कुट्टू हे धान्य नसून एका वनस्पतीच्या त्रिकोणी आकाराच्या बिया आहेत. महाराष्ट्रापेक्षा ते भारताच्या इतर अनेक प्रांतांत उपवासासाठी वापरलं जातं. कुट्टू अतिशय पौष्टिक आणि लगेच ऊर्जा देणारं आहे. त्यात न विरघळणारा चोथा असून बी कॉम्प्लेक्सही भरपूर आहे. तसंच ते प्रथिनांनी समृद्ध असून वजन कमी करण्यासाठी वापरतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायला कुट्टूची मदत होते. कुट्टूमुळे चांगलं कोलेस्टोरॉल वाढतं, वाईट कमी होतं. कुट्टूच्या बिया शिजायला वेळ लागतो त्यामुळे त्याचा दलिया (जाडसर चुरा) तसंच पीठ वापरलं जातं.
कुट्टूचा हलवा
साहित्य : प्रत्येकी १ वाटी कुट्टूचा दलिया, आंब्याचा रस, पाणी आणि साखर, १ मोठा चमचा तूप, १ चमचा वेलची पावडर, थोडेसे बदामाचे काप, चिमूटभर मीठ
कृती : तुपावर कुट्टू भाजून घ्यावं. त्यात आंब्याचा रस, पाणी आणि मीठ घालून शिजवावं, साखर मिसळून शिजवावं, वेलची पूड आणि बदामाचे काप घालावे.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com