UPSC– स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष लेखांची मालिका आम्ही सुरू करत आहोत. यामध्ये नावाजलेले विद्वान विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध, कला संस्कृती व वारसा, पर्यावरण, भूगोल, विज्ञान व तंत्रज्ञान असे अनेक विषय आपण समजून घेणार आहोत. या तज्ज्ञांच्या विद्वत्तेचा लाभ घ्या आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हा. या लेखात, मिथकशास्त्रात पारंगत असलेले प्रसिद्ध लेखक देवदत्त पट्टनायक भारतभरातील विविध प्रकारच्या नृत्य प्रकारांचा आढावा घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नृत्य हे संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ते संग्रहालयात संग्रहित करता येत नाही. फक्त छायाचित्रे किंवा व्हिडिओ स्वरूपात संग्रहित करता येते. नृत्याचे सादरीकरण हे वेळ आणि जागेनुसार बदलत जाते. त्यामुळे संगीताप्रमाणेच नृत्य हा एक अमूर्त वारसा आहे. हिंदू मंदिरांमध्ये आढळणाऱ्या शिल्पांमध्ये देवता नृत्य करताना दाखवल्या जातात. शिव, कृष्ण, गणपती या देवतांचे नृत्य प्रसिद्ध आहे. मंदिरांमध्ये देवतांच्या मनोरंजनासाठी देवदासींच्या नृत्याचा उपयोग होत असे. परंतु, आपल्याला बुद्ध किंवा तीर्थंकर नृत्य करत आहेत किंवा इस्लामिक प्रेषित नृत्य करत आहेत असे चित्र कधीच पाहायला मिळणार नाही. प्रत्यक्षात कट्टर मुस्लीम परंपरांमध्ये नृत्याला ‘हराम’ मानले जाते तर सूफी परंपरेच्या अध्यात्मिक आणि भक्ती चळवळींमध्ये नृत्य हे दिव्य अनुभव घेण्यासाठीचे साधन मानले जाते. युरोपमध्ये नृत्य हे पॅगन परंपरांशी जोडले गेले होते आणि ख्रिश्चन धर्माने त्याला नाकारले. त्यामुळे नृत्य वेगवेगळ्या श्रद्धा, समुदाय आणि जमातींच्या विचारसरणी प्रकट करते. हिंदूंसाठी नृत्य हे सांसारिकतेचे प्रतीक होते. बौद्धांसाठी ते मोहाचे प्रतीक होते. एकेश्वरवादी धर्मांमध्ये नृत्याला मूर्तिपूजेच्या संकल्पनेशी जोडले गेले आहे.

प्राचीन कालखंडातील नृत्य

भारतीय नृत्याचे पुरावे पुरातन कालखंडापासून सापडतात. यातील सर्वात जुना पुरावा मध्य भारतातील भीमबेटका गुहांमध्ये आहे. या गुहाचित्रांमध्ये ‘विझार्ड डान्स’ पाहायला मिळतो. या चित्रांमध्ये लोक शिंग घालून नाचताना दिसतात. हे नृत्य नवाश्मयुगाशी संबंधित आहे. हडप्पा संस्कृतीत आपल्याला सात जणांचे चित्रण असलेली मुद्रा आढळते. हे सात जण सारख्या पोशाखात एका झाडाभोवती नृत्य करताना दिसतात. हे एका विशिष्ट प्रकारच्या आदिवासी नृत्याचे प्रतीक आहे. भीमबेटका गुहांप्रमाणेच हडप्पातील या नर्तकांनीही शिंग परिधान केली आहेत.

अधिक वाचा: ‘एक फुटी कौडी… ते नाणी’; भारतातील नाण्यांचा आकर्षक इतिहास

वेदांमध्ये येणारे नृत्याचे उल्लेख

वेदांमध्ये नृत्याचा उल्लेख संगीताइतका नाही. कारण वेदांना ‘श्रुती’ म्हटले जाते, म्हणजेच वेद हे श्रवण परंपरेचा भाग आहेत. ‘सामवेदा’ने ऋग्वेदातील ऋचांना सूर दिले. ‘यजुर्वेदा’त विधींच्या वेळी ‘मुद्रा’ (हावभाव) करण्याची कल्पना येते. यालाच नृत्याचा उगम मानले जाते. पुढे वेदकालीन विधींमध्ये नृत्य आणि गीत यांचा वापर प्राचीन राजे, ऋषी आणि देवतांच्या गोष्टी सांगण्यासाठी मनोरंजनाच्या माध्यमाद्वारे केला गेला.

मौर्य काळातील नृत्य शिल्प

मौर्य काळातील (इ.स.पू. ३२१–१८५) सांची, भारहूत आणि अमरावती यांसारख्या सांस्कृतिक स्थळांवर नर्तकांचे शिल्पचित्रण आढळते. त्याचप्रमाणे गांधार बौद्ध कलेत ग्रीक नर्तकांची शिल्पे दिसतात. या शिल्पांवर ग्रीक देवता बॅकस/ डायोनायससचा (वाईन आणि परमानंदाचा देव) प्रभाव दिसतो. गुप्त कालखंडापर्यन्त ‘नृत्य’ (भावपूर्ण नृत्य) आणि ‘नाट्य’ (नाटक) यांसारख्या संज्ञा उदयाला आल्या. याच काळात भरत मुनींचा ‘नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ प्रसिद्धीस पावला.

स्वर्गात अप्सरांचे, तर पृथ्वीवर गणिकांचे नृत्य

स्वर्गात नृत्याचा अधिकार ‘अप्सरा’ (दैवी नर्तिका) यांचा होता, तर पृथ्वीवर हे कार्य ‘गणिका’ (दरबारी नर्तिका) करत असत. नाट्यशास्त्रासारख्या शास्त्रीय ग्रंथांमध्ये नृत्याच्या नियमांचा उल्लेख आहे. त्यात ‘अभिनय’ (भाव), ‘मुद्रा’ (हावभाव) आणि ‘अंगिक’ (शारीरिक हालचाली) यांचा समावेश आहे. नृत्याच्या हालचाली भूमितीच्या नियमांनुसार असतात. यावरून असे दिसते की नृत्य हे योगातील आसनांचे (योगमुद्रा) प्राथमिक रूप होते.

शास्त्र आणि शास्त्रीय नृत्य

संस्कृत नाटकांमध्ये आणि पुराणकथांमध्ये देव, अप्सरा आणि राजदरबारी नर्तक यांच्यातील नृत्यस्पर्धांचा उल्लेख आहे. तमिळ मंदिरांच्या आख्यायिकांनुसार शिव आणि शक्ति यांच्यात नृत्यस्पर्धा होत असे. या स्पर्धेत शिव आपले पाय वर उंचावून विजय मिळवतात कारण देवीला अशी हालचाल करण्यास लाज वाटली असे आख्यायिका सांगते. तसेच मोहिनी आणि भस्मासुराची कथा प्रचलित आहे. मोहिनी भस्मासुराला तिच्यासोबत नृत्य करण्याचे आव्हान देते. मोहिनीच्या हालचालींचे अनुकरण करताना भस्मासुर स्वतःच्या डोक्याला हात लावतो आणि भस्म होतो.

इस्लाम आणि नृत्य

इस्लाममध्ये नृत्याला मनाई आहे. परंतु राजपूत स्त्रियांशी विवाह केलेल्या मुघल सम्राटांनी दरबारात ‘तवायफ’ (दरबारी नर्तिका) यांना नृत्य सादर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे मुघल दरबारांमध्ये नृत्याला प्रोत्साहन मिळाले. हे नृत्य मंदिरातील नृत्यगृहांची तसेच इंद्राच्या स्वर्गीय दरबारातील नृत्याची आठवण करून देते. आजही या परंपरेचे प्रतिबिंब बॉलिवूड चित्रपटांमधील नृत्यात दिसते.

शास्त्र म्हणजे काय?

शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाचे सविस्तर आणि वर्गीकृत स्वरूपात केलेले दस्तऐवजीकरण. शास्त्रीय (Classical dance) नृत्याला ‘शास्त्र’ असते. कारण त्याला प्राचीन इतिहास आहे. त्या इतिहासाचे काही स्वरूपात दस्तऐवजीकरण झाले आहे. शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण व प्रशंसा करण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते. भारतामध्ये सात शास्त्रीय नृत्यप्रकार आहेत. त्यांची स्वतःची स्वतंत्र शैली आणि उगम आहे.

अधिक वाचा: देवदत्त पट्टनायक यांच्यासह कला आणि संस्कृती | वेदांचे महत्त्व आणि विधी

भारतातील शास्त्रीय नृत्यप्रकार

‘कथकली’ आणि ‘मोहिनीअट्टम’ हे नाट्यमय व सादरीकरणात्मक नृत्यप्रकार आहेत. ‘भरतनाट्यम’ हा देवदासींच्या मंदिर नृत्याचे आधुनिक सुधारित रूप आहे. या नृत्याची वैशिष्ट्ये भूमितीय व कोनीय हालचाली आहेत. कुचिपुडी नर्तक प्लेट्सवर नाचतात तर ओडिसी हा मृदू व प्रवाही नृत्यप्रकार आहे. ज्यात ‘त्रिभंग’ मुद्रा प्रमुख आहे. यात शरीर मानेवर, नितंबांवर आणि गुडघ्यांवर विरुद्ध दिशांना कललेले असते. आसाममधील ‘सत्रिया’ हा शेवटचा शास्त्रीय दर्जा प्राप्त असलेला नृत्यप्रकार आहे. उत्तरेत आपल्याकडे फक्त ‘कथक’ हा शास्त्रीय नृत्यप्रकार आहे. जो प्रथम मंदिरांमध्ये आणि नंतर राजदरबारांमध्ये सादर केला जात होता.

लोकनृत्य

छाऊ (Chhau) हा जवळपास सैनिकी शैलीचा नृत्यप्रकार आहे. जो पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांमध्ये सादर केला जातो. बंगाल आणि झारखंडमध्ये ‘पुरुलिया छाऊ’ या नृत्यप्रकारात मुखवटे वापरणे अनिवार्य आहे तर ओडिशामध्ये मुखवटे वापरले जात नाहीत. जरी छाऊ हा शास्त्रीय नृत्यांइतका उन्नत मानला जात नसला तरी काहीजण त्याला शास्त्रीय नृत्य मानतात. एकूणच लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य यांच्यातील हा भेदभाव विवादास्पद असून तो अनेकांना नाराज करतो.

लोककलांमध्ये विधी आणि परंपरा

कधी कधी लोकसांस्कृतिक सादरीकरणे धार्मिक विधींशी जोडलेली असतात. उदाहरणार्थ कर्नाटकातील ‘भूता कोला’ किंवा केरळातील ‘थेय्यम’. या सादरीकरणांमधून उपेक्षित परंपरा प्रतिबिंबित होतात. ज्यातून देवांशी संवाद साधण्याच्या आणि निसर्गाशी जोडलेपणाच्या भावना व्यक्त होतात. लडाख आणि शिलाँगमध्ये मुखवटाधारी नर्तक बौद्ध सिद्धांनी राक्षसांचा पराभव कसा केला आणि क्रोधित आत्म्यांना शांत केले याच्या कथा सादर करतात. अशा प्रकारे या लोकनृत्य प्रकारांमधून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा दृढ होत राहतात.

अधिक वाचा: देवदत्त पट्टनाईक यांच्यासह कला आणि संस्कृतीचा अभ्यास | भारतातील प्रागैतिहासिक स्थळांचा आढावा !

लोकनृत्याचा उद्देश

लोकनृत्याचा मुख्य उद्देश समुदायाला एकत्रित करणे हा आहे. साध्या स्टेप्स आणि मूलभूत तालबद्ध बीटद्वारे केलेले एकसंध नृत्य या उद्देशाला प्रोत्साहन देते. आदिवासी समुदायांमध्ये नृत्य बहुतेकदा वैयक्तिक नसून सामूहिक असते. यामुळे हंगामानुसार साजऱ्या होणाऱ्या विधींना जन्म मिळाला. आसाममधील ‘बिहू नृत्य’ हे प्रामुख्याने कापणीच्या वेळी सादर केले जाते. ईशान्य भारतातील आदिवासींमध्ये त्यांची आगळी वेगळी ओळख दर्शवणारे अनेक वैशिष्ट्यपूर्ण नृत्यप्रकार आहेत. तसेच ‘नौटंकी’ आणि ‘लावणी’ यांसारखी नृत्ये जनसामान्यांचे मनोरंजन करण्यासाठी सादर केली जातात. म्हणूनच नृत्य हे राजकारण, तत्त्वज्ञान, सण, विधी, ओळख आणि मनोरंजन यांसाठी एक प्रभावी माध्यम ठरते.

विषयाशी संबंधित प्रश्न

संस्कृत नाटकांमध्ये आणि पुराणकथांमध्ये कोणत्या प्रकारच्या नृत्यस्पर्धांचा उल्लेख आहे?

तमिळ मंदिरांच्या आख्यायिकांनुसार भगवान शिव हे शक्ति विरुद्धची नृत्यस्पर्धा कशी जिंकतात?

कोणत्या वेदात ‘मुद्रा’ (हावभाव) ही संकल्पना आली आहे आणि त्याविषयीचा संदर्भ काय सांगतो?

कर्नाटकातील ‘भूता कोला’ आणि केरळातील ‘थेय्यम’ यांसारख्या लोककलाकृती विधी आणि उपेक्षित परंपरांशी कशा जोडलेल्या आहेत?