UPSC recruitment 2023: संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) उपसंचालक(Deputy Director), सहायक संचालक(Assistant Director), सहाय्यक प्राध्यापक(Assistant Professor) आणि इतर पदांच्या विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. अर्जाची प्रक्रिया आज, २६ ऑगस्टला सुरू झाली आणि अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर आहे. इच्छुक उमेदवार upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

UPSC भरती २०२३ भरतीचे तपशील:

२९ रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.

UPSC भरती २०२३ रिक्त जागा तपशील:

  • स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (हृदयविज्ञान): ०९
  • सहाय्यक संचालक जनगणना संचालन (तांत्रिक): ०९
  • उपसंचालक: १०
  • सहाय्यक प्राध्यापक (वनस्पतिशास्त्र): ०१
  • सहाय्यक प्राध्यापक (रसायनशास्त्र): ०१
  • सहाय्यक प्राध्यापक (इंग्रजी): ०३
  • सहाय्यक प्राध्यापक (हिंदी): ०१
  • सहाय्यक प्राध्यापक (इतिहास): ०१
  • सहाय्यक प्राध्यापक (गणित): ०१
  • सहाय्यक प्राध्यापक (तमिळ): ०१

हेही वाचा – स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे ट्रान्सलेटरच्या ३०७ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

UPSC भरती २०२३ अर्ज शुल्क:
उमेदवारांना २५ रुपये अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. SC/ST/PwBD/महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.

अर्ज करण्यासाठी थेट लिंक -https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php
अधिसुचना – https://upsconline.nic.in/ora/oraauth/candidate/download_ad.php?id=MzUzYICPWALAL1KA67FAIZNAKQXDNJCSGKI2QH9CXM3ICOSXUACVDX

हेही वाचा – IBPSमध्ये १४०२ पदांसाठी होणार भरती: अर्जाच्या मुदतीमध्ये वाढ, ‘ही’ आहे शेवटची तारीख

UPSC भरती २०२३: अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

  • upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • होमपेजवर “विविध भरती पदांसाठी ऑनलाइन भरती अर्ज (ORA)” वर क्लिक करा.
  • स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल
  • अर्ज भरा
  • अर्ज शुल्क भरा
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc recruitment 2023 application begins for deputy director assistant director assistant professor and other posts before september 14 snk