UPSC NDA 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी (NA) २०२३ परिक्षेसाठी (NDA/NA- II) अधिकृत अधिसुचना जाहीर केली आहे. यूपीएससी एनडीए/ एनए नोटिफिकेशन आयोगाने अधिकृत वेबसाईट upsconline.nic.inवर उपलब्ध आहे. जे तरुण या भरतीसाठी इच्छूक आहे ते आयोगाच्या अधिकृक संकेत स्थळाला भेट देऊ ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवा ६ जून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमीची परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोग ३ सप्टेंबरला एनडीए/एनए २ परिक्षा २०२३ आयोजित करणार आहे ज्यामध्ये १५२ व्या कोर्ससाठी एनडीएच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शाखेमध्ये प्रवेश मिळेल आणि २ जुलै २०२४ पासून सुरु होणाऱ्या ११४व्या भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रम अंतर्गत परिक्षा आयोजित केली जाईल.

icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
suspension of recruitment in Chandrapur district bank due to Congress raise issue of recruitment in campaign
नोकरभरतीचा मुद्दा प्रचारात आणणारा काँग्रेस पक्ष तोंडघशी, चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीला स्थगिती
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं

हेही वाचा – ISRO VSSC Recruitment 2023: टेक्निशिअनसह इतर पदांसाठी होणार भरती, २३ मे पर्यंत करु शकता अर्ज

यूपीएससी एनडीए भरतीचे तपशील

यूपीएससीच्या भरती प्रक्रियेअंतर्गत एनडीएमध्ये ३६० पदांची भरती होईल ज्यापैकी २०८ पदे लष्करसाठी, ४२ पदे नौदलासाठी आणि १२० पदे हवाई दलासाठी निवडली जातील. तर नौदल अकादमीसाठी ( १०+२ उमेदवार प्रवेश योजना) २५ पदांची भरती होईल ज्यापैकी ७ पदे महिला उमेदवारांसाठी असणार आहे.

एनडीएसाठी शैक्षणिक पात्रता

केवळ अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार ज्यांचा जन्म २ जानेवारी २००५ च्या आधी आणि १ जानेवारी २००८ च्या नंतर झाला आहे ते यासाठी अर्ज करू शकता.

एनडीएच्या लष्कर शाखेसाठी पात्र उमेदवाराचे शालेय शिक्षण १० + 2 पॅटर्नमधून १२वी पास असावे किंवा राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाद्वारे घेण्यात येणारी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – पदवीधरांना भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, ३७२ पदांसाठी होणार भरती, महिलांना विशेष सूट

एनडीएच्या हवाई दल आणि नौदला शाखेसाठी आणि एनएमध्ये १०+२ उमेदवार प्रवेश योजनेसाठी पात्र उमेदवाराचे शालेय शिक्षण१० + 2 पॅटर्ननुसार भौतिक, रसायन, विज्ञान आणि गणितया विषयांसह १२वी पास असावा. १२वीमध्ये या समकक्ष परिक्षेत समाविष्ट होण्यासाठी उमेदवार या परिक्षेसाठी अर्ज करू शकतात.

UPSC NDA 2023: नोटिफिकेशन – https://upsc.gov.in/sits/default/files/Notif-NDA-II-23-engl-170523.pdf

एनडीएसाठी अर्ज शुल्क

सामान्य गटातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर एसीसी, एसटी आणि Sons of JCOs/NCOs/ORs यांना अर्ज शुल्कामध्ये सुट दिली आहे.