UPSC Recruitment 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने जवळपास २६१ पदासांठीची भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्जदेखील मागविण्यात येत आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोग भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकूण रिक्त पदे – २६१

पदाचे नाव – एयर वॉर्थीनेस ऑफिसर, एयर सेफ्टी ऑफिसर, पशुधन अधिकारी, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, पब्लिक प्रॉसिक्यूटर, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I, असिस्टंट सर्व्हे ऑफिसर, प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल), सिनियर लेक्चरर.

हेही वाचा- १० वी पास उमेदवारांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! महिना २१ हजारांहून अधिक पगार मिळणार, जाणून घ्या सविस्तर

पदानुसार शैक्षणिक पात्रता –

एयर वॉर्थीनेस अधिकारी- फिजिक्स/गणित/ एयरक्राफ्ट मेंटेनन्स पदवी किंवा एरोनॉटिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन विषयात इंजिनिअरिंग पदवी + AME B1 किंवा B2 परवाना + ३ वर्षाचा अनुभव.

एयर सेफ्टी अधिकारी- एरोनॉटिकल विषयात इंजिनिअरिंग पदवी.

पशुधन अधिकारी – पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन विषयात पदवी + ३ वर्षे अनुभव.

ज्युनियर सायंटिफिक अधिकारी – फिजिक्स/ गणित/ उपयोजित गणित/ बॉटनी/ जुलॉजी/ मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ फिजिकल एन्थ्रोपोलॉजी/ जेनेटिक्स किंवा फॉरेन्सिक सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc/ B.E/ B.Tech + ३ वर्षे अनुभव.

पब्लिक प्रॉसिक्यूटर – LLB + ७ वर्षे अनुभव.

ज्युनियर ट्रान्सलेशन अधिकारी – हिंदी/ इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी + हिंदी/ इंग्रजी विषयात ट्रांसलेशन डिप्लोमा.

असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I – इंजिनिअरिंग पदवी/ AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ ड्रिलिंग विषयात इंजिनिअरिंग पदवी.

असिस्टंट सर्व्हे अधिकारी – इंजिनिअरिंग पदवी/ AMIE किंवा माइनिंग/ मेकॅनिकल/ ड्रिलिंग विषयात इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव.
प्रिंसिपल ऑफिसर (इंजिनिअरिंग कम-जॉइंट डायरेक्टर जनरल (टेक्निकल): सागरी अभियंता अधिकारी वर्ग-I चे पात्रतेचे प्रमाणपत्र (स्टीम किंवा मोटर किंवा एकत्रित स्टीम आणि मोटर) किंवा समतुल्य.

सिनियर लेक्चरर – MD/ MS + ३ वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा –

खुला प्रवर्गासाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.

  • ओबीसी – ३ वर्षे सूट.
  • मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.

अर्ज फी –

  • खुला/ ओबीसी प्रवर्ग – २५ रुपये.
  • मागासवर्गीय/ महिला/ PH – फी नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा –

  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २४ जून २०२३
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख -१३ जुलै २०२३

अधिकृत बेवसाईट – https://upsc.gov.in/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1HWIhh0rm-n6zeTQjCudo94Lk5AqnSjK-/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc recruitment 2023 for 261 posts know eligibility and criteria before applying jap