भारतीय विद्यार्थ्यांचा उच्चशिक्षण घेण्यासाठी परदेशाकडे ओढ असण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे तिथे उपलब्ध असलेले विषयांचे अमर्याद पर्याय. कोणतीही विद्याशाखा असू दे अमेरिकेपासून ते युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियापर्यंत प्रत्येक देशात त्या विद्याशाखेतील विषयांचे वा उप-विषयांचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय विद्यापीठांसारखेचपरदेशी विद्यापीठांमध्येही विद्याशाखांनुसार स्वतंत्र विभाग असतात त्यांना स्कूल्स असे संबोधले जाते. जवळपास सर्व परदेशी विद्यापीठांमध्ये कला आणि सामाजिक विज्ञान, माध्यमशास्त्र, मानववंशशास्त्र, मुलभूत विज्ञान, अभियांत्रिकी, आरेखन (आर्किटेक्चर), डिझाईन, कायदा, प्रशासन, आरोग्य, व्यवस्थापन व उद्याोजकता इत्यादी प्रमुख विभाग आढळतात. काही विद्यापीठांमध्ये या सर्व अभ्यासक्रमांसह वैद्याकीय अभ्यासक्रम स्वतंत्रपणे उपलब्ध असतो. परदेशातील वाढत्या औद्याोगिकीकरणाची गरज म्हणून जवळपास सर्वच परदेशी विद्यापीठे ही तेथील उद्याोगक्षेत्राशी जोडली गेली. म्हणूनच तिथल्या बहुतांश विद्यापीठांना उद्याोगक्षेत्राकडून वारंवार आर्थिक मदत केली जाते. एवढेच नव्हे तर परदेशातील बहुतांश विद्यापीठे ही स्वायत्त असल्याने त्यांचा अंतिम अभ्यासक्रम निश्चित करण्यामध्ये उद्याोग व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांचा सहभाग असतो. परदेशातील प्रत्येक विद्यापीठ हे संशोधन विद्यापीठ असते. अभियांत्रिकी आणि मुलभूत विज्ञान या विषयांतील शिक्षण-संशोधनावरती तिथल्या बऱ्याच विद्यापीठांचा भर जरी असला तरी या विद्यापीठांनी साहित्य, अर्थशास्त्र, भाषा, उद्याोग-व्यवसाय आणि व्यवस्थापन या विभागांमध्येही उत्कृष्ट संशोधन केल्याचे आढळून येते.

परदेशातील बहुतांश विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रम चार वर्षाचे असतात तर पदव्युत्तर अभ्यासक्रम वेगवेगळ्या कालावधीचे असतात. परदेशी विद्यापीठांमध्ये असलेल्या प्रमुख शैक्षणिक विभाग म्हणजेच स्कूल्सच्या माध्यमातून सर्व पदवी व पदव्युत्तर विभाग चालतात. या सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक आणि संशोधन पातळीवरील शेकडो अभ्यासक्रमांचे सर्टिफिकेट, ऑनलाइन व ऑफलाइन पर्याय परदेशी विद्यापीठांनी उपलब्ध करून दिले आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांचा उच्चशिक्षण घेण्यासाठी परदेशाकडे ओढ असण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे तिथे उपलब्ध असलेले विषयांचे अमर्याद पर्याय. कोणतीही विद्याशाखा असुदे अमेरिकेपासून ते युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियापर्यंत प्रत्येक देशात त्या विद्याशाखेतील विषयांचे वा उप-विषयांचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. भारतातील क्वचितच एखाद्या विद्यापीठात विषयांची इतकी उपलब्धता मिळेल. उदाहरणार्थ, आयव्ही लीगपैकी एक विद्यापीठ म्हणजे एमआयटी. एमआयटी विद्यापीठामध्ये विविध स्कूल्स्पैकी स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लॅनिंगच्या अंतर्गत सेंटर फॉर रियल इस्टेट, मिडिया आर्ट्स अँड सायन्सेस, अर्बन स्टडीज अँड प्लॅनिंग हे विभाग तर स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अंतर्गत एअरोनॉटिक्स अँड अॅस्ट्रोनॉटिक्स, बायोलॉजीकल इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हील अँड एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स, हार्वर्ड-एमआयटी हेल्थ सायन्सेस अँड टेक्नोलॉजी, इन्स्टिट्यूट फॉर डेटा, सिस्टम्स अँड सोसायटी, मटेरियल्स सायन्स अँड इंजिनीअरिंगग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, न्युक्लिअर सायन्स अँड इंजिनीअरिंग हे विभाग येतात.

याशिवाय स्कूल ऑफ ह्युमॅनिटीज, आर्ट्स अँड सोशल सायन्सेसअंतर्गत कंपॅरेटिव्ह मिडिया स्टडीज, इकोनॉमिक्स, हिस्टरी, अँथ्रॅपॉलॉजी-सायन्स-टेक्नोलॉजी अॅण्ड सोसायटी, लिंग्विस्टिक अँड फिलोसॉफी, पॉलिटिकल सायन्स, सायन्स रायटिंग इत्यादी विभाग, स्कूल ऑफ सायन्सेसअंतर्गत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स, ब्रेन अँड कॉग्निटिव्ह सायन्स, अर्थ, अॅटमॉसफिअरिक अॅँड प्लॅनेटरी सायन्स तर स्कूल ऑफ मॅनेजमेंटअंतर्गत एमआयटी स्लोआन एक्झिक्युटिव्ह एमबीए प्रोग्राम, एमआयटी स्लोआन फेलोज एमबीए प्रोग्राम, एमआयटी स्लोआन एमबीए प्रोग्राम, एमआयटी स्लोआन पीएचडी प्रोग्राम, एमआयटी स्लोआन मास्टर ऑफ बिझनेस अॅनॅलिटिक्स, एमआयटी स्लोआन मास्टर ऑफ फायनान्स, एमआयटी स्लोआन मास्टर ऑफ सायन्स इन मॅनेजमेंट स्टडीज इत्यादी अभ्यासक्रम आणि विभाग आहेत.

विषयांची अशीच उपलब्धता आणि विभागांची रचना थोड्याफार फरकाने प्रत्येक विद्यापीठामध्ये असते. सर्वसाधारणपणे प्रत्येक विद्यापीठामध्ये अँथ्रॅपॉलॉजी, इकॉनॉमिक्स, हिस्टरी, लिंग्विस्टिक्स, फिलोसॉफी, पॉलिटिकल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स, म्युझिक, इंग्लिश, सायकोलॉजी, मटेरियल्स सायन्स अॅँड इंजिनीअरिंग, एअरोनॉटिक्स अँड अॅस्ट्रोनॉटिक्स, बायोइंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, सिव्हील अँड एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट सायन्स अँड इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल इंजिनीअरिंग यांपैकी बहुतांश विषय असतात. तर काही विद्यापीठांमध्ये अर्थ सिस्टम सायन्सेस, अर्थ, एनर्जी अॅँड एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, एनर्जी रिसोर्सेस इंजिनीअरिंग, जिओफिजिक्स आणि जिओलॉजीकल सायन्सेस यांसारखे थोडेसे हटके वाटणारे आणि वैद्याकीय शाखेअंतर्गत अॅनेस्थेशिया, जेनेटिक्स, सर्जरी, हेल्थ रिसर्च, बायोइंजिनियरिंग, न्युरोलॉजी, न्युरोबायोलॉजी इत्यादी विषय आढळतात.

भारतीय विद्यापीठांच्या तुलनेत विषयांची एवढी रेलचेल व वैविध्य परदेशी विद्यापीठांमध्ये सहजपणे आढळते. त्याचबरोबर परदेशी विद्यापीठे दोन वेगवेगळ्या शाखांमधील विषय एकत्रित करण्यात लवचिकता दाखवतात. आपल्याकडे विज्ञान शाखा म्हणजे फक्त त्यातलेच विषय शिकावे लागतात. अमेरिकेतली सर्वच विद्यापीठांत विद्यार्थ्यांचे प्रमुख विषय म्हणजे मेजर्स आणि अतिरिक्त विषय म्हणजे मायनर्स हे वेगवेगळ्या विद्याशाखांमधील असतात. जसे की एनव्हायर्नमेंटल स्टडीज आणि कॉग्निटिव्ह सायन्स किंवा क्रिएटिव्ह आर्ट्समध्ये फिल्म स्टडीज आणि गेम डिझाईन इत्यादी अनेक वेगवेगळ्या विषयांची जोडणी परदेशी विद्यापीठांमध्ये आढळते.

हार्वर्डसाठी…

विद्यार्थीमित्रांनो, मोकळ्या वेळेत सहजच हार्वर्ड विद्यापीठाच्या https:// www. harvard. edu/ programs/? degree_ levels= undergraduate या लिंकवर भेट द्या. हार्वर्ड विद्यापीठामध्ये उपलब्ध असलेल्या विविध विषयांची माहिती तुम्हाला मिळेल.

theusscholar@gmail.com