UPSC Recruitment 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने भरती अधिसुचना जाहीर केली आहे. या भरती मोहिमेंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in ला भेट देऊ शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे जी २७ जुलै २०२३ला संपणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवाराने खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.
UPSC भरती २०२३ : रिक्त जागा तपशील
लिगल ऑफिसर: २ पदे
सायंटिफिक ऑफिसर: १ पद
डेप्युटी आर्किटेक्ट :५३ पदे
सायंटिस्ट बी’: ७ पदे
ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर: २ पदे
असिस्टंट डायरेक्टर माईन सेफ्टी : २ पदे
डायरेक्टर जनरल: १ पद
अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर: ३ पदे
हेही वाचा – भारतीय सैन्यदलात ऑफिसर होण्याची संधी! ‘इतका’ मिळू शकतो पगार, जाणून घ्या पात्रता निकष
UPSC Recruitment 2023: अर्ज शुल्क
या भरती मोहिमेंतर्गत उमेदवारांना अर्ज शुल्क द्यावे लागेल. भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फक्त २५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवार अर्ज शुल्क एसबीआयच्या कोणत्याही शाखेत कॅश किंवा कोणत्याही बॅकेच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून करु शकतात. व्हिसा/ मास्टर/ रुपये/ क्रेडिट/डेबिट कार्ड/ युपीआयद्वारे अर्ज शुल्क भरू शकतात. एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सुट दिली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार यूपीएससीची अधिकृत वेबसाईट चेक करू शकतात.
अधिसुचना – https://upsconline.nic.in/ora/oraauth/candidate/download_ad.php?id=MzUw3CXAKKIONLVUI26XAXQC9AYHW5S7GASNICIDC1PJALXZACDKFM
अर्जाची लिंक – https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php
UPSC Recruitment 2023: असा करा अर्ज
स्टेप १: सर्वात आधी उमेदवार अधिकृत वेबसाईट upsc.gov.in ला भेट देऊ शकतात.
स्टेप २: त्यानंतर उमेदवार होम पेजवरील भरतीसंबधीत लिंकवर क्लिक करू शकतात.
स्टेप ३: उमेदवार अर्ज करण्यासाठी आपली नोंदणी करू शकतात.
स्टेप ४: यासाठी उमेदवार क्रेडिंशिअल नोंदणी करुन लॉग-इन करा.
स्टेप ५: आता उमेदवार अर्ज व्यवस्थित भरून घ्यावा.
स्टेप ६: त्यानंतर उमेदवारांनी अर्जाची फी भरावी.
स्टेप ७: आता अर्ज सबमीट करा.
स्टेप ८: त्यानंतर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.
स्टेप ९: भविष्यातील संदर्भासाठी एक प्रतची प्रिंट करावी.