Maharashtra 10th Result 2023 Declared Date and Time: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२३ ला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थांसमोर आता पुढचा मोठा प्रश्न आहे तो करिअरचा. दहावीनंतर कोणते करिअर निवडावे याची चिंता विद्यार्थांना सतावत असते. प्रत्येकाला जास्त पगाराची नोकरी हवी असते पण आपल्या आवडीनुसार विद्यार्थ्यांनी करिअरची निवड केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रातील करिअरच्या संधी शोधल्या पाहिजेत. दहावीनंतर बहूतेक विद्यार्थी विज्ञान, वाणिज्य आणि कला यापैकी एक शाखा निवडतात आणि त्यानुसार करिअरसाठी पर्याय शोधतात. येथे आम्ही तज्ज्ञांनी सुचविलेले काही करिअरचे पर्याय दिले आहेत जे तुम्ही दहावीनंतर निवडू शकता.

अपग्रॅडस्टडीनुसार, (upGrad study) दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी येथे टॉप 10 करिअर पर्याय आहेत.

job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान
state govt form committee to study implementation sub classification in sc reservation sparks controversy
दलित मतदारांत दुभंग? आरक्षण उपवर्गीकरणाच्या हालचालींचे पडसाद निवडणुकीत उमटण्याची शक्यता
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
IDBI Bank Recruitment 2024: Registration Underway For 1000 Vacancies; Apply By November 16
युवकांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; आयडीबीआय बँकेत भरती; जाणून घ्या अर्ज कसा करायचा?
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?

१. मार्केटिंगमध्ये डिप्लोमा (Diploma in Digital Marketing)
दहावीनंतर तुम्ही हा कोर्स करू शकता याचा कालावधी १ ते ३ वर्षांपर्यंत असू शकतो. यामध्ये तुम्हाला मार्केटिंग कसे केले जाते याची सविस्तर माहिती मिळेल.
पगार : प्रतिवर्ष ३ ते १८ लाख रुपये पगार

२. बिझनेस अँडमिनस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा (Diploma in Business Administration)
दहावीनंतर तुम्ही बिझनेस अॅडमिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्स करू शकता. तुम्हाला बिझनेस कसा उभारावा, बिझनेस यशस्वी होण्यासाठी विविध स्टॅट्रजी कशा आखाव्या याबाबत सविस्तर माहिती मिळेल. या कोर्सच्या आधारे तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
पगार : प्रतिवर्ष ९ ते २० लाख रुपये पगार

३. सरकारी नोकरी ( Government Jobs)
भारतामध्ये सरकारी नोकरी करणाऱ्यांना चांगला पगार मिळतो आणि त्यांच्याकडे नोकरीची सुरक्षिततादेखील असते त्यामुळे याकडे १०वी इयत्तेनंतर करिअरचा अत्यंत योग्य पर्याय म्हणून पाहिले जाते. यासाठी तुम्हाला स्पर्धा परिक्षेची तयारी करावी लागेल.
पगार प्रतिवर्ष २.१ ते २१ लाख रुपये पगार

हेही वाचा – इतरांपेक्षा जास्त पगाराची नोकरी हवी आहे? हे ५ आहेत बारावीनंतर करिअरसाठी उत्तम पर्याय

४. फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा ( Diploma in Fashion Technology)

हा कोर्स, सामान्यत: एक वर्षासाठी केला जातो जो तुम्हाला तुमच्या सर्जनशील क्षमता वाढवण्यात आणि तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तुम्हाला आवश्यक कौशल्यांसह सुसज्ज करण्यात मदत करेल.
पगार : प्रतिवर्ष ३ ते ६.५ लाख रुपये पगार

५. इंटेरिअर डेकोरेशनमध्ये डिप्लोमा (Diploma in Interior Decoration)
हा कोर्स पूर्ण होण्यासाठी १-२ वर्षे लागतात, ज्यामध्ये तुम्हाला घर, कार्यालय किंवा इतर कोणत्याही जागेचे इंटेरिअर डिझाइन करण्याच्या विविध पैलूंचा समावेश असतो आणि इंटेरिअर डिझाइन उद्योगात प्रवेश करण्यासाठी पाया म्हणून काम करतो.
पगार– प्रतिवर्ष २ ते १६.० लाख रुपये

६. कॉस्मेटोलॉजी अँड हेल्थमध्ये सर्टीफिकेट कोर्स ( Certificate in Cosmetology & Health)
दहावीनंतर कॉस्मेटोलॉजी आणि आरोग्यमधील हा कोर्स केल्याने तुम्हाला परवानाकृत ब्युटी थेरपिस्ट होता येते.
पगार :प्रतिवर्ष १ ते ३ लाख रुपये

हेही वाचा – WFH साठी मनमानी चालणार नाही, महिन्यातून १२ दिवस ऑफिसला या अन्यथा…; TCS ने कर्मचाऱ्यांना पाठवलेला मेमो चर्चेत

७. ग्राफिक डिझाईनिंगमध्ये डिप्लोमा ( Diploma in Graphic Designing)
दहावीनंतर ग्राफिक डिझाईनमध्ये डिप्लोमा मिळवून कलाप्रेमी त्यांच्या आवडीचे करिअर निवडू शकतात.
पगार: ग्राफिक डिझायनर ( प्रतिवर्ष ३ लाख रुपये ), वेब डेव्हलपर (प्रतिवर्ष २.९ लाख रुपये ), क्रिएटिव्ह डायरेक्टर (प्रतिवर्ष १२.२ रुपये लाख)

८. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा (Diploma in Hotel Management)
हॉटले मॅनेजमेंटचा हा तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. हॉटले मॅनेजमेंट, ज्यामध्ये मॅनेजमेंटच्या विविध पैलूंचा समावेश आहे.
पगार: हाउसकीपिंग मॅनेजर (प्रतिवर्ष १.९ ते ७.५ लाख रुपये ), आउटलेट मॅनेजर ( प्रतिवर्ष ४ लाख रुपये )

९. इंजिनअरिंगमध्ये डिप्लोमा (Diploma in Civil Engineering)
सिव्हिल इंजिनीअरिंगमधील हा तीन वर्षांचा डिप्लोमा आणि सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बॅचलर पदवीचा अभ्यासक्रम लक्षणीयरीत्या समान आहे ज्यामुळे डिप्लोमा पदवीच्या समतुल्य मानला जातो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हव्या त्या विषयामध्ये पदवी किंव डिप्लोमा करू शकता.
पगार: प्रतिवर्ष ३ लाख रुपये.

१०. इंजनिअरिंग टेक्नलॉजीमध्ये डिप्लोमा (Diploma in Engineering Technology)
हा तंत्रज्ञानातील तीन वर्षांचा डिप्लोमामध्ये तुम्हाला आयटी टेक्नॉलॉजी, कॉप्युटर अॅप्लिकेशन. आयटी इंजिनिअरिंग आणि संबंधित विषयांमधील मूलभूत ज्ञान मिळते.
पगार : प्रतिवर्ष ३.५ ते ८ लाख रुपये