सुहास पाटील
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ‘ज्युनियर कोर्ट अटेंडंट (कुकिंग नोईंग)’च्या एकूण ८० पदांची भरती. ( No. F3/2024- SCA(RC) dt. 17 th August 2024).
पदाचे नाव :- ‘ज्युनियर कोर्ट अटेंडंट (Cooking Knowling)’. वेतन श्रेणी – पे-लेव्हल – ३ रु. २१,७००, अंदाजे वेतन दरमहा रु. ४६,२१०/-.
पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि किमान 1 वर्ष कालावधीचा कुकिंग/कलिनरी आर्ट्समधील डिप्लोमा. (माजी सैनिक कुकिंग/कॅटरिंग क्षेत्रातील कॉम्पिटंट अथॉरिटीने दिलेले ट्रेड/ कॉम्पिटन्सी सर्टिफिकेट)
अनुभव : प्रतिष्ठित हॉटेल/ रेस्टॉरंट/ शासकीय विभाग/ सरकारी उपक्रम येथील ३ वर्षांचा कुकिंग कामाचा अनुभव.
वयोमर्यादा : (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) १८ ते २७ वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे) (विधवा/ घटस्फोटीत/ कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला – खुला गट – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे).
हेही वाचा >>> Success Story: ज्या शेतात आई शेतमजूरी करत होती, ती शेती विकत घेतली; सांगलीच्या मराठी माणसाची यशोगाथा
निवड पद्धती : (१) ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षा (इंग्लिश/ हिंदी भाषेतील प्रश्नपत्रिका) १०० गुणांसाठी (जनरल नॉलेज – ३० गुण व कुकिंग कलिनरी आर्ट्स – ७० गुण) वेळ ९० मिनिटे. चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
(२) प्रॅक्टिकल ट्रेड स्किल टेस्ट इन कुकिंग – ७० गुण.
(३) इंटरव्ह्यू – ३० गुण, एकूण २०० गुण. पात्रतेसाठी किमान ६० टक्के गुण मिळविणे आवश्यक. लेखी परीक्षा, स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यूच्या तारखा सुप्रीम कोर्टाचे वेबसाईट्र्र www.sci.gov.in वर प्रसिद्ध केल्या जातील. याची सूचना उमेदवारांना एसएमएस आणि ई-मेलद्वारे पाठविली जाईल.
परीक्षा केंद्र : नागपूर, मुंबई, अहमदाबाद, बेंगळूरु, भोपाळ, हैदराबाद इ. एकूण १७ केंद्र. ऑनलाइन अर्जात ३ परीक्षा केंद्रांसाठी पसंतीक्रम द्यावयाचा आहे.
अर्जाचे शुल्क : रु. ४००/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सैनिक/ विधवा, घटस्फोटीत, कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला यांना रु. २००/-) ऑनलाइन अर्ज http://www.sci.gov.in या संकेतस्थळावर दि. १२ सप्टेंबर २०२४ (२४.०० वाजे) पर्यंत करावेत.