Viral Video of The Day : मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन आणि इन्फोसिस यांसारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न लाखो तरुण पाहतात. यासाठी कित्येक जण शाळेपासूनच तयारी सुरू करतात. परंतु हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, शैक्षणिकदृष्ट्या प्रतिभावान असणे, म्हणजे चांगले मार्क्स असतील तर या टॉप कंपन्यांमध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळेलच असे नाही. तुम्हाला मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करायची असेल तर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण डिजिटल युगात स्पर्धा खूप वाढली आहे. याबाबत गुगल सॉफ्टवेअर इंजिनीअर दीक्षा पांडे यांनी आपल्या लिंक्डइन प्रोफइलवर महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
दीक्षाचा दावा आहे की, तिला गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, गोल्डमन सॅक्स आणि इन्फोसिसकडून मुलाखतीसाठी किंवा ऑनलाइन मूल्यांकन (online assessment) लिंकसाठी कॉल आले आहेत. दीक्षाने जवळपास १०० वेगवेगळ्या कंपन्यांच्या करिअर पेजेसची सदस्यता घेतल्याचा दावा केला आहे. असे करण्याचा फायदा असा आहे की, यांपैकी कोणत्याही कंपनीमध्ये एखादी जागा भरायची असल्यास एखाद्याला लगेच मेलद्वारे सूचित केले जाईल.
त्यानंतर पोस्टमध्ये तिने हेदेखील उघड केले की, तिने विविध व्यवसायांद्वारे आयोजित केलेल्या असंख्य भरती मोहिमांमध्ये सहभाग घेतला होता. तिने HackerEarth आणि D2C सारख्या वेबसाइट्सची यादीदेखील केली ज्या नियमितपणे अशा स्पर्धा आयोजित करतात.
हेही वाचा – १० वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! सशस्त्र सीमा दलात ‘या’ पदांची मोठी भरती, पगार किती?
इंजिनीअर दीक्षा पांडेने टॉप कंपन्यांकडून मुलाखतीसाठी कॉल यावा यासाठी महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत.
- मी जवळपास १०० पेक्षा अधिक कंपन्यांच्या करिअर पेजेससाठी सब्स्क्राईब केले आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या कंपनीत नवीन जागेसाठी भरती होते तेव्हा मला त्याच्या अधिकृत मेलद्वारे नोटिफिकेशन मिळते.
- मी विविध कंपन्यांकडून भरतीसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धात्मक मोहिमांमध्ये जवळपास नेहमी सहभागी होते. काही प्रसिद्ध वेबसाईट आहेत ज्या नियमितपणे अशा स्पर्धा आयोजित करतात उदा. Hackerearth, D2C इत्यादी.
- मी अनेक हॅकाथॉन्समध्ये भाग घेतला आहे, ज्याने मला मुलाखतीसाठी कॉल मिळण्यात अप्रत्यक्षपणे मदत झाली. उदाहरणार्थ, मी ‘मायक्रोसॉफ्ट फिक्सथॉन’मध्ये भाग घेतला, ज्यामुळे अखेर मला मायक्रोसॉफ्टकडून मुलाखतीसाठी कॉल मिळविण्यात मदत झाली.
- कोणत्याही नोकरीच्या भरतीसाठी माझा रेझ्युमे देण्यापूर्वी, मी नोकरीच्या वर्णनानुसार माझ्या बायोडाटामध्ये बदल करते. मी माझ्या रेझ्युमेमध्ये जॉबवर्णनाशी संबंधित असलेले कीवर्ड जोडण्याचा प्रयत्न करते.
- मला जवळपास १००० वेळा रिजेक्शनचे मेल आले आहेत, पण त्यामुळे नवीन नोकरीसाठी अर्ज करणे मी थांबवलेले नाही. थोडक्यात सांगायचे तर, तुम्हाला जर एखाद्या कंपनीकडून काही प्रतिसाद येत नसेल तर खचून जाऊ नका. तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्ही अर्ज करता राहा, काय माहीत त्यांपैकी एक तुमच्यासाठी चांगली संधी घेऊन येईल.
हेही वाचा – DRDO Recruitment 2023: DRDO मध्ये विविध पदांसाठी होणार भरती, मुलाखती आधारे होईल उमेदवाराची निवड, ‘असा’ भरा अर्ज
दीक्षाने सर्वात शेवटी महत्त्वाची गोष्टी सांगितली ती म्हणजे संयमाने वागण्याचा सराव करा. त्यामुळेच हजारो रिजेक्शनचे मेल येऊनही मी सातत्याने नव्या नोकरीसाठी अर्ज करू शकले.