Income Tax Recruitment 2023 : आयकर विभागाने इंस्पेक्टर, टॅक्स असिस्टंट आणि मल्टीटास्किंग स्टाफच्या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या भरती अभियानात एकूण २० पदे भरली जाणार आहेत. उमेदवार या भरतीसाठी आयकर चंदीगढच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकतात. ऑफलाईन नोंदणी सुरु झाली आहे. ऑफलाईन मोडमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२३ असणार आहे. याबाबतचे नोटिफिकेशन अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहे. कोणत्याही पदासाठी अप्लाय करण्याआधी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्ज करण्याची प्रक्रिया २१ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२३ आहे. उमेदवारांना ऑफलाईन मोडमध्ये अर्ज करावा लागेल. अर्जाच पत्र अधिकृत नोटिफिकेशसह अपलोड केलेलं आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. उमेदवारांना अर्जासाठी दिलेलं पत्र भरावे लागेल. तसेच आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील आणि अॅप्लिकेशन फॉर्मला रजिस्टर्ड डाक किंवा स्पीड पोस्टच्या माध्यमातून Dy. Commissioner of Income Tax (Hq)(Admn), O/o the Principal Chief Commissioner of Income Tax, NWR, Aayakar Bhawan, Sector-17E, Chandigarh-160017 वर पाठवावे लागेल.

नक्की वाचा – ‘स्टेट बॅंक ऑफ इंडिया’त नोकरीची मोठी संधी, २० लाखांपर्यंत मिळणार पॅकेज, अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

अॅनेक्चर-II नुसार अॅप्लिकेशन फॉर्म एक बंद लिफाफ्यात पाठवले पाहिजेत. यावर इंस्पेक्टर/टॅक्स असिस्टंट/मल्टी-टास्किंग स्टाफच्या पदासाठी स्पोर्टस कोटाच्या भरतीसाठी आवेदन शब्द फक्त रजिस्टर्ड/स्पीड पोस्टच्या माध्यमातून लिहिलेले पाहिजेत. विभागाकडे हे १७ मार्च २०२३ पूर्वी जमा झाले पाहिजे. उत्तर पूर्व राज्य अंदमान निकोबार द्विप समूह, लक्षद्विप, लडाख, जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२३ असेल. अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन पाहा.

आयकर विभाग वेतन

इनकम टॅक्स इंस्पेक्टर – पे लेवल ७ (४४९०० पासून १४२४०० रुपये)

टॅक्स असिस्टंट – पे लेवल ४ (२५५०० पासून ८११०० रुपये)

मल्टी टास्किंग स्टाफ – पे लेवल १ (१८००० पासून ५६९०० रुपये)

असे आहेत पात्रता निकष

इनकम टॅक्स इंस्पेक्टर – कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पदवी

टॅक्स असिस्टेंट – कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून पदवी, डेटा एंट्री स्पीड ८००० डिप्रेशन प्रती तास

मल्टी टास्किंग स्टाफ – १० वी पास

वयोमर्यादा काय आहे?

इनकम टॅक्स इंस्पेक्टर – ३० वर्ष

टॅक्स असिस्टंट – १८ ते २७ वर्षांच्या आत

मल्टी-टास्किंग स्टाफ – १८ ते २५ वर्षांच्या आत

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: You have golden chance to get government job in income tax department know the details of income tax recruitment 2023 nss