भारतीय तत्त्वज्ञानात जसा चत्वारवाणीचा विचार केला आहे तसा इतर कोठेही नाही.
तद्वतच नादचतन्याच्या सूक्ष्मसूक्ष्मतमतेचाही अतिशय खोलवर विचार केलेला दिसतो. तो विचार म्हणजेच भारतीय तत्त्वज्ञानातील षट्चक्र संकल्पना. ही षट्चक्रे मानवी देहाच्या मध्यरेषेवर सूक्ष्मसूक्ष्मतम रूपात वास करतात. ही चक्रे म्हणजे जणू कमळेच. त्या प्रत्येक चक्राला विशिष्ट पाकळ्या आहेत. त्या प्रत्येक चक्राला विशिष्ट रंग आहे. प्रत्येक चक्राची देवता वेगळी आहे, पण माझ्या दृष्टिकोनातून वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींपेक्षासुद्धा ही सर्व षट्चक्रे सूक्ष्मसूक्ष्मतम नादचतन्याची मोहोळे आहेत, पोळीच आहेत हे महत्त्वाचे आहे. या षट्चक्रांचा ओम् या विश्वाचे मूळ असलेल्या आत्मस्वरूप नादचतन्याशी जवळचा म्हणजेच घनिष्ठ संबंध आहे. तो कसा ते आपण वैज्ञानिकदृष्टय़ा बघू. मग विज्ञाननिष्ठ असलेल्या तरुणाईलाही त्या षट्चक्ररूप नादचतन्याचे महत्त्व उमगेल. हे प्रत्येक चक्र देहाच्या वेगवेगळ्या जागी स्थित आहे व अंकाच्या दृष्टीने त्याला वेगवेगळ्या पाकळ्या आहेत.
ch06
खालील माहितीवरून ते आपल्या ध्यानात येईल.
वर नमूद केलेली चक्रे दिसायला जरी सात दिसत असली तरी त्यांना षट्चक्रे म्हणतात. कारण आज्ञा व सहस्रदल ही दोन्ही चक्रे अनुक्रमे कपाळ आणि माथा मध्यस्थित आहेत आणि दोन्हींचाही संबंध मेंदूकार्याशी निगडित आहे. त्यामुळेच त्यांचा ‘आज्ञा सहस्रदल’ असा एकत्रित उल्लेख केला जातो. ही षट्चक्रे नादचतन्याची मोहोळे असल्याचे कारण म्हणजे त्या प्रत्येक चक्रावर विधात्याने एकेका बीजाक्षराचे म्हणजेच एकाक्षरी बीजमंत्राचे रोपण केले आहे.
डॉ. जयंत करंदीकर -omomkarom@rediffmail.com