सुबोधला लेखक बनायची तीव्र इच्छा होती. अशी इच्छा अनेकांच्या मनात असते. खऱ्या अर्थाने चांगला लेखक बनणे, मानाने त्याचे पुस्तक एखाद्या प्रकाशन संस्थेने काढणे व वाचकांनी ते विकत घेऊन वाचणे हे सारे खूप खूप अवघड काम. नशिबावर भरवसा ठेवून अत्यंत चिकाटीने सातत्याने वर्षानुवर्षे लेखन करणाऱ्यांच्या नशिबीसुद्धा या साखळीतील सर्व गोष्टी हाती लागतात असे नाही. या पुढचा टप्पा तर फारच कठीण. एखाद्या समीक्षकाने तुमच्या पुस्तकाचे परीक्षण लिहून ते एखाद्या वृत्तपत्रात छापून येणे किंवा त्या पुस्तकाची चर्चा होणे हे तर हिमालयातील कठीण अशा अष्टहजारी शिखर काबीज करण्याजोगे असते. मराठी भाषेत गेली काही वर्षे सव्वाशे ते दीडशे सिनेमे दरवर्षी निर्मित होतात. त्यातील जेमतेम चाळीसांना थिएटरचा पडदा दिसतो तर चारांना पुरेसे व्यावसायिक यश मिळते. तीच परिस्थिती अधिक कठीण बनून मराठी प्रकाशन व्यवसायातील हौशी लेखकांची झाली आहे. ही आजची परिस्थिती नसून गेल्या पन्नास वर्षांचा इतिहास वेगळे काही सांगत नाही.
अलीकडे व्हाट्सअॅप विद्यापीठातील गाजणारे अनेक लेखक क्वचितच पुस्तक रूपाने समोर येतात. स्वत:च्या फेसबुकवॉल वर प्रकटन लिहिणारे ब्लॉगर्स तर हजारोंनी आहेत. त्यांची ‘मनकी बात’, ते मोकळेपणाने भिंतीवर लिहित राहतात. काहींना एखाद्या लेखावर व्यक्त व्हावेसे वाटते तर काहींना घटनेवर. असेच सातत्याने लेखन करणारे वाचकांच्या पत्रव्यवहारातील लेखक त्या – त्या वृत्तपत्राच्या वाचकात प्रसिद्ध असतात. ‘काय मस्त होते हो तुमचे पत्र’, असे कोणी म्हटले की त्यांचा आनंद गगनात मावत नाही. अशा पत्रव्यवहार करणाऱ्या लेखकांची एक संघटनाही आहे हे अनेकांना माहिती नसते. नियमित पत्रे प्रसिद्ध होणाऱ्यांचा एखादा लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे हे मात्र सहसा आढळत नाही ही एक गंमत. महाराष्ट्रातील मराठी नियतकालिके, मासिके, साप्ताहिके व पाक्षिके गेल्या वीस वर्षात माना टाकून बंद पडत आहेत. फक्त दिवाळी अंकांचे पीक मात्र जोरदार फोफावले आहे. वाढत्या संख्येने वाढत्या हौशी लेखकांच्या इच्छेला मान देऊन ज्यांना जाहिराती मिळवणे शक्य होते अशा अंकांची संख्या फुगली आहे. या प्रकारात कथाकारांची मात्र कायमची कोंडी झाल्याचे आढळून येते. दिवाळी अंक सोडला तर चांगल्या कथेला व चांगल्या कथाकाराला मागणीच नाही. अशा २५ कथा एकत्र करून संग्रह छापायला सहसा प्रकाशक तयार होत नाहीत. ही त्यांच्या पुढची अडचण. पुस्तकांच्या अर्थकारणाचा उहापोह वा अर्थव्यवहारावर मी काहीही लिहीत नाही. तो पूर्णत: खासगी गोड गुपिताचा विषय आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर मराठीत लेखन करणे त्यावर संसाराची गुजराण करणे हा एक स्वप्नवत प्रकार आहे.
विविध पर्याय उपलब्ध
गेल्या वीस वर्षांमध्ये वर वर्णन केलेल्या प्रत्येकाने स्वत:च्या इच्छेला मुरड घालून मागणी तसा पुरवठा करण्याची तयारी ठेवल्यास अनेक क्षेत्रे उपलब्ध झाली आहेत. त्याचा थोडासा उल्लेख सुबोधच्या वडिलांच्या मागील लेखात आला आहे. रोज सायंकाळी साडेसहा ते साडेदहा या दरम्यान अनेक चॅनेलवर जे कार्यक्रम चालू असतात त्या प्रत्येक कार्यक्रमाचा कंटेंट निर्माण करावा लागतो. अगदी ‘बिग बॉस’ वा ‘कौन बनेगा करोडपती’ याकरताही कंटेंटशी तीन ते चार व्यक्ती संबंधित असतात. मूळ कथा लेखक, त्याचे रूपांतर करणारा पटकथा लेखक, त्यावरून संवाद लिहिणारा संवाद लेखक, प्रत्यक्ष सेटवर हजर राहून त्यात गरजेनुसार, प्रसंगानुसार बदल करून देणारा सहाय्यक दिग्दर्शक- कम- लेखक व या साऱ्या गँगवर सुपरव्हिजन करणारा एक जाणकार ज्येष्ठ लेखक अशांना आता भरपूर मागणी आहे. बाकरवडीची जाहिरात असो किंवा दागिन्यांच्या, चॉकलेटच्या शॉर्टफिल्म करता कोण काम करते याची माहिती सामान्य प्रेक्षकापर्यंत कधीच पोहोचत नाही. एखाद्या गाजलेल्या व्यक्तीचे आत्मचरित्र घोस्ट रायटर म्हणून लिहून देणाऱ्यांची संख्याही खूप वाढली आहे व त्यांना मागणीही आहे. असे पुस्तक चाहत्यांना फुकट वाटले जाते. ते न वाचताच रद्दीत घातले जाते. ज्याचे चरित्र निघते त्याला आपण प्रसिद्ध व्यक्ती झालो आहोत असे वाटते. तर घोस्ट रायटर भरपूर पैसे कमावतो.
शास्त्रीय किंवा औद्याोगिक विषयांवर लिहिणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. मात्र त्यांना विशिष्ट वर्गाकडून मागणी असते. अर्थविषयक विश्लेषण करणाऱ्यांना वृत्तपत्रात जागा असते. मात्र पुस्तक प्रकाशक या लेखनाला तात्कालिक लेखन असे म्हणून नाकारतात. सेल्फ हेल्प किंवा व्यक्तिमत्व विकास या गटात सातत्याने लेखन करणारे असंख्य लेखक फोफावले आहेत. त्यांना मागणी भरपूर असते. मूळ इंग्रजीतून आलेली ही पद्धत सुमारे तीस वर्षांपूर्वी मराठीत आली. काही नामवंत प्रकाशकांच्या मते ही पुस्तके सोडली तर इतर पुस्तकांची मागणी सध्या पूर्ण मंदावली आहे. सातत्याने आवृत्ती निघत खपणारी पुस्तके म्हणजे स्पर्धा परीक्षांची विविध लेखकांची प्रकाशकांची व यशस्वी अधिकाऱ्यांची गौरव कथा सांगणारी पुस्तके. पहा, तुम्हाला लेखक व्हायचे असले तर यातील कोणत्या गटात तुम्ही स्वत: बसता ते ठरवा.