हरीश सदानी saharsh267@gmail.com

उत्तर प्रदेशमधल्या ‘शेफ’, ‘प्रेरणा मुलींची शाळा’, ‘डिजिटल स्टडी हॉल’, ‘आरोहिणी’, ‘ज्ञानसेतू’ आदी संस्थांच्या माध्यमातून मुलामुलींमध्ये पुस्तकी  ज्ञानापेक्षा समतेचं आणि सामाजिक न्यायाचं बीज पेरण्याचा प्रयत्न झाला. त्याचेच अविभाज्य घटक असणारे आनंद. ‘आयटी’मधली नोकरी सोडून त्यांनी आपल्या साथीदारांसह मुलींनी किमान बारावीपर्यंत शिकावं, एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगावं, प्रत्येक मुलीनं ‘घर’ निर्माण करावं, या उद्दिष्टांसह काम करायला सुरुवात के ली.  उत्तर प्रदेशच्या ७१ जिल्हा-दंडाधिकाऱ्यांचं सहाय्य त्यांना मिळू लागलं. मुलींची शाळेतून गळती व बालविवाह नगण्य झाले. सुमारे १५ हजार मुलींना शिष्यवृत्ती मिळाली. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींचं प्रमाण ८७ टक्के  असल्याचं दिसून आलं. जोतिबांचे लेक आनंद चित्रवंशी यांच्याविषयी..

Maharashtra: 784 percent schools in state now have computer facilities, says report
राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक वाचन, गणित विषयात प्रगती, शालेय शिक्षण विभागाचा दावा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Arvi , Shivaji Primary School, Padma Chaudhary,
अशीही एक ‘मॅडम’ ! घर समजून शाळेचं रुपडंच बदलले
Letter of intent of unauthorized school in Dharavi cancelled
धारावीतील अनधिकृत शाळेचे इरादापत्र रद्द, शाळेतील ७०० विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन होणार
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
kolhapur becomes first district to ensure 100 percent cctv coverage in government schools
कोल्हापुरातील शाळांना ‘सीसीटीव्ही’चे कवच ! राज्यातील पहिला जिल्हा, १९५८ शाळांमध्ये यंत्रणा कार्यान्वित
teaching being hampered due to various committees are being formed
अबब, राज्यातील शाळांत १८ समित्या! शिक्षक मग शिकवितात केव्हा?
Idol Distance Education, Mumbai , Students ,
मुंबई : दूरस्थ शिक्षणापासून विद्यार्थी दूर, यंदा १६ अभ्यासक्रमांसाठी अवघे २४ हजार ८९४ विद्यार्थी

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ ही घोषणा प्रत्यक्षात साकार करण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर सातत्यानं प्रयत्न होणं अपेक्षित असतं. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये जिथे पुरुषप्रधानतेला खतपाणी घालणारी, तसंच सरंजामी मनोवृत्ती खूप खोलवर रुजलेली आहे, तिथे या प्रयत्नांमध्ये अनेक अडथळे संबंधितांना पार करावे लागणं क्रमप्राप्त आहे. अशा परिस्थितीत मुलींनी सन्मानानं आणि निर्भयतेनं इयत्ता बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करावं यासाठी लखनऊमधील ३४ वर्षांच्या आनंद चित्रवंशी या तरुणानं आवश्यक वातावरण उभं करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याबरोबरच ते समानता मानणारा समाज निर्माण करण्यासाठी मुलग्यांच्या मानसिकतेला आकार देण्यास्तव ठोस पावलं उचलत आहेत.

२००८ मध्ये ‘कॉम्प्युटर्स अप्लिकेशन’ या विषयात पदवी घेतल्यानंतर आनंद एका ‘स्टार्टअप’ कंपनीत पूर्ण वेळ काम करत होते. तेव्हाच ‘स्टडी हॉल एज्युकेशनल फाऊंडेशन’ (शेफ) या सामाजिक संस्थेद्वारे चालवलेल्या एका प्रकल्पाकरिता स्वयंसेवक म्हणून ते काम करू लागले. ‘शेफ’ ही संस्था द्रष्टय़ा डॉ. उर्वशी साहनी यांनी स्थापन करून त्या माध्यमातून प्रथम लखनऊतील उच्च-मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुलांकरिता शाळा सुरू केली. या शाळेतील मिळकतीच्या एका हिश्शातून २००३ मध्ये त्यांनी गोमती नगरमधील या शाळेच्या प्रांगणातच  ‘प्रेरणा मुलींची शाळा’ सुरूकेली. विविध कारणांमुळे ज्यांचं शालेय शिक्षण पूर्ण होऊ शकलेलं नाही किंवा अजिबात शिक्षण झालेलं नाही, अशा मुलींना ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओपन स्कूिंलंग’ या केंद्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या ‘प्रेरणा मुलींच्या शाळे’त प्रवेश मिळू लागला. आपला तिथला अनुभव सांगताना आनंद म्हणतात, ‘‘अतिशय गरीब, वंचित मुली प्रेरणा शाळेत येत होत्या. या मुलींशी बोलताना जाणवलं, की त्यांच्यापैकी बऱ्याच जणींना त्यांच्या आयुष्यातील पुरुषांकडून वाईट अनुभव आलेले होते. बऱ्याचदा व्यसनी, हिंसक व सतत नियंत्रणात ठेवू पाहाणाऱ्या वडिलांच्या/ भावांच्या धाकात राहून आणि पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्यांच्या घरात काम करून शाळेत येणाऱ्या या मुलींना पाहताना मी स्वत:च्या आयुष्याकडे  वेगळ्या दृष्टीनं बघायला लागलो. लिंग, जात आणि सामाजिक स्तर यांचा एकमेकांशी संबंध असून त्याचा त्या त्या व्यक्तींच्या जीवनावर मोठा परिणाम होतो हे मी या मुलींच्या माध्यमातून पाहात होतो.

एक घटना आठवतेय, त्या वेळी मी २२-२३ वर्षांचा असेन. माझ्या एका विद्यार्थिनीचं लग्न ठरलं. ते सांगताना ती म्हणाली, की ‘माझं लग्न ठरल्यामुळे यापुढे मला शाळेत येता येणार नाही.’  ते ऐकून मी इतका अस्वस्थ झालो की तिला काय सांगावं तेच कळेना. डॉ. साहनी यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी मला बोलावून घेतलं आणि शांत करत मला विचारलं, ‘तिच्याबाबतीत जे घडतंय ते योग्य आहे का?’ मी ‘नाही’ म्हटल्यावर त्या म्हणाल्या, ‘मग ते बोलायला तुला संकोच का वाटतो? तू त्या मुलीला सांगायला हवंस, की तुझं लग्न होऊ शकत नाही, कारण ते बेकायदेशीर आहे आणि हे तू तिच्या आईवडिलांना सांगणार आहेस.’ ही घटना मला पूर्ण बदलवून गेली आणि त्यानंतर मी अशा परिस्थितीशी कसा सामना करायचा ते शिकलो.’’

एका वर्षांतच ‘आयटी’तली नोकरी सोडून प्रेरणा शाळेतील वंचित आणि शिक्षणासाठी आसुसलेल्या मुलींच्या कहाण्या आनंद कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपू लागले व त्यातून ‘डिजिटल स्टडी हॉल’चा स्वतंत्र प्रकल्प उभा राहिला. डॉ. उर्वशी व त्यांचा चमू मुलींसोबत अभ्यास आनंदी वृत्तीनं कसा करावा, याबरोबरच पितृसत्ता, पुरुषप्रधानता व सामाजिक रचना यांसारख्या मुद्दय़ांवरही सोप्या भाषेत समालोचनात्मक चर्चा (ज्याला आनंद ‘क्रिटिकल डायलॉग्ज’ म्हणून संबोधतात.) करू  लागले. ही सर्व चर्चासत्रं व्हिडीओंच्या रूपात नोंदवून त्यांचं सादरीकरण शिक्षकांसाठी अभ्यासक्रमाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमधील ७४६ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयं आणि अन्य शाळांमध्येही हळूहळू होऊ लागलं. यातूनच आनंद आणि त्यांच्या साथींनी ‘आरोहिणी’ हा नवा प्रकल्प २०११ मध्ये सुरू केला.

मुलींनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करावं, एक समान, स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगावं,  प्रत्येक मुलीला आपल्या स्वत:च्या हक्काची जागा ‘घर’ म्हणून असेल अशी परिस्थिती तिनं निर्माण करणं, ‘आरोहिणी’ प्रकल्पाची ही उद्दिष्टं आहेत. त्या दिशेनं शिक्षकांना प्रशिक्षित करून शेकडो पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्या एकत्रित बैठका घेऊन शिक्षणाचे अनेक पैलू, तसंच बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार या मुद्दय़ांवर साधकबाधक चर्चा करण्यात आली. बालकल्याण समितीचे कार्यकर्ते, स्थानिक धर्मगुरू, पोलीस, निवासी शाळांचे वॉर्डन यांना सामुदायिक मोहिमेत सहभागी करून बालविवाह थांबवण्यासाठी विशेष उपक्रम घेण्यात आले. उत्तर प्रदेशच्या

७१ जिल्हा-दंडाधिकाऱ्यांचं सहाय्य या मोहिमेत मिळू लागलं. परिणामस्वरूप मुलींची शाळेतून गळती व बालविवाह यांचं प्रमाण पुढील अनेक वर्ष नगण्य झालं. आठवी इयत्तेतील मुलींनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करावं, यासाठी शिष्यवृत्त्या आधी ‘शेफ’ संस्थेद्वारा व नंतर समाजकल्याण विभागामार्फत दिल्या जाऊ लागल्या. आनंद व साथीदारांच्या अथक प्रयत्नांमुळे सुमारे १५ हजार मुलींना शिष्यवृत्ती मिळाली. ‘बेटी पढाओ’ हा संकल्प प्रत्यक्ष साकार होताना दिसू लागला. २०१७ च्या ‘शेफ’ संस्थेच्या अहवालानुसार इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींचं प्रमाण ८७ टक्के  असल्याचं दिसून आलं. अनेक मुलींनी परदेशी जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. ‘शेफ’ संस्थेच्या अनेक उपक्रमांत आज प्रेरणा मुलींच्या शाळेतील ७० टक्के  माजी विद्यार्थिनी काम करत आहेत. त्यांच्यातील काही जणी महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या प्रमुखपदी पोहोचल्या आहेत, असं आनंद अभिमानानं सांगतात. ‘आरोहिणी’अंतर्गत ‘शेफ’ संस्थेनं आतापर्यंत उत्तर प्रदेश व राजस्थान इथं शासन पुरस्कृत अशा सुमारे १,००९ शाळांमधील ४ हजार शिक्षकांना प्रशिक्षित केलं आहे. पाठय़पुस्तकांतील विषयांचे अनेक धडे व्हिडीओच्या स्वरूपात चित्रित करून संस्थेच्या ‘डीएसएच ऑनलाइन’ (डिजिटल स्टडी हॉल) या यूटय़ूब वाहिनीमार्फत सादर के ले जातात. ते हजारो शिक्षकांसाठी (विशेषत: ‘करोना’च्या काळात) एक मौलिक साधन ठरतं आहे. ग्रामीण व शहरी भागातील कमी उत्पन्न असलेल्या वर्गातील, स्थलांतरित समूहातील शाळाबाह्य़ (साधारणत: ६ ते ११ वयोगटातील) मुलांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून ‘ज्ञानसेतू’ हे सामुदायिक अनौपचारिक शिक्षण केंद्र ‘शेफ’ संस्थेनं वस्ती पातळीवर सुरू केलं. अशी ६० केंद्रं लखनऊ व शेजारच्या जिल्ह्य़ांमध्ये कार्यरत आहेत. वस्तीतील बारावीपर्यंत शिकलेले तरुणच ‘शेफ’च्या मार्गदर्शनाखाली या केंद्रांचे उपक्रम राबवतात. आतापर्यंत ६८४ शाळाबाह्य़ मुलांना नियमित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात ‘शेफ’ला यश आलं आहे.

कार्यक्रम संचालक म्हणून २०१५ पासून ‘डिजिटल स्टडी हॉल’, ‘आरोहिणी’, ‘ज्ञानसेतू’ या उपक्रमांचं व्यवस्थापन आनंद करीत आहेत. व्यावसायिक विकासाचा भाग म्हणून ‘श्वाब फाऊंडेशन’ संस्थेकडून मिळणाऱ्या पाठय़वृत्तीनं त्यांना २०१९ मध्ये अमेरिकेतील हार्वर्ड केनेडी स्कूल येथे १० दिवसांच्या नेतृत्व व कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेण्याची संधी दिली होती. त्यापूर्वी २०१५ मध्ये जिनिव्हात ‘ग्लोबल शेपर्स’ आयोजित आंतरराष्ट्रीय बैठकीलाही ते उपस्थित राहिले होते.

२०१७ मध्ये आनंद ‘शेफ’द्वारा चालवल्या गेलेल्या (नव्या) ‘प्रेरणा मुलग्यांच्या शाळे’त काम करू  लागले व तिथेही चिकित्सक स्त्रीवादी दृष्टिकोन कसा रुजेल यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. १३-१४ वर्षांच्या मुलग्यांशी मुली आणि समाजवास्तवाबद्दल बोलताना सुरुवातीला आनंदना नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या.

१३ वयापेक्षा लहान असणाऱ्या मुलांना कदाचित पुरुषसत्ताक व्यवस्थेची फारशी झळ पोहोचत नसल्याने असेल, पण त्यामुळे त्यांना  पुरुषसत्ताक व्यवस्थेला प्रश्न करणं  तुलनात्मकरीत्या सोपं होतं, असं आनंद सांगतात. साहजिकच नवीन कार्यपद्धती अवलंबल्यानंतर त्यांना वाढीच्या वयातील मुलग्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. ती समजूतदार समानतेचा पुरस्कार करू लागली. गेली काही वर्षं संस्थेच्या ‘इंडियाज्  डॉटर्स कॅम्पेन’ या वार्षिक उपक्रमात होणाऱ्या निषेध रॅलीमध्ये मुलं मुलींबरोबर हिरिरीनं व्यक्त होत आहेत. खेळ, गप्पा, भूमिकानाटय़, गटचर्चा यांद्वारे मुलग्यांमध्ये लिंगभाव-संवेदनशीलता निर्माण करून त्याविषयीच्या एका अभ्यासक्रमाचं प्रारूप आनंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलं आहे. त्याला अंतिम रूप देऊन अधिकाधिक मुलग्यांपर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. समता व सामाजिक न्याय यांविषयीचे धडे हे गणित व विज्ञानविषयक धडय़ांइतकेच महत्त्वाचे आहेत, असं  मानणाऱ्या ‘शेफ’ संस्थेनं अलीकडे जातविषयक संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांमध्ये संवादसत्रांचं आयोजन सुरू केलं आहे.

‘पेडागॉजी ऑफ दि ऑप्रेस्ड’ हे स्वानुभवपर, अमूल्य पुस्तक लिहिणाऱ्या ब्राझील येथील शिक्षणतज्ज्ञ पाउलो फ्रॅअर यांच्या सिद्धांतापासून स्फूर्ती घेत ‘शेफ’ संस्थेनं शिक्षणाच्या क्षेत्रात काम उभं केलं आहे. वर्षांनुवर्ष प्रचलित असलेल्या सामाजिक संरचना, स्त्री-पुरुषांविषयीच्या धारणा व विचारपद्धती यांना प्रश्न करणं, त्यावर चिंतन करून मग प्रश्नांना भिडणं, यासाठी अनुरूप उपक्रम शालेय विद्यार्थ्यांपासून  सुरू करून मोठय़ा जनसमुदापर्यंत नेले जात आहेत. ही यशस्वी वाटचाल करणाऱ्या आनंद व त्यांच्या चमूचं काम अधिकाधिक मुलामुलींपर्यंत पोहोचावं यासाठी शुभेच्छा.

 

Story img Loader