आपल्या दैनंदिन जीवनात जीवनशैलीचा विचार करताना वैद्यकीय क्षेत्रात मुख्यत्वेकरून आहार, विहार, आचार, विचार या चार मुद्दय़ांचाच परामर्श घेतलेला आहे. जीवनशैलीच्या मुद्दय़ात उच्चाराचा संबंध सांगितला जात नाही; परंतु माझ्या मते, उच्चार ही पाचवी जीवनशैली आहे व ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण आहार, विहार, आचार, विचार ही चत्वार जीवनशैली अंगीकारताना प्रथम मनात विचार येतो म्हणजेच विचाररूपात सूक्ष्म मानस ध्वनीचाच उच्चार होतो व त्यानुसार देहातील त्या त्या इंद्रियांची कृती घडते, हालचाल होते, जी सूक्ष्मनादरूपच असते, उच्चाररूपच असते. त्यामुळे प्रत्येक जीवनशैली ही सूक्ष्मरूपाने नादजीवनशैलीच आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की,
दशेंद्रियांचा स्वामी मन। करते करवीते सारे मन।
नादात लपले मन। सूक्ष्म वायूरूपात॥
प्रत्येक व्यक्तीने आपली पंचनादजीवनशैली म्हणजे आहार, विहार, आचार, विचार व मुख्यत्वे उच्चार ही परमशुद्ध व सात्त्विक ठेवली तर त्याला शक्यतो आजार होणारच नाहीत.
पाचवी जीवनशैली उच्चार तोही शास्त्रशुद्ध, परमशुद्ध, सात्त्विक आणि सत्य, आत्म नादचतन्यस्वरूप ओम् नादाचा उच्चार व त्याची नित्यनेमे साधना उरलेल्या चारही जीवनशैलींना विनासायास, सात्त्विक व परमशुद्ध करू लागते व साधक व्यक्तीची रोगाविरुद्ध लढण्याची देहमनाची प्रतिकारशक्ती वृिद्धगत होऊ लागते.
ओम्शक्ती, ओम्शक्ती, ओम्शक्ती,
साधनेने वाढते प्रतिकारशक्ती.
नित्यनेमे शास्त्रशुद्ध ओम्कार साधनेचे
महत्त्व आहे ते यासाठीच.
डॉ. जयंत करंदीकर -omomkarom@rediffmail.com
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2015 रोजी प्रकाशित
उच्चार जीवनशैली
आपल्या दैनंदिन जीवनात जीवनशैलीचा विचार करताना वैद्यकीय क्षेत्रात मुख्यत्वेकरून आहार, विहार, आचार, विचार या चार मुद्दय़ांचाच परामर्श घेतलेला आहे. जीवनशैलीच्या मुद्दय़ात उच्चाराचा संबंध सांगितला जात नाही;
First published on: 31-01-2015 at 01:54 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lifestyle