बेसिकची अशा पद्धतीने ओळख झाल्यावर मग मागील वर्षीच्या प्रश्नांचे विश्लेषण केले करता येईल. ते करत असताना बाजारातील रेडीमेड पुस्तकांची देखील मदत घेतली जाऊ शकते. या विश्लेषणातून व यूपीएससीने दिलेल्या अभ्यासक्रमावरून टॉपिक्स व त्या अंतर्गत येणारे सब-टॉपिक्स यांची विस्तृत यादी करणे गरजेचे असते. या सर्व प्रक्रियेतून अर्थशास्त्राचा विस्तृत अभ्यासक्रम बनवावा. या सर्व टॉपिक्स व सब-टॉपिक्सचा अभ्यास संदर्भ साहित्यामधून विस्तृत स्वरुपात करावा. ठरवलेला अभ्यास करत असताना संकल्पनांची स्पष्टता, त्यांचे अनुप्रयोग (Application )समजून घेणे गरजेचे आहे. हे सर्व अर्थशास्त्राचा अर्धाच भाग पूर्ण करतात.

यूपीएससीच्या तयारीतील अर्थशास्त्राचा आणखी एक पैलू म्हणजे अर्थव्यवस्थेसंबंधातील चालू घडामोडी. हाच पैलू अर्थशास्त्राला डायनॅमिक बनवतो. चालू घडामोडींचा मागोवा घेणे आणि त्यांचे मूलभूत संकल्पनांशी असलेली जोडणी व दोन्हींचे अनुप्रयोग समजून घेणे महत्त्वाचे असते. इथे अर्थशास्त्राचा अभ्यास करणे आव्हानात्मक बनते. यासाठी वर सांगितल्याप्रमाणे अर्थशास्त्र अभ्यासाची एक प्रक्रिया बनवावी लागते व अतिशय शिस्तपूर्वक पद्धतीने त्या प्रक्रियेची अंमलबजावणी करावी लागते. चालू घडामोडींचा योग्य पद्धतीने मागोवा घेण्यासाठी रोजचे वृत्तपत्र वाचन करणे गरजेचे असते. अशात मराठी माध्यामातून यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी वृत्तपत्रांसोबत इंग्रजी वृत्तपत्र वाचणे देखील गरजेचे असते.

मराठीमधील ‘लोकसत्ता’ व इंग्रजीमध्ये ‘द ’ किंवा ‘इंडियन एक्स्प्रेस’ पैकी कोणतेही एक वृत्तपत्र वाचावे. वृत्तपत्र वाचताना त्यामधील घडामोडींच्या मुळाशी जाऊन त्या घडामोडी ज्या संकल्पनांवर अवलंबून आहेत त्या अभ्यासणे अतिशय फायद्याचे ठरू शकते. वृत्तपत्र वाचन हे सुरुवातीला फार वेळखाऊ व कंटाळवाणे वाटते. त्यामुळे वृत्तपत्र वाचन टाळून विद्यार्थी बाजारातील रेडीमेड मॅगझिन्सचा वापर करतात. परंतु यामुळे जे विश्लेषणात्मक कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणे अपेक्षित असते ते होत नाही व त्याचा तोटा मुख्य परीक्षेत प्रश्नांचे विश्लेषण करताना होतो. वृत्तपत्र वाचनाची पद्धत व काही युक्त्या अंमलात आणल्यास वृत्तपत्र वाचनाचा वेळ कमी होऊ शकतो. अशा पद्धतीने तयारी केल्यास अर्थशास्त्र हा विषय यूपीएससी परीक्षेत चांगले गुण मिळवून देऊन आपला यशाचा मार्ग सुनिश्चित करण्यास मदत करतो.