VVCMC Recruitment 2023: वसई विरार शहर महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कारण महानगरपालिकेने आता काही पदांसाठी भरती जाहीर केली असून, भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२३ अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ)’ पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
वसई विरार शहर महानगरपालिका भरती २०२३ –
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी (बधिरीकरण तज्ञ) पूर्ण वेळ.
एकूण रिक्त पदे – ४
शैक्षणिक पात्रता – M.D (अनेस्थेशिया) किंवा MBBS + D.A (डिप्लोमा इन अनेस्थेशिया) + ३ वर्षे अनुभव + महाराष्ट्र मेडिकल/इंडियन मेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन.
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – २१ ते ४० वर्षे.
- मागासवर्गीयांना – ५ वर्षे सूट असणार आहे.
अर्ज फी – कोणतीही फी नाही.
हेही वाचा- भारतीय नौदलात अग्निवीर एमआर पदांसाठी होणार भरती, ‘या’ तारखेपासून करु शकता अर्ज
नोकरी ठिकाण – वसई विरार.
मुलाखतीची तारीख वेळ आणि ठिकाण –
वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, बाजार वॉर्ड, विरार (पू).
महत्वाची तारीख –
- मुलाखतीची सुरवात – ३० जून २०२३ रोजी दुपारी १२ वाजता.
- मुलाखतीचा शेवट – ३० जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
अधिकृत बेवसाईट – https://vvcmc.in/
भरतीसंबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी महापालिका भरतीची (https://drive.google.com/file/d/1jHyL9YmtuzbER6keB3A6WWxdU_6ixO0c/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.