why do you switch jobs so frequently : अनेक जण वारंवार नोकरी बदलतात पण सतत नोकरी बदलल्याने आपल्या विश्वासाहर्तेवर आणि प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. कामात बदल करणे, हे वाईट नाही पण वारंवार नोकरी बदलल्यामुळे आपली प्रोफाइल खराब होते. ९ ते ५ जॉब करणे, काम करण्याचा कंटाळा येणे, असे प्रत्येकाबरोबर घडते पण त्यासाठी वारंवार नोकरी बदलणे खरंच गरजेचे आहे का? याविषयी विचार करणे गरजेचे आहे. खालील कारणांमुळे तुम्ही वारंवार नोकरी बदलता.

कामावर लक्ष केंद्रीत करता येत नाही

आपल्या आजुबाजूला अनेक गोष्टी घडत असतात अशावेळी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करणे, हे खूप मोठे आव्हान असते. आपल्यापैकी अनेक लोक फक्त १५ मिनिटांसाठी एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करू शकतात. दिवसाचे आठ तास एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रीत करणे खूप कठीण जाते. जे तुम्ही काम करता, त्यात तुम्हाला स्वारस्य नसते त्यामुळे आधी स्वत:ला विचारा की तुम्हाला स्वत:ला काय पाहिजे आणि त्यावर लक्ष केंद्रीत करा.

Sunny kumar a samosa seller who cracked NEET UG
समोसा विक्रेता होणार डॉक्टर! भाड्याची खोली, रात्रभर अभ्यास अन् ‘अशी’ केली NEETची परीक्षा पास; वाचा १८ वर्षाच्या सनी कुमारचा थक्क करणारा प्रवास
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
hane Municipal Corporation recruitment 2024
TMC Recruitment 2024: ठाणे महापालिकेत नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या पात्रता, पगार अन् अटी
Rigveda manuscript page (Source_ Ms. Sarah Welch_Wikimedia Commons)
देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती | वेदांचे महत्त्व आणि विधी
Top 10 Highest Paying Jobs in 2050 in marathi
२.५ कोटींचे पॅकेज! भारतात पुढील २५ वर्षांत ‘या’ १० नोकऱ्यांमध्ये मिळू शकतो गलेलठ्ठ पगार
oil and gas reserves found in the sea of ​​Pakistan how equation can change for Pakistan
पाकिस्तानच्या समुद्रात आढळला प्रचंड खनिज तेलसाठा? उत्खननाची क्षमता किती? उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची भाग्यरेखा बदलेल?
Success Story Sant Kumar Chowdhury's inspirational journey
Success Story: स्वप्नांपुढे सारे फिके! सरकारी नोकरी सोडून उभे केले करोडोंचे साम्राज्य, संत कुमार चौधरी यांचा प्रेरणादायी प्रवास
Business started from three thousand rupees Today earns more than 70 lakhs per month
Success Story: तीन हजार रुपयांपासून सुरू केला व्यवसाय; आज महिन्याला करतो ७० लाखांची कमाई

धाडसीपणा दाखवता येत नाही

प्रत्येकाला धाडसीवृत्ती आवडते . अनेकदा नोकऱ्यांमध्ये धाडसीवृत्ती दिसून येत नाही आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी गुदमरल्यासारखे वाटते. तुमचे काम तुम्हाला उत्साही करत नाही. एकच एक काम नियमित करत असल्यामुळे तुम्हाला कामाचा अंदाज आणि नवीन गोष्ट करण्याची संधी मिळत नाही.

हेही वाचा : मुलाखतीदरम्यान ‘या’ चार चुका कधीही करू नका; जाणून घ्या, त्या गोष्टी कोणत्या?

तुम्हाला कामाचा कंटाळा येतो

ज्या लोकांचे ध्येय त्यांच्या कामापेक्षा मोठे असते त्यांना कामाचा लवकर कंटाळा येतो. ते कोणतीही गोष्ट लवकर शिकतात आणि त्यामुळे त्यांचे त्यातून खूप लवकर स्वारस्य संपते. त्यांना नवीन आव्हाने स्वीकारायची असतात पण त्यांना संधी मिळत नाही ज्यामुळे ते निराश होता आणि प्रयत्न कमी करतात.

पगाराबाबत समाधानी नाही

नोकरी सोडण्याचे आणखी एक मोठे कारण म्हणजे पगार. नोकरीमध्ये अनेक आव्हाने असली तरी चालेल पण पगार चांगला असला पाहिजे. तुम्ही आणि तुमचा सहकारी समान काम करतो पण त्याला तुमच्यापेक्षा जास्त पगार असल्यावर तुम्हाला काय वाटेल? कंपनीने तुम्हाला फसवले, असे वाटू शकते किंवा तुम्ही पगारापेक्षा जास्त काम करता, म्हणून कामामध्ये आळशीपणा करू शकता.

तुम्हाला तुमच्या कामाविषयी आवड नाही

कामाविषयी आवड असणे, ही एक अशी एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला काम करण्यास प्रेरित ठेवते. तुमची आवड शोधणे हे सर्वात मोठे आव्हान आहे पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कौशल्ये वापरता येणारी नोकरी कराल तेव्हा तुम्हाला ती नोकरी कधीही सोडायची इच्छा होणार नाही . त्यामुळे तुमचे ध्येय निश्चित करा आणि काम करा. तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही.