गेल्या काही वर्षांपासून, भारतीय सार्वजनिक क्षेत्राकडे आयुष्यात स्थैर्यता देणारे नोकरी म्हणून पाहिले जाते. सरकारी क्षेत्रात विविध विभागांमध्ये असंख्य नोकरीच्या संधी आहेत. या नोकऱ्या विशेषतः महिलांसाठी खूप आकर्षक आहेत कारण त्या नोकरीची सुरक्षा, समावेशकता आणि काम-आयुष्य यांच्यातील संतुलन राखण्याची संधी देतात. याव्यतिरिक्त, गेल्या काही वर्षांत, सरकारने पारंपारिक पुरुष-प्रधान क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत, ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्या महिलांच्यासाठी अधिक सुलभ झाल्या आहेत.

महिलांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील ५ आशादायक नोकऱ्या येथे आहेत ज्या त्यांना फायदेशीर आणि यशस्वी करिअरचा मार्ग तयार करण्यास मदत करू शकतात. या नोकऱ्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक विकासासाठी त्या आदर्श पर्याय का आहेत याची कारणे देखील येथे दिली आहेत:

rrb group d level 1 exam syllabus pattern 2025 full details here
रेल्वेत तब्बल ३२ हजार पदांची भरती; हा घ्या परिक्षेचा पॅटर्न आणि लागा तयारीला; सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Success Story : इच्छाशक्ती! कोट्यावधीची नोकरी सोडून निवडले आयएएस पद; वाचा देशात पहिला येणाऱ्या कनिष्क कटारियाची गोष्ट
Ajit pawar gives Sharad Pawar Health Update
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती; म्हणाले, “त्यादिवशीच त्यांना…”
Minor boy arrested for killing infant G
१५ वर्षांचा प्रियकर, २२ वर्षांची प्रेयसी; चार महिन्यांचे बाळ आणि माणुसकीला काळीमा फासणारा गुन्हा…
Manohar Joshi Ashok Saraf
Padma Awards 2025 : महाराष्ट्रातील १४ दिग्गजांना पद्म पुरस्कार, वाचा संपूर्ण यादी
Miraj Sitar, Sitar postage stamp, Sangli ,
सांगली : मिरजेतील सतारीला आता टपाल तिकिटावर स्थान
Saif ali khan medicl clm
Saif Ali Khan : सैफला उपचारांसाठी ४ तासांत २५ लाखांची मंजुरी कशी मिळाली? विमा कंपनीच्या तत्परतेमुळे चर्चांना उधाण; AMC कडून तक्रार

१. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) – भारतातील सर्वात प्रतिष्ठित करिअर पर्यायांपैकी एक मानली जाणारे IAS पद महिलांना सार्वजनिक प्रशासकीय आणि प्रशासन क्षेत्रात महत्त्वाचे अधिकार धारण करण्याची परवानगी देते. IAS अधिकारी म्हणून, महिला सत्ता हाती घेतात आणि प्रभावी निर्णय घेतात, सक्षमीकरणासाी नवीन धोरणे आखतात आणि कल्याणकारी कार्यक्रम राबवतात. याव्यतिरिक्त, त्यांना वैयक्तिक आणि सामाजिक गरजा लक्षात घेऊन आरोग्यसेवा, शिक्षण आणि सुरक्षितता या क्षेत्रांवर माहिलांना चांगला प्रभाव पाडता येतो.

२. सरकारी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अध्यापन(Teaching in government schools and colleges) : गेल्या काही वर्षांपासून करिअर आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील समतोल साधण्यासाठी, दीर्घकालीन नोकरीची सुरक्षितता आणि सरकारी क्षेत्रात चांगले करिअर करण्याची अपेक्षा करणाऱ्या महिलांसाठी शिक्षिका म्हणून काम करणे हा चांगला पर्याय ठरत आहे. ही नोकरी केवळ आकर्षक पगार आणि पेन्शन लाभांचे आश्वासन देत नाही तर तरुण मनांना प्रेरणा देण्याची आणि त्यांना योग्य दिशेने नेण्याची एक उत्तम संधी देखील देतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक कामाच्या तासांचे निश्चित वेळापत्रक असल्याने महिलांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि करिअर प्रभावीपणे संतुलित करता येते.

३. भारतीय पोलिस सेवा (IPS) : आयपीएसमध्ये करिअर घडवल्याने महिलांना त्यांच्या सभोवतालच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे नियंत्रण करता येते, ज्यामुळे महिला आणि मुलांवरील वाढत्या गुन्ह्यांसारख्या समस्यांना तोंड देता येते. जरी ही एक अत्यंत आव्हानात्मक भूमिका असली तरी, ती महिलांना गुन्हेगारी तपास ते आपत्ती व्यवस्थापनापर्यंत विविध क्षेत्रात कौशल्ये आत्मसात करण्यास, सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यास अनुमती देते. महिलांना पोलिस सेवेत भरती करण्यासाठी सरकारचे प्रयत्न आणि सामाजिक स्वीकृती मिळण्याचे प्रमाण वाढल्यामुळे सकारात्मक बदल घडवू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हे एक योग्य करिअर ठरत आहे.

४. बँकिंग क्षेत्रातील नोकऱ्या ( Banking sector jobs) – आर्थिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) किंवा पंजाब नॅशनल बँक (PNB) सारख्या बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर, क्लर्क आणि मॅनेजर यासारख्या पदांवर काम करणे हे काही अतिशय आकर्षक पर्याय आहेत. महिलांना पुरुषांसारखा पगार, गृहनिर्माण भत्ता आणि आरोग्य आणि वैद्यकीय फायदे मिळतातच, परंतु गर्भधारणेदरम्यान आणि नंतर आवश्यक असलेला पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांना वाढीव प्रसूती रजा आणि डेकेअर सुविधांसारख्या महिला-केंद्रित धोरणांचा देखील फायदा घेता येतो. शिवाय, बँकिंग क्षेत्रातील महिला देखील अनेकदा रूढीवादी कल्पना आणि पक्षपातीपणा सोडून वरिष्ठ पदांवर दावा करताना दिसतात.

५. भारतीय रेल्वे (Indian Railways) : भारतीय रेल्वे निःसंशयपणे देशातील महिलांना सर्वात जास्त रोजगार देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे, जिथे प्रशासकीय ते अभियांत्रिकी अशा विविध पदांवर महिलांना कामावर ठेवले जाते. लोको पायलट आणि स्टेशन मास्टर सारख्या पदांवर काम करून, महिला अडथळे दूर करत आहेत आणि अशा पदांवर पुरुषांना श्रेष्ठ मानणाऱ्या मानसिकतेला आकार देत आहेत. स्थिर उत्पन्नाबरोबर महिलांना प्रवास भत्ता, बालसंगोपन समर्थन आणि गृहनिर्माण सुविधा मिळतात, त्याचबरोबर त्यांना विविध क्षेत्रात कौशल्य वाढवण्याची संधी मिळते.

Story img Loader