UPSC Success Story: भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न असंख्य मुले-मुली पाहतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. त्यासाठी दिवस-रात्र ते प्रचंड मेहनतही घेतात. काही जण कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनच यूपीएससी परीक्षेच्या तयारीला लागतात. बऱ्याचदा काहींना यात लवकर यश मिळत नाही; पण काही जण असेदेखील असतात, जे मेहनतीच्या जोरावर पहिल्या प्रयत्नातच यश मिळवितात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यामध्ये उत्तीर्ण होण्याचे दोन मार्ग आहेत; ते म्हणजे कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय. प्रिंस कुमार यांनी हे दोन मार्ग पार केले आणि आज ते आयएएस अधिकारी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गरिबीवर मात करत आयएएस अधिकारी

बिहारमधील प्रिन्स कुमार यांनी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी त्यावर मात करत दुप्पट मेहनत करून सरकारी नोकरीची तयारी केली. या खडतर प्रवासात जेव्हा जेव्हा त्यांचे धैर्य कमी होत होते, तेव्हा त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांनी त्यांना पुन्हा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. दरम्यान, त्यांचा सरकारी नोकरीच्या दिशेने सुरू झालेला प्रवास सोपा नव्हता. प्रिन्स कुमार सिंह यांचा जन्म बिहारमधील रोहतास येथे झाला. प्रिन्स मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले असून त्यांचे वडील आसाम रायफल्समध्ये हवालदार आहेत आणि आई गृहिणी आहे.

नोकरीचा राजीनामा देऊन यूपीएससी परीक्षेची तयारी

प्रिन्स कुमार सिंह यांनी त्यांचे शालेय शिक्षण बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील भभुआ येथून केले. यानंतर त्यांनी एनआयटी जालंधर (पंजाब) येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केले. ते २०१६-२०२० च्या बॅचचे विद्यार्थी होते. पदवी घेतल्यानंतर त्यांनी गुजरातमधील रसायन उद्योगात आठ महिने काम केले. त्यानंतर मार्च २०२१ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. पुढचे एक वर्ष त्यांनी अनेक परीक्षा दिल्या, पण एकाही परीक्षेत ते यशस्वी होऊ शकले नाही.

स्पर्धा परीक्षेतून माघार घ्यायला निघालेले

प्रिन्स कुमार सिंग दोन वर्षांच्या मेहनतीनंतर अनेक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी ठरले. त्यांनी SSC CGL २०२२ मध्ये ऑल इंडिया रँक १७७ मिळवला होता. यासह त्यांना दिल्लीत असिस्टंट ऑडिट ऑफिसर म्हणून सरकारी नोकरी मिळाली. त्यानंतर ६७ व्या बीपीएससी परीक्षेत त्यांना २२२ रँकसह बीडीओ पदावर पोस्टिंग मिळाली. त्यानंतर अखेर २०२३ मध्ये त्यांनी UPSC CSE मुलाखतीचा टप्पा गाठला. त्याचवर्षी त्यांनी UPSC IFS परीक्षेत १५ वा क्रमांक मिळवला. प्रिन्स कुमार सिंग यांनी तीन वेळा यूपीएससीची परीक्षा दिली होती. पहिल्या दोन प्रयत्नांत ते यूपीएससी प्रिलिम्स परीक्षाही उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेचा विचार डोक्यातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यावेळी त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांनी त्यांना खूप प्रोत्साहन दिले. त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी एक महिन्यानंतर पुन्हा तयारी सुरू केली. दरम्यान, आज प्रिन्स बिहारमध्ये BDO म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. यूपीएससीकडून ऑफर लेटर येताच ते IFS अधिकारी म्हणून प्रशिक्षणासाठी मसुरी येथील LBSNAA येथे जातील.

हेही वाचा >> Success Story: चहा विकून मजुराचा मुलगा झाला आयएएस अधिकारी; वडिलांच्या कष्टाचं सोनं करणाऱ्या हिमांशू गुप्ताची संघर्ष कहाणी

जिद्द असेल तर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता. काही लोक म्हणतात की, ज्यांच्याकडे कोचिंगसाठी पैसे आहेत तेच आयएएस होऊ शकतात. गरिबीचा सामना करणाऱ्या किंवा कमी पैशांत जगणाऱ्या मुलासाठी हे खूप अवघड आहे. पण, असं नाही हे प्रिन्स कुमार सिंग यांनी सिद्ध केलं आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc success story meet man who faced financial difficulties in childhood left job for competitive exams cleared upsc srk