UPSC Success Story: भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न असंख्य मुले-मुली पाहतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. त्यासाठी दिवस-रात्र ते प्रचंड मेहनतही घेतात. काही जण कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनच यूपीएससी परीक्षेच्या तयारीला लागतात. बऱ्याचदा काहींना यात लवकर यश मिळत नाही; पण काही जण असेदेखील असतात, जे मेहनतीच्या जोरावर पहिल्या प्रयत्नातच यश मिळवितात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यामध्ये उत्तीर्ण होण्याचे दोन मार्ग आहेत; ते म्हणजे कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय. मनोज कुमार रॉय यांनी हे दोन मार्ग पार केले आणि आज ते आयएएस अधिकारी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गरीब कुटुंबातून आलेले मनोज कुमार रॉय हे बिहारमधील सुपौल या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबात नेहमीच पैशाची कमतरता होती त्यामुळे अभ्यासापेक्षा घर चालवणं महत्त्वाचं होतं. १९९६ मध्ये मनोज दिल्लीत आला. खेड्यातील मुलासाठी दिल्लीसारख्या मोठ्या शहरात राहणे सोपे नव्हते. पण त्यांनी हार मानली नाही. अनेक प्रकारची कामे केली.अनेक प्रयत्नांनंतर त्यांनी अंडी आणि भाजीपाला विकण्यास सुरुवात केली. तसेच कार्यालयात झाडू मारला. त्यांनी यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात AIR-८७० रँक मिळवला. चला तर जाणून घेऊयात बिहारच्या मनोज कुमार राय यांची यशोगाथा.

एकदा मनोज कुमार जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) कुणालातरी काही वस्तू देण्यासाठी गेले होते. तोच क्षण ठरला जिथून मनोज कुमार यांचं आयुष्यच बदलून गेलं. आता तुम्ही म्हणाल जवाहरलाल नेहरू विद्यापीठात नक्की काय झालं..तर विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी त्यांना यूपीएससीबाबत सांगितले. मनोज सांगतात, ‘त्यांनी मला माझा अभ्यास पूर्ण करण्याचा सल्ला दिला. पदवी मिळाल्याने चांगली नोकरी मिळेल असे मला वाटले. म्हणून मी श्री अरबिंदो कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि माझे बीए पूर्ण केले. या काळातही मी अंडी आणि भाजीपाला विकणे सुरू ठेवले.

ग्रॅज्युएशननंतर त्यांनी २००१ मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. मात्र, यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात ते अपयशी ठरले. त्यांच्या दुसऱ्या प्रयत्नात इंग्रजी भाषा त्याच्यासाठी मोठा अडथळा ठरली. भाषेचे पेपर हे पात्रता पेपर असतात ज्यांचे गुण अंतिम गुणपत्रिकेत जोडले जात नाहीत. मी इंग्रजीचा पेपर पास करू शकलो नाही आणि माझी वर्षभराची मेहनत वाया गेली. तिसऱ्या प्रयत्नातही त्यांना मुख्य परीक्षा आणि मुलाखत पास करता आली नाही. यानंतर, जिद्द आणि आशेने त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी चौथा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपली शिकण्याची शैली बदलली.

हेही वाचा >> ESIC Recruitment: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी; ५६ हजार रुपये पगार अन् १५ पदांसाठी भरती

‘ही’ रणनीती प्रभावी ठरली

ते सांगतात, ‘प्रिलिम परीक्षेचा अभ्यास करण्याऐवजी मी मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आधी पूर्ण केला. असे करून, मी प्राथमिक परीक्षेचा ८० टक्के अभ्यासक्रम स्वतःहून कव्हर केला. मी इयत्ता ६ ते १२ च्या पाठ्यपुस्तकांचाही अभ्यास केला. यामुळे सामान्य अध्ययनासाठी आवश्यक असलेल्या माझ्या मूलभूत संकल्पना मजबूत झाल्या. ही रणनीती प्रभावी ठरली आणि मनोजने शेवटी २०१० मध्ये यूपीएससी परीक्षा ८७० रँकसह उत्तीर्ण केली. त्यांची पहिली पोस्टिंग राजगीर ऑर्डनन्स फॅक्टरी, नालंदा, बिहार येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून झाली.आपल्या संघर्षाची जाण ठेवून मनोजने आपल्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग देण्याचा निर्णय घेतला. यासाठी तो वीकेंडला नालंदा ते पाटणा असा ११० किलोमीटरचा प्रवास करत असे.सध्या, मनोज आयओएफएस, कोलकाता येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत आणि प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही कसे यशस्वी होऊ शकता याचे ते जिवंत उदाहरण आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc success story from egg seller to civil servant bihar mans inspiring journey to upsc success who now also gives free ias coaching srk