केतन जोशी, संज्ञापन आणि समाजमाध्यम क्षेत्र तज्ज्ञ
आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातील बहुतांशी वेळ हा मोबाइल, समाजमाध्यम यांच्यावर घालवतो. मात्र आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. त्या फक्त योग्य पद्धतीने जाणून घेतल्या पाहिजे. विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य आणि विज्ञान या पैकी कोणत्याही शाखेत करिअर करण्याचे ठरविले तरी तंत्रज्ञान अवगत असणे सद्यस्थितीत काळजी गरज आहे. मागील काही वर्षांपासून तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडले आहेत. यामुळे या करिअर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना आणि यात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटत आहे की आपली नोकरी जाणार. हा समज चुकीचा आहे. मात्र, बदलत्या तंत्रज्ञानानुसार सर्वाना स्वत:ला अपडेट करणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.
विश्लेषणात्मक विचार, सक्रिय शिक्षण, समस्या सोडविणे, वस्तुनिष्ठ विश्लेषण, सर्जनशीलता, नेतृत्व, तंत्रज्ञानाशी मैत्री, तंत्रज्ञान समजून घेणे या सर्व गोष्टी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजून घेणे महत्त्वाचे आहे. सोशल, डिजिटल, आर्टिफिशियल आणि व्हच्र्युयल या क्षेत्रांमध्ये अनेक करिअर संधी आहेत. यातील सोशल मीडिया अर्थातच समाजमाध्यम क्षेत्रात ग्राफिक डिजाईन, अॅनिमेशन, वेबसाईट डिजाइन, अॅप्लिकेशन डिजाइन, युजर एक्सपीरियन्स डिझायिनग, युजर इंटरफेस डिजाइन, कोडिंग यांसारख्या अनेक संधी आहेत. याच बरोबर सोशल मीडिया मॅनेजर यामध्येही करिअरची उत्तम संधी आहे. यासाठी अनेक शैक्षणिक संस्था आहेत. तसेच ऑनलाइन पद्धतीनेही याबाबत अनेक कोर्स उपलब्ध आहेत. या सर्व गोष्टींसाठी मजकूर महत्त्वाचा असतो यामुळे यात कॉपी रायटिंग अर्थातच सर्जनशील लिखाणाच्या संधीही याद्वारे उपलब्ध आहेत. याबरोबरच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करायचे असल्यास विद्यार्थ्यांनी कोणीतही कोडिंग लँग्वेज शिकणे गरजेचे आहे.
प्रोग्रामिंग भाषा विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान समजून घेण्यास महत्वाची मदत करते. यामुळे ही भाषा शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. युजर एक्सपीरियन्स डिझायिनग मध्ये मोठी संधी आहे. यामध्ये सध्या काही हजार लोक काम करत आहे. मात्र काही लाखांमध्ये याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याकडे करिअरची एक चांगली संधी म्हणून पाहायला हवे. यासाठी गुगलकडून कोर्स देखील उपलब्ध आहे. याबरोबरच सध्याच्या जगात मशीन लर्निग हे एक नवीन करिअर संधी उपलब्ध झाली आहे.
सध्या सगळीकडे एका विषयाची अथवा करिअरची चारचा होत आहे ते म्हणजे आर्टिफिशीयल इंटिलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमता. यामध्ये आर्टिफिशीयल इंटिलिजन्स रिसर्च सायंटिस्ट ही एक उत्तम करिअर संधी ठरू शकते. यासाठी अभियांत्रिकीमधली पदवी गरजेची आहे. तसेच आर्टिफिशीयल इंटिलिजन्स सल्लागार यांसारख्या संधीही आहेत.