IB Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने विविध पदांच्या एकूण ६६० रिक्त जागांसाठी भरतीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भरती प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करू शकणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

IB Recruitment 2024: या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

रिक्त पदे आणि पदसंख्या –

असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर (ACIO), कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (JIO), सुरक्षा सहाय्यक (SA) आणि इतर विविध
पदांच्या रिक्त जागांसाठी ही भरती मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर I {Exe} – ८० पदे.
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर II { Civil works } – ३ पदे.
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजेंस ऑफिसर II { Exe } – १३६ पदे.
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी -I {MT} – २२ पदे.
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी-I {Exe} – १२० पदे.
शेफ (लेव्हल ३) – १० पदे.
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी {Exe} – १७० पदे.
केअरटेकर (लेव्हल ५) – ५ पदे.
सुरक्षा सहाय्यक {Exe (लेव्हल 3) } – १०० पदे.
पर्सनल असिस्टंट (लेव्हल ७) – ५ पदे.
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी II {Tech (लेव्हल ७) } – ८ पदे.
प्रिंटिंग प्रेस ऑपरेटर (Printing-Press-Operator) (लेव्हल २) – १ पदे.

हेही वाचा…Pawan Hans Bharti 2024: पवन हंस अंतर्गत ‘या’ पदासाठी होणार भरती; चार लाखांपर्यंत मिळणार पगार, असा करा अर्ज

शैक्षणिक पात्रता –

या भरतीच्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि संपूर्ण अधिकृत जाहिरात नीट वाचून घ्यावी. खालील लिंकद्वारे अधिकृत अधिसूचना डाउनलोड करा:

लिंक – https://www.mha.gov.in/sites/default/files/IBCircular_15032024.pdf

अर्ज कुठे पाठवायचा ?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज कागदपत्रांसह ६० दिवसांच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.
पत्ता -डायरेक्टर/जी-३, इंटेलिजन्स ब्युरो, गृह मंत्रालय, ३५ एसपी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली-११००२१. तर अशाप्रकारे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vacancies 2024 intelligence bureau recruitment for 660 various posts read for how to apply and other details her asp