Job Opportunities In IT Sector : इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये नोकरीच्या प्रचंडी संधी आहेत आमि वेतनही चांगलं मिळतं. पण बीटेक केल्यावरच या क्षेत्रात नोकरी मिळते, असा काही लोकांचा गैरसमज आहे. पण तुम्हाला आम्ही काही डिप्लोमा कोर्सबद्दल माहिती देणार आहोत. जे पूर्ण केल्यानंतर आयटी सेक्टरमध्ये तुम्हाला नोकरीची चांगली संधी मिळू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे, डिप्लोमा कोर्स तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनसोबतही पूर्ण करु शकता.
सायबर सिक्योरिटीत डिप्लोमा कोर्स
जर तुम्ही एखाद्या नावाजलेल्या इन्स्टिट्यूटमधून सायबर सिक्योरिटी डिप्लोमा कोर्स पूर्ण केला असेल, तर तुम्हला आयटी सेक्टरमध्ये एक चांगली नोकरी सहज मिळू शकते. ज्याप्रमाणे इंटरनेट आणि नवनवीन टेक्नोलॉजीने आपलं जीवन खूप सोपं केलं आहे, तसंच अनेक समस्यांनाही सामोरं जावं लागत आहे. डिजीटल व्यवहारांच्या माध्यमातून होणारी गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे मोठ मोठ्या कंपन्या सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट त्यांच्याकडे नोकरीवर ठेवतात. तुम्ही सायबर सिक्योरीटीचा डिप्लोमा खासगी किंवा शासकीय संस्थेच्या माध्यमातून करु शकता. हा कोर्स एक वर्षाचा आहे. या कोर्ससाठी तुम्हाला खूप जास्त पैसै मोजावे लागत नाहीत.
नक्की वाचा – दहावी आणि ITI पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, १७९३ पदांची निघाली बंपर भरती
नॅनो टेक्नॉलॉजीत डिप्लोमा कोर्स
नॅनो टेक्नॉलॉजीत डिप्लोमा किंवा सर्टिफेकट कोर्स आताच्या जमान्यातील सर्वात बेस्ट कोर्स आहे. ज्यांनी १२ वी गणित विषयातून उत्तीर्ण केली आहे, त्यांनाच हा कोर्स करता येणार आहे. नॅनो टेक्नॉलॉजी डिप्लोमा कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला सूक्ष्म गोष्टींवर रिसर्च करायला शिकवलं जातं. या कोर्सनंतर तुम्ही फूड अॅंड बेव्हरेज, मेडिसीन, अॅग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी आणि स्पेस रिसर्चसारख्या विभागात तुम्ही करिअर करु शकतं. जर तुम्ही एखाद्या चांगल्या संस्थेतून नॅनो टेक्नोलॉजी डिप्लोमा केला असेल, तर तुम्हाला जवळपास ३० ते ४० हजार पगाराची नोकरी सहज मिळू शकते.
क्लाउड कंप्यूटिंगमध्ये डिप्लोमा करा
ज्या लोकांना संगणकात खूप जास्त इंटरेस्ट असतो, ते लोक क्लाउड कंप्यूटिंगमध्ये डिप्लोमा कोर्स करतात. या कोर्सची फी अन्य कोर्सच्या तुलनेत जास्त आहे. याच कारणामुळं काही लोक हा कोर्स करत नाहीत. पण, कंप्यूटरच्या टेक्नॉलॉजीत क्लाउड कंप्यूटिंगचा मोठा रोल आहे. क्लाउड कंप्यूटिंग एखाद्या नेटवर्कसारखं असतं. ज्यामुळे डेटा वेगानं प्रोसेस होतो. क्लाउड कंप्यूटिंगच्या माध्यमातून कंप्यूटरमध्ये सेव्ह असलेला डेटा सुरक्षित ठेवू शकता. जर तुम्ही क्लाउड कंप्यूटिंगचा डिप्लोमा एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून केला, तर तुम्हाला आयटी सेक्टरमध्ये एक चांगली नोकरी मिळू शकते.