Indian Railways Recruitment 2024 : अनेकांचे रेल्वे विभागात नोकरी करण्याचे स्वप्न असते. आता रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. मात्र २३,७२३ पदांची रिक्त जागा कमी केल्यानं उमेदवारांनी निराशा व्यक्त केली आहे. रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया ११५८८ पदांसाठी असणार आहे. त्यापैकी ८११३ पदे पदवीधर प्रवर्गासाठी आणि ३४४५ पदे पदवीपूर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी आहेत.

ही भरती प्रक्रिया १४ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे तर १३ ऑक्टोबर रोजी बंद होणार आहे.रेल्वे विभागाकडून ही भरती प्रक्रिया ११५८८ पदांसाठी असणार आहे. तर पदवीपूर्व पदांसाठी अर्ज प्रक्रिया २१ सप्टेंबरपासून सुरू झाली आणि २० ऑक्टोबर २०२४ रोजी संपेल.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ

मात्र, यंदा कमी झालेल्या ओपनिंगबाबत सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात आहे. २०१९ च्या तुलनेत यावर्षी कमी रिक्त जागा काढल्याबद्दल नेटिझन्सनी रेल्वेवर टीका करत हे अत्यंत अन्यायकारक असल्याचं म्हटले आहे. त्यांनी रेल्वेकडे रिक्त जागा वाढवण्याची मागणीही केली आहे. २०१९ मध्ये रिक्त पदांची संख्या ३५,२८१ होती जी यावर्षी ११,५५८ इतकी कमी झाली आहे.

उमेदवारांनी निराशा केली व्यक्त

जागा कमी केल्यामुळे उमेदवारांनी सोशल मीडियावर निराशा व्यक्त केली आहे. एका युजरने एक्स या सोशल मीडिया हँडलवर लिहिलं, “महागाई वाढत आहे, जमिनीच्या किमती वाढत आहेत! सगळं वाढत आहे मात्र जर कमी होत असेल तर ती फक्त रेल्वेच्या रिक्त पदे आहेत. दर पाच वर्षांनी होणाऱ्या भरतीमुळे रिक्त जागा कमी झाल्याबद्दल आणखी एका वापरकर्त्याने नाराजी व्यक्त केली. “रेल्वे NTPC भरती: २०१९: ३५,२८१ पदे, २०२४: ११,५५८ पदे. आधीच ५ वर्षे वाट पाहणे आणि केवळ काही हजार पदे देणे म्हणजे तरुणांच्या भविष्याशी गद्दारी आहे असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय.

पाहा ट्विट

हेही वाचा >> ओडिशा पोलीस कॉन्स्टेबल भरती; १,३६० पदांसाठी अर्ज सुरू, ६९ हजारापर्यंत मिळणार पगार, अर्जप्रक्रिया जाणून घ्या

रिक्त पदासाठी पात्रता निकष:

वयोमर्यादा:

पदवीधर पदे: १८ ते ३६ वर्षे

पदवीपूर्व पदे: १८ ते ३३ वर्षे