UPSC Recruitment 2023: संघ लोक सेवा आयोगाने सुपरव्हायजर आणि इतर पदांवर भरती करण्यासाठी अर्ज मागवले आहे. जे उमेदवार या पदांवर अर्ज करू इच्छित आहेत ते युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन upsc.gov.in च्या माध्यमातून अर्ज पाठवू शकतात. यूपीएससी भरती 2023 साठी नोंदणी प्रक्रिया आज 22 एप्रिलपासून सुरू होईल आणि १२ मे २०२३ रोजी समाप्त होईल. या भरतीप्रक्रियेच्या अंतर्गत एकूण ९ पदे भरली जातील. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी सर्वात आधी दिलेली माहिती व्यवस्थित वाचा.
यूपीएससी भरतीअंतर्गत भरल्या जाणार्या पदांची संख्या
असिस्टेंट सॉइल कंजर्वेशन ऑफिसर: : २ पदे
अॅडिशनल असिस्टेंट डायरेक्टर : ३ पदे
शास्त्रज्ञ ‘बी’: १ पद
सुपरवाइजर इंक्लूसिव्ह एज्यूकेशन डिस्ट्रिक्ट: ३ पदे
हेही वाचा – ISRO Recruitment 2023: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी! ६३ पदांसाठी होणार भरती, २४ एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज
यूपीएससी भरतीसाठी पात्रता निकष
जे उम्मेदवार या पदावर अर्ज करू इच्छितो, त्यांनी दिलेला अधिकृत नोटिफिकेशनमध्ये संबंधित पात्रता आणि वयोमर्यादा पाहावी.
यूपीएससी भरतीसाठी अर्ज शुल्क
उम्मीदवारांना अर्ज शुल्क २५ /- रुपये भरावे लागतील. पण केवळ रोख रक्कम किंवा एसबीआयची नेट बँकिंग सुविधा वापरून या वीजा/मास्टर क्रेडिट/डेबिट कार्डचा वापर करून पैसे भरले जातील. अनुसूचित जाति/अनुसूचित जनजाति/पीडब्ल्यूबीडी/महिला उम्मीदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.
येथे पहा अर्ज करण्याची लिंक आणि नोटिफिकेशन
युपीएसी भरती २०२३साठी अर्ज पाठविण्याची लिंक – https://www.upsc.gov.in/
युपीएससी भरती २०२३साठी नोटिफिकेशन – https://www.upsc.gov.in/sites/default/files/Advt-No-08-2023-engl-210423.pdf
हेही वाचा : MBBS उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! १२६१ पदांवर होणार भरती, मिळेल चांगला पगार
यूपीएससी भरतीसाठी इतर तपशील
मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यामध्ये,१०० गुणांपैकी UR/EWS उमेदवारांना – ५० गुण, OBC उमेदवारांना – ४५ गुण, SC/ST/PwBD उमेदवारांना – ४० गुण मिळवावे लागतील. या पदासंबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.