करिअरविषयक नव्या संधी उलगडून दाखवणारी लोकसत्ता मार्ग यशाचा ही कार्यशाळा नुकतीच ठाणे आणि दादर येथे पार पडली. या कार्यशाळेत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाचा सारांश.

आयुष्याच्या प्रवासात यशाचा मार्ग गाठण्यासाठी स्मार्टनेस महत्त्वाचा असतो. मात्र, यश मिळाल्यानंतर आपला मार्ग टिकवणे तितकेच महत्त्वाचे ठरते. सध्याच्या स्पर्धात्मक जगात आपण नकळतच इतरांच्या मार्गात व विचारांत अधिक गुंतलेलो असतो. या सगळ्यात आपण स्वत:मधील क्षमता व कौशल्यांकडे दुर्लक्ष करतो. स्पर्धात्मक वातावरणात आपल्या सोबतची मुले काय करतात, तेच करण्यासाठी आपण नकळतच पुढे सरसावतो. यशाचा पाठलाग करण्यासाठी आपण धावत असतो, पण स्पर्धात्मक वातावरणात वेगळेपणा राहत नाही. आपल्याला वेगळेपणा निवडण्यावर भर द्यायचा आहे. नोकरीच्या विविध टप्प्यावर निरनिराळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे नवनवीन गोष्टी करण्याची क्षमता असली पाहिजे.

करिअर आणि अभ्यासक्रम यामधील फरक समजून घ्यायला हवा. शिशुवर्गापासूनच आपल्या करिअरची सुरुवात होते. स्वत:ला जो ओळखतो तो व्यक्ती करिअर निवडण्यात यशस्वी ठरतो. तुम्ही स्वत:च्या मनाने करिअरची निवड व मार्ग निवडल्यास संबंधित क्षेत्रात निश्चितच प्रगती कराल. बुद्धिमत्ता गुणांक (आयक्यू) हा फक्त शैक्षणिक विषयक सांगतो. करिअर करत असताना बौद्धिक क्षमता, आवड आणि व्यक्तिमत्व या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आजकाल भावनिक बुद्धिमत्ता ही प्रचंड महत्त्वाची आहे. आपण बुद्धिमत्तेच्या जोरावर गुण मिळवू शकतो. पण मनानुसार गुण मिळाले नाही की विद्यार्थी निराश होतात. तसेच एखाद्या अभ्यासक्रमात यश मिळते, मात्र काही काळानंतर रस राहिला नाही तर आपण खचून जातो. जो अपयशावर मात करो, तो यशस्वी. कारण आता मिळालेल्या यशात सहा महिन्यांनंतर अपयश मिळू शकते. भावनिकता आणि बहुविध बुद्धिमत्ता (मल्टिपल इंटेलिजन्स) असणेही गरजेचे आहे. आपण चार लोकांशी बोलले पाहिजे. आपली आवड नेमकी कशात आहे ते समजून घ्या आणि नंतर ती आवड मनापासून जोपासा. समाजमाध्यमावर गुंतणे, सातत्याने रील पाहणे हा तुमचा टाईमपास आहे. तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे, हे महत्त्वाचे असते. आपण हिरोसारखे दिसतो, याला महत्त्व नाही. आपल्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये, अंतर्मुख की बहिर्मुख हे महत्त्वाचे असते. आपल्याला कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे आहे, आवड आणि व्यक्तिमत्व ओळखणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला खूप पैसे मिळतील, मित्रही मिळतील. पण चांगले काम करीत रहा. त्यावरून तुमचे व्यक्तिमत्व ठरते. तुमचे काम पाहून तुम्हाला लोक शोधत येतील, तुम्हाला लक्षात ठेवतील.

बदलत्या काळाशी आपल्याला पटकन जुळवून घ्यावे लागणार आहे. पुन:श्च आणि सातत्याने शिकत राहावे लागणार आहे. घरबसल्या दररोज एक कृती करा. विरुद्ध हाताने काम केल्यास तुमच्या मेंदूला चालना मिळेल. आयुष्यात यशस्वी व्हायचे असल्यास मेंदूला चालना मिळणे गरजेचे आहे. आपल्या मेंदूमध्ये दोन यंत्रणा आहेत. जागरूकता, तग धरून कार्यरत राहणे ही उपजत यंत्रणा आहे. जागरूकता व बदल या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

मुख्य प्रायोजक

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड

सहप्रायोजक

सोमय्या विद्याविहार युनिव्हर्सिटी, द सिव्हिलियन्स अकॅडमी, डी वाय पाटील युनिव्हर्सिटी, सिंहगड इन्स्टिट्यूट्स, लीला एज्युकेशन सोसायटी आचार्य इन्स्टिट्यूशन्स, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणे</p>

बँकिंग पार्टनर

युनियन बँक ऑफ इंडिया

पॉवर्ड बाय

ज्ञानदीप अकॅडमी फॉर यू.पी.एस.सी. अँड एम.पी.एस.सी., पुणे, एस आर एम युनिव्हर्सिटी, एपी, मंथन आर्ट स्कूल, भारत कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग कान्होर, बदलापूर (प.), विद्या प्रसारक मंडळ, ठाणे, शौर्य डिफेन्स अकॅडमी, ठाणे, इंदाला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स