UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) नवीन भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या एकूण १४७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया २५ मार्चपासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ११ एप्रिल असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

UPSC Recruitment 2024: भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, पगार, शैक्षणिक पात्रता, अर्ज फी, अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.

रिक्त पदे व पदसंख्या –

  • वैज्ञानिक-B (मेकॅनिकल) – १ पद.
  • मानववंशशास्त्रज्ञ (फिजिकल मानववंशशास्त्र विभाग) १ पद.
  • स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (ॲनेस्थेसियोलॉजी) ४८ पदे.
  • स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (कार्डिओ व्हॅस्कुलर आणि थोरॅसिक शस्त्रक्रिया) ५ पदे.
  • स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (नवजातशास्त्र) १९ पदे.
  • स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (प्रसूती आणि स्त्रीरोग) २६ पदे.
  • स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (न्यूरोलॉजी) २० पदे.
  • स्पेशलिस्ट ग्रेड III सहाय्यक प्राध्यापक (फिजिकल औषध आणि पुनर्वसन) ५ पदे.
  • सहाय्यक कार्यकारी अभियंता ४ पदे.
  • वैज्ञानिक-B (सिव्हिल इंजिनिअरिंग) ८ पदे.
  • वैज्ञानिक-B (इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन) ३ पदे.
  • असिस्टंट डायरेक्टर ७ पदे.

हेही वाचा…IBPS Recruitment 2024: बँकेत काम करायचंय? आयबीपीएस अंतर्गत ‘या’ विविध पदांवर भरती सुरू; असा करा अर्ज

पगार –

  • सहाय्यक संचालक – ५६,१०० ते १,७७,५००
  • स्पेशलिस्ट ग्रेड III – ६७,७०० ते २,०८,७००
  • वैज्ञानिक-B – ५६,१०० ते १,७७,५००
  • मानववंशशास्त्रज्ञ- ५६,१०० ते १,७७,५००
  • सहाय्यक कार्यकारी अभियंता ५६,१०० ते १,७७,५००

शैक्षणिक पात्रता –

१. वैज्ञानिक B – पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स किंवा बी.ई / बी टेक आणि दोन वर्षांचा अनुभव.

२. मानववंशशास्त्रज्ञ – अंतिम वर्षाच्या परीक्षेत भौतिक मानववंशशास्त्र किंवा जैविक मानववंशशास्त्र या विषयात पन्नास टक्क्यांहून अधिक गुण व मान्यताप्राप्त विद्यापीठाची मानववंशशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, मानववंशशास्त्रातील तीन वर्षांचा संशोधनाचा अनुभव.

३. सहाय्यक प्राध्यापक – एमबीबीएस पदवी, संबंधित स्पेशॅलिटी किंवा सुपर स्पेशालिटीमधील पदव्युत्तर पदवी आणि तीन वर्षांचा अनुभव

अर्ज फी –

  • सर्व उमेदवारांसाठी २५ रुपये.
  • एससी / एसटी / पीडब्ल्यूडी व महिला उमेदवारांना कोणतीही फी भरायची नाही.

अधिक माहितीसाठी खाली दिलेली अधिसूचना एकदा वाचून घ्यावी.

लिंक – https://upsc.gov.in/sites/default/files/AdvtNo_06-2024_Eng_22032024.pdf

उमेदवार खाली दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करू शकतात.

लिंक – https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php

अर्ज कसा करावा –

  • upsconline.gov.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • भरती (Recruitment) बटणावर क्लिक करा.
  • स्पेशलिस्ट आणि इतर पदांसाठी अर्ज करा, टॅबवर क्लिक करा.
  • सूचना वाचा आणि अर्ज भरा. सबमिशन केल्यावर एक Unique क्रमांक तयार केला जाईल.
  • आवश्यक फी भरा (जेथे लागू असेल).
  • भविष्यातील संदर्भासाठी अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंटआऊटसुद्धा घ्या, तर अशाप्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc recruitment for 147 post apply online candidates can check the notification online application link and salary asp