Western Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक सर्वात मोठी संधी चालून आली आहे. कारण आता पश्चिम रेल्वे मुंबई अंतर्गत (Western Railway Apprentice Bharti 2024) एक मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून अप्रेंटिस पदाच्या जवळपास पाच हजारांहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. पश्चिम रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने याबाबतची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे, त्यामुळे १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. या भरती प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २२ ऑक्टोबर २०२४ ही शेवटची तारीख आहे. पश्चिम रेल्वे भरती २०२४ साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. चला तर या भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम रेल्वे भरती २०२४ (Western Railway Recruitment 2024)

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

पश्चिम रेल्वे भरतीअंतर्गत एकूण ५०६६ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता (Western Railway Recruitment 2024 Educational Qualification)

या भरतीसाठी उमेदवार ५० टक्के गुणांसह १० वी पास असावा, तसेच त्याने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेला असणं गरजेचं आहे. आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे ही निवड केली जाणार आहे.

हेही वाचा – BMC Bharti 2024: मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी! दर महिना ९२ हजारापर्यंत पगार; ‘कोण’ करु शकतं अर्ज

वयाची अट (Western Railway Recruitment 2024 Age Limit)

खुला प्रवर्ग : १५ ते २४ वर्षे.
ओबीसी : ३ वर्षांची सूट.
मागासवर्गीय : ५ वर्षांची सूट.

भरतीसाठी पुढीलप्रमाणे अर्ज फी असणार आहे.

खुला/ ओबीसी प्रवर्ग : १०० रुपये.

मागासवर्गीय/ महिला/ PWD : कोणतेही शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा: (Western Railway Recruitment 2024 Important Dates)

अर्ज सुरू होण्याची तारीख :- २३ सप्टेंबर २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- २२ ऑक्टोबर २०२४

अर्ज कसा करावा ?

या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अधिकृत वेबसाइट –

wr.indianrailways.gov.in

भरतीसंबंधित सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.

Western Railway Recruitment 2024 Notification

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western railway recruitment 2024 for 5066 apprentice posts begin on september 23 at rrc wr com check details sjr