विक्रांत भोसले

वृत्ती संबंधीच्या काही मूलभूत संकल्पना आणि वृत्तीचा वर्तनाशी असलेला संबंध याबद्दल आपण मागील दोन लेखात चर्चा केली. याविषयाशी संबंधित प्रश्न जेव्हा विचारले जातात, तेव्हा ते काहीवेळा थेट तर अनेकदा अप्रत्यक्षरित्या या संकल्पनाचा वापर करून उत्तर देता येईल, अशाप्रकारचे असतात. थेट प्रश्न अर्थातच समजून घ्यायला आणि त्याला धरून उत्तर लिहायला तुलनेने सोपे असतात. मात्र, अप्रत्यक्ष प्रश्नांच्याबाबतीत संकल्पना समजून घेण्याबरोबरच त्याचे वास्तवात उपयोजन काय आहे? याचा सखोल विचार उमेदवारांनी केलेला असणे अपेक्षित आहे. या लेखात आपण वृत्तीसंबंधित विचारल्या गेलेल्या भाग अ मध्ये येणाऱ्या काही प्रश्नांचा आढावा घेणार आहोत. या प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केल्यास एकंदर यूपीएससीचा या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आंतरविद्याशाखीय आहे हे लक्षात येते.

article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास

(1)Attitude is an important component that goes as input in the development of human being. How to build a suitable attitude needed for a public servant? (2021, 150 words, 10 marks)

वृत्ती हा व्यक्तीच्या विकासामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. सनदी सेवकाकरिता आवश्यक असलेली सुयोग्य वृत्ती कशी घडविता येईल? (२०२१, १५० शब्द, १० गुण)

(2) A positive attitude is considered to be an essential characteristic of a civil servant who is often required to function under extreme stress. What contributes to a positive attitude in a person? (2020, 150 words, 10 marks)

सतत आत्यंतिक ताणाखाली काम करावे लागणाऱ्या नागरी सेवकांच्या बाबतीत सकारात्मक वृत्ती हा आवश्यक गुण समजला जातो. व्यक्तीमध्ये सकारात्मक वृत्ती कशी तयार होते? (२०२०, १५० शब्द १० गुण)

(3) Young people with ethical conduct are not willing to come forward to join active politics. Suggest steps to motivate them to come forward. (2017, 150 words, 10 Marks)

नीतीमत्ता पूर्ण आचरण असलेला तरुण वर्ग हा पुढे येऊन सक्रिय राजकारणामध्ये सहभागी होण्यास इच्छा दर्शवित नाही. तरुण वर्गाला यासंबंधी प्रोत्साहित करणारे उपाय सुचवा. (२०१७, १५० शब्द, १० गुण)

(4) Our attitudes towards life. work, other people and society are generally shaped unconsciously by the family and the social surroundings in which we grow up. Some of these unconsciously acquired attitudes and values are often undesirable in the citizens of a modern democratic and egalitarian society.

(a) Discuss such undesirable values prevalent in today’ s educated Indians.

 (b) How can such undesirable attitudes be changed and socio- ethical values considered necessary in public services be cultivated in the aspiring and serving civil servants?  (2016, 150 words, 10 marks)

आपली आयुष्याबद्दल, कामाबद्दल, इतर लोकांबद्दल आणि समाजाबद्दल असणारी वृत्ती ही सर्वसामान्यपणे आपले कुटुंब आणि आपला सामाजिक सभोवताल यामध्ये वाढ होत असताना नकळतपणे वळण घेते. यातील नकळतपणे संचित झालेल्या काही वृत्ती आणि मूल्ये अनेकवेळा आधुनिक लोकशाहीवादी, समताधिष्ठित समाजातील नागरिकांस अनिष्ट असतात.

(अ) आजच्या सुशिक्षित भारतीयांमध्ये अस्तित्वात असणाऱ्या अशा अनिष्ट मूल्यांची चर्चा करा.

(ब) आपण कशाप्रकारे होतकरू व सेवेत असणाऱ्या नागरी सेवकांमध्ये अस्तित्वात असणाऱ्या अनिष्ट वृत्तींना बदलून गरजेच्या असणाऱ्या सामाजिक-नैतिक मूल्यांचे संवर्धन करू शकतो? (२०१६, १५० शब्द, १० गुण)

(3) What factors affect the formation of a personl s attitude towards social problems? In our society, contrasting attitudes are prevalent about many social problems.  What contrasting attitudes do you notice about the caste system in our society? How do you explain the existence of these contrasting attitudes?  (2014, 150 words, 10 marks)

(३)सामाजिक समस्यांबाबत व्यक्तीच्या वृत्तीमध्ये कोणकोणत्या गोष्टींमुळे जडणघडण होते? आपल्या समाजात अनेक सामाजिक समस्यांबाबत अनेक विसंगत वृत्ती अस्तित्वात आहेत. आपल्या समाजातील जाती व्यवस्थेबद्दल कोणत्या प्रकारच्या विसंगत वृत्ती आपल्या निदर्शनास येतात? अशा विसंगत वृत्तींचे समाजातील अस्तित्व आपण कशाप्रकारे स्पष्ट कराल?  (२०१४, १५० शब्द, १० गुण)

(4) We are witnessing increasing instances of sexual violence against women in the country. Despite existing legal provisions against it, the number of such incidences is on the rise. Suggest some innovative measures to tackle this menace. (2014, 150 words, 10 marks)

(४) आपण आपल्या देशामध्ये स्त्रियांविरुद्ध लैंगिक हिंसेच्या वाढत्या घटनांना सामोरे जात आहोत. अशा घटनांविरुद्ध कायदेशीर तरतूद अस्तित्वात असूनही अशा घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच जात आहे. अशा समस्येला तोंड देण्यासाठी काही अभिनव उपाय सुचवा. (२०१४, १५० शब्द, १० गुण)पुढील लेखात सामाजिक मानसशास्त्रातील पुढचा विषय म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचा आपण विचार करणार आहोत.