UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) नवीन भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या एकूण १४७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल असणार आहे.
UPSC Recruitment 2024: भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, पगार, शैक्षणिक पात्रता, अर्ज फी, अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
रिक्त पदे व पदसंख्या –
- वैज्ञानिक-B (मेकॅनिकल) – १ पद.
- मानववंशशास्त्रज्ञ (फिजिकल मानववंशशास्त्र विभाग) १ पद.
- स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (ॲनेस्थेसियोलॉजी) ४८ पदे.
- स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (कार्डिओ व्हॅस्कुलर आणि थोरॅसिक शस्त्रक्रिया) ५ पदे.
- स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (नवजातशास्त्र) १९ पदे.
- स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (प्रसूती आणि स्त्रीरोग) २६ पदे.
- स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (न्यूरोलॉजी) २० पदे.
- स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (फिजिकल औषध आणि पुनर्वसन) ५ पदे.
- सहाय्यक कार्यकारी अभियंता ४ पदे.
- वैज्ञानिक-B (सिव्हिल इंजिनिअरिंग) ८ पदे.
- वैज्ञानिक-B (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन) ३ पदे.
- असिस्टंट डायरेक्टर ७ पदे.
हेही वाचा…IBPS Recruitment 2024: बँकेत काम करायचंय? आयबीपीएस अंतर्गत ‘या’ विविध पदांवर भरती सुरू; असा करा अर्ज
पगार –
- सहाय्यक संचालक – ५६,१०० ते १,७७,५००
- स्पेशलिस्ट ग्रेड III – ६७,७०० ते २,०८,७००
- वैज्ञानिक-B – ५६,१०० ते १,७७,५००
- मानववंशशास्त्रज्ञ- ५६,१०० ते १,७७,५००
- सहाय्यक कार्यकारी अभियंता ५६,१०० ते १,७७,५००
शैक्षणिक पात्रता –
१. वैज्ञानिक B – पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स किंवा बी.ई / बी टेक आणि दोन वर्षांचा अनुभव.
२. मानववंशशास्त्रज्ञ – अंतिम वर्षाच्या परीक्षेत भौतिक मानववंशशास्त्र किंवा जैविक मानववंशशास्त्र या विषयात पन्नास टक्क्यांहून अधिक गुण व मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानववंशशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, मानववंशशास्त्रातील तीन वर्षांचा संशोधनाचा अनुभव.
३. सहाय्यक प्राध्यापक – एमबीबीएस पदवी, संबंधित स्पेशॅलिटी किंवा सुपर स्पेशालिटीमधील पदव्युत्तर पदवी आणि तीन वर्षांचा अनुभव
अर्ज फी –
- सर्व उमेदवारांसाठी २५ रुपये.
- एससी / एसटी / पीडब्ल्यूडी व महिला उमेदवारांना कोणतीही फी भरायची नाही.
अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिसूचना एकदा वाचून घ्यावी.
लिंक – https://upsc.gov.in/sites/default/files/AdvtNo_06-2024_Eng_22032024.pdf
उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात.
लिंक – https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php
अर्ज कसा करावा –
- upsconline.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- भरती (Recruitment) बटणावर क्लिक करा.
- स्पेशलिस्ट आणि इतर पदांसाठी अर्ज करा, टॅबवर क्लिक करा.
- सूचना वाचा आणि अर्ज भरा. सबमिशन केल्यावर एक Unique क्रमांक तयार केला जाईल.
- आवश्यक फी भरा (जेथे लागू असेल).
- भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंटआऊटसुद्धा घ्या, तर अशाप्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.