WB Police Recruitment 2023: पश्चिम बंगाल पोलीस भरती मंडळाने (WBPRB) १,४२० लेडी कॉन्स्टेबल रिक्त पदांच्या भरतीसाठी २३ एप्रिलपासून ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार त्यांचे फॉर्म wbpolice.gov.in आणि prb.wb.gov.in द्वारे जमा करू शकतात. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख तारीख २२ मे आहे. लेडी कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराची वयोमर्यादा १ जानेवारी २०२३ रोज पर्यंत किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. तुम्हालाही या पदांवर नोकरी मिळवण्यासाठी अर्ज करायचा असेल, तर खाली दिलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम बंगाल पोलीस भरतींतर्गत रिक्त पदांबाबत तपशीर

पोलीस आपल्या शाखेत १,४२० महिला कॉन्स्टेबलची भरती करण्याचा करणार आहेत. उमेदवार खाली श्रेणीनुसार रिक्त जागा तपासू शकतात:
अनारक्षित (UR) – ३४३
अनारक्षित (EC) – २२७
अनारक्षित (HG/NVF) – ११३
अनारक्षित (नागरी स्वयंसेवक) – ७१
अनारक्षित (क्रीडा कोटा.) – २८
अनुसूचित जाती – १४१
अनुसूचित जाती (EC) – १००
SC (HG/NVF) – ४२
अनुसूचित जाती (नागरी स्वयंसेवक) – २९
एसटी – २८
अनुसूचित जमाती (EC) – २९
अनुसूचित जमाती (HG/NVF) – १४
अनुसूचित जमाती (नागरिक स्वयंसेवक) – १४
ओबीसी-ए – ५७
OBC-A (E.C.) – ४२
OBC-A (HG/NVF) – २९
ओबीसी-ए (नागरी स्वयंसेवक) – १४
ओबीसी-बी – ४३
OBC-B (E.C) – २८
OBC-B (HG/NVF) – १४
ओबीसी-बी (नागरी स्वयंसेवक) – १४

पश्चिम बंगाल पोलीस भरतींतर्गत लेडी कॉन्स्टेबलला मिळणारा पगार

पश्चिम बंगाल पोलीस भरतींतर्गत लेडी कॉन्स्टेबलला मॅट्रिक्स स्तर ६ वेतननुसार, २२,७०० ते ५८,५०० रुपयांपर्यत पगार मिळू शकतात.

हेही वाचा : BARC Recruitment 2023: भाभा अणु संशोधन केंद्राद्वारे होणार बंपर भरती, ४३७४ जागांसाठी २४ एप्रिलपर्यंत करू शकता अर्ज

पश्चिम बंगाल पोलीस भरतींसाठी आवश्यक तारीख

पश्चिम बंगाल पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख- २३ एप्रिल
पश्चिम बंगाल पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख- २२ मे

पश्चिम बंगाल पोलीस भरतीसाठी अशी होईल उमेदवाराची निवड

या निकषांनुसार केली जाईल निवड
प्राथमिक लेखी परिक्षाशारीरिक मापन चाचणी (PMT)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
अंतिम लेखी परीक्षा
मुलाखत

पश्चिम बंगाल पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांची वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे दरम्यान असावी.

हेही वाचा : फक्त २५ रुपये अर्ज शुल्क भरून होऊ शकता सरकारी अधिकारी, तेही परिक्षेशिवाय; फक्त ‘ही’ अट करावी लागेल पूर्ण

पश्चिम बंगाल पोलीस भरतीसाठी येथे सूचना आणि अर्ज लिंक पहा

पश्चिम बंगाल पोलीस भरती २०२३ अधिसूचना – https://wbpolice.gov.in/wbp/common/WBP_RecruitmentNew.aspx
पश्चिम बंगाल पोलीस भरती २०२३ लिंक – https://wbpolice.gov.in/writereaddata/wbp/Information_to_Applicants_LC2023.pdf

पश्चिम बंगाल पोलीस भरतीसाठी पात्रता निकष

उमेदवारांनी पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाकडून किंवा त्याच्या समकक्ष माध्यमिक किंवा इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी . तसेच त्यांना बंगाली भाषा बोलता, वाचता आणि लिहिता येत असावी. पण, ही तरतूद दार्जिलिंग आणि कालिम्पॉंग जिल्ह्यांतील डोंगर उपविभागातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्यांना लागू होणार नाही.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wb police recruitment 2023 opportunity for women to get 1420 constable job in police department apply from today at wbpolice gov in snk