UPSC Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी चालून आली आहे. कारण – केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीने (UPSC) भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र उमेदवार युपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०२४ असणार आहे. या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

UPSC Recruitment 2024 : रिक्त पदे व पदसंख्या

केंद्रीय लोकसेवा आयोगाने उप अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ (Deputy Superintending Archaeologist) = ६७ पदे तर आणि केबिन सुरक्षा निरीक्षक ( Cabin Safety Inspector ) पदाच्या १५ आदी एकूण ८२ रिक्त जागांसाठी ही भरती मोहीम आयोजित केली आहे.

UPSC Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

उप अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञसाठी अर्ज करणार उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी किंवा मानववंशशास्त्र किंवा मास्टर डिग्री मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून भूविज्ञान, आणि (ii) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून डिप्लोमा किंवा किमान तीन क्षेत्राचा अनुभव असणे महत्वाचे आहे.

केबिन सेफ्टी इन्स्पेक्टरसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 उत्तीर्ण असावा.

हेही वाचा…Success Story : IIT मधून घेतलं शिक्षण, लाखोंची नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी सुरू केलं स्टार्टअप; वाचा १,२५० कोटी रुपयांच्या कंपनीच्या मालकाची गोष्ट

UPSC Recruitment 2024 : अर्ज फी

उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५ रुपये भरावे लागतील . SBI किंवा कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा व्हिजा/ मास्टर /रुपे /क्रेडिट/डेबिट कार्ड / UPI पेमेंट वापरून फी भरली जाऊ शकते. अपंग उमेदवार असलेल्या महिला/एससी/एसटी /व्यक्तींना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

UPSC Recruitment 2024 : उमेदवाराची निवड कशी होईल ?

उमेदवाराची निवड केवळ मुलाखतीद्वारे किंवा भरती चाचणीद्वारे होणार आहे. मुलाखत एकूण १०० गुणांची असेल. तसेच या चाचणीदरम्यान उमेदवाराला , युआर (UR) / ईडब्ल्यूएस (EWS) उमेदवारांना ५० गुण, ओबीसी उमेदवारांना ४५ गुण, एससी / एसटी /पीडब्ल्यूडी उमेदवारांना – ४० गुण असणे महत्वाचे आहे.

तर अधिक माहितीसाठी उमेदवाराने अधिसूचना तपासून घ्यावी…

अधिसूचना लिंक : https://upsc.gov.in/sites/default/files/AdvtNo-11-2024-engl-16082024.pdf

तर ही सर्व माहिती लक्षात ठेवून उमेदवार या भारतीप्रक्रियेसाठी अर्ज करू शकणार आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc recruitment 2024 has invited applications for deputy superintending archaeologist and cabin safety inspector for 82 posts asp