UCIL recruitment 2023: युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने ग्रुप ए आणि बी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. याअंतर्गत जनरल मॅनेजर आणि डेप्युटी जनरल मॅनेजरसह अन्य पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट usil.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ ऑगस्ट २०२३ आहे. उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
UCIL भरती 2023: UCIL भरती रिक्त जागा तपशील
या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १२२ पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये ग्रुप ए ४४ आणि ग्रुप बी ७८ पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की त्यांनी प्रथम अधिकृत अधिसूचना पूर्णपणे वाचा आणि नंतर अर्ज करा, कारण अर्ज भरताना काही चूका आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.
UCIL भरती 2023: हे शुल्क UCIL भरतीसाठी भरावे लागेल
UCIL ने जारी केलेल्या माहितीनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल (UR), EWS आणि OBC (NCL) श्रेणीतील अर्जदारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, SC/ST/PWBD/महिला प्रवर्गांतर्गत येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
अधिसुचना – https://ucil.gov.in/pdf/job/Advt_04%20of%202023_final.pdf
UCIL recruitment 2023: UCIL भरतीसाठी अर्ज कसा करावा
UCIL भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट-www.uraniumcorp.in वर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात ‘अर्ज’ भरून या पदांसाठी अर्ज करावा. उमेदवारांनी विहित नमुन्यात टाइप केलेला ‘अर्ज ‘ अधिसूचनेत नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावा लागेल. शिवाय, या भरतीशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासणे आवश्यक आहे.