आजकाल कोणतीही गोष्ट सेलिब्रेट करण्याची प्रथा पडली आहे. कित्येक घरांमध्ये देव्हारा नसतो पण साग्रसंगीत बार असतो. सध्या समाजात दारूसारख्या गोष्टींना फार मोठय़ा प्रमाणात प्रतिष्ठा मिळाली आहे आणि आता पुरुषांप्रमाणे स्त्रियाही ‘ड्रिंक्स’ घेऊ लागल्या आहेत. लग्नाआधीच याविषयी मोकळा संवाद असेल तर नंतर पश्चात्तापाची वेळ येत नाही.
‘‘जितका मोठा प्रोजेक्ट तितकी मोठी पार्टी. म्हणजे कसं असतं नं, समजा मी आमच्या कंपनीतर्फे दुसऱ्या एका कंपनीचे काम करत असेन आणि तो प्रोजेक्ट संपला की ती कंपनी जितकी जास्त पसेवाली तितके जास्त पसे आमच्या पार्टीसाठी ती कंपनी देते आणि मग मोठी जंगी पार्टी असते. त्यासाठी बरीच तयारी केली जाते. या अशा पार्टीमध्ये मुली पण असतात. बरेचदा ती पार्टी उत्तररात्रीही चालते. आजकाल तर अनेकदा अशा पार्टीमध्ये मुलींना शुद्ध नसते. कंपनीचे ड्रायव्हर त्यांना रात्री कंपनीच्या गाडीतून सोडतात. त्यामुळे हल्ली मी कोणत्याही मुलीला भेटायला जातो तेव्हा ती िड्रक्स घेते का किंवा स्मोकिंग करते का हा प्रश्न आवर्जून विचारतो,’’  विनय सांगत होता.
खरोखरच सध्या समाजामध्ये दारू आणि सिगारेट्सचं व्यसन मोठय़ा प्रमाणात वाढलेलं दिसतं. अनेक जणांच्या आठवडय़ाची अखेर पार्टीशिवाय पूर्ण होत नाही. कंपनीमध्ये होणाऱ्या पाटर्य़ामध्ये हातात दारूचा ग्लास घ्यावाच लागतो, किंवा व्यवसाय असेल तर संबंधित लोकांना पाटर्य़ा दिल्याशिवाय ऑर्डर्स मिळत नाहीत, असाही समज रूढ झालेला दिसतो. कित्येक ऑफिसेसमध्ये स्मोकिंग झोन असतो. प्रत्येक तासानंतर मुलाप्रमाणेच मुलीही मनसोक्त धूम्रपानाचा ‘आस्वाद’ घेत असतात. व्यसन ही आता फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. स्त्रियाही त्यात मोठय़ा प्रमाणावर आघाडीवर असल्याचे दृश्य दिसते.
प्रश्न हा आहे की, लग्नाच्या संदर्भात व्यसनाचा मुद्दा येतो त्या वेळी हे ओळखायचे कसे?  वानगीदाखल एक उदाहरण पाहू या. मृणाल आणि संजय दोघे जण बाहेर कॉफी हाऊसमध्ये भेटले आहेत. वेळ संध्याकाळची. जरा जुजबी इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मृणाल म्हणाली, ‘‘तू िड्रक्स घेतोस का? आणि स्मोकिंगचं काय?’’
‘‘नाही स्मोकिंग तसं फारसं होत नाही, पण िड्रक्स मात्र होतात. पण मी बेसिकली पार्टी िड्रकर आहे. म्हणजे सोशल िड्रकर आहे. आणि तसं तर सगळं जग हल्ली िड्रक्स घेतं.’’ तो सहजपणे म्हणाला.  पण अशा वेळी तिने त्याची सोशल िड्रकिंगची व्याख्या विचारायला हवी. कारण दर आठवडय़ाला पिणाराही सोशल िड्रकर आणि फक्त ३१ डिसेंबरला पिणाराही सोशल िड्रकरच. त्याचप्रमाणे त्याचे पिण्याचे प्रमाण किती आहे? हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. आत्ता आपण फक्त अल्कोहोलच्या संदर्भात बोलतो आहोत पण गुटखा, तंबाखू, पान, मिश्री यासारख्या सवयीदेखील घातक आहेत. अनेकांना सकाळी तंबाखूसारखे काही तरी नसíगक विधींसाठी अवश्यक वाटते.
आजकाल कोणतीही गोष्ट सेलिब्रेट करण्याची प्रथा पडली आहे. कित्येक घरांमध्ये देव्हारा नसतो पण साग्रसंगीत बार असतो. सध्या समाजात दारूसारख्या गोष्टींना फार मोठय़ा प्रमाणात प्रतिष्ठा मिळाली आहे. कोणतीही ट्रिप किंवा बाहेरगावी जाणं हे पार्टीशिवाय अपुरं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यसनात पुढे कोण अडकणार हे लक्षात येत नाही. मनाने कमकुवत असणारी माणसं यामध्ये अडकण्याची शक्यता खूप जास्त असते, असं शास्त्र सांगतं. यातही इतके गसमज आहेत की, आश्चर्य वाटतं.
अभय आणि अर्चनाचं लग्न ठरलं होतं. एक दिवस दोघे जण बाहेर जेवायला गेले. सुरुवातीलाच अभयने बिअरची ऑर्डर दिली. अर्चना म्हणाली,  ‘‘बिअर? तू दारू पिणार आहेस?’’
‘‘वेडी आहेस का? अगं बिअर म्हणजे दारू नाही. तूसुद्धा घेऊन पाहा. मजा येते.’’
हा एक मोठा गरसमज आहे. सर्वप्रकारच्या बिअर, ताडी, माडी, रम, व्होडका, जीन, व्हिस्की, वाइन यात अल्कोहोल असतंच आणि त्याने प्रमाणानुसार नशा येतेच. पण बीअरला दारू न म्हणण्याची पुरुषांमध्ये फॅशन आहे. का ती तेच जाणोत!
लग्न करताना या सगळ्याची माहिती, त्यातलं ज्ञान, प्रत्येक मुलाला आणि मुलीला असणं आवश्यक आहे. व्यसन म्हणजे नेमकं काय, हेसुद्धा माहीत असायला हवं. दारूच्या व्यसनाला मानसिक आजार मानलं जातं. काही वर्षांपूर्वी मी पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात समुपदेशक म्हणून काम करीत होते. माझ्यासमोर आमचा रुग्ण मित्र जितू बसला होता. मला म्हणाला, ‘‘ व्यसन कसं लागलं कळलंच नाही. सुरुवात कॉलेजच्या दिवसांत झाली होती. तेव्हा खूप मजा वाटली होती.’’
खरंच आहे, आपण भानावर नसलो तर व्यसन कधी लागतं ते कळतच नाही. रोज रात्री नियमित दोन पेग पिणारी अनेक माणसं आहेत. रोज ठरावीक प्रमाणात दारू प्यायली तर तब्येतीला चांगलं असतं हाही गरसमज खूप मोठय़ा प्रमाणात समाजमनात आहे. लग्न ठरवताना िड्रक्स आणि सिगारेट्सच्या बाबतीत कसं आणि कधी विचारायचं हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. पहिल्या किंवा दुसऱ्या भेटीत हा प्रश्न नक्की विचारावा.
प्रथमेश आणि सुखदा आज दुसऱ्यांदा भेटत होते. बोलता बोलता सुखदाने त्याला विचारलं, ‘‘समजा तुम्हा मित्रांची पार्टी ठरली आहे आणि काही कारणाने ती रद्द झाली तर तुला काय वाटेल?’’
प्रथमेश म्हणाला, ‘‘छे छे पार्टी एकदा ठरली की ती व्हायलाच पाहिजे. मी दुसऱ्या कुणालातरी घेईन बरोबर, पण रद्द होणं काही बरोबर नाही.’’ अशा प्रसंगात सुखदासारखीने विचार करण्याची गरज आहे. अशा उदाहरणामध्ये अवलंबित्व दिसून येतं.
सुरेश नियमितपणे दारू घेत असे. त्याच्या आईला वाटलं, त्याचं लग्न केलं की जबाबदारी पडेल नि पोरगा आपोआप सुधारेल. म्हणून त्यांनी त्याचं लग्न केलं. पण लग्नामुळे दारू सुटल्याचं कोणतंही उदाहरण ऐकिवात नाही.
यासारख्या प्रसंगात, लग्नानंतर मुलगा सुधारेल यासाठी आई-वडिलांनी लग्न करून देण्याची चूक करू नये. व्यसनाच्या संदर्भात एक महत्त्वाचा गरसमज हा असतो की, त्या माणसाला वाटत असतं की, माझा माझ्यावर पूर्ण ताबा आहे. मी कोणत्याही क्षणी थांबवू शकतो. पण त्यामुळे हा नकाराचा आजार मानला जातो.
दीपंकर म्हणाला, ‘‘बॅचलर आहे म्हणून आत्ता जास्त घेतली जाते पण लग्न झालं की, नक्की कमी होईल.’’ अशांच्या बाबतीतही धोका जास्त असतो कारण एकटे राहायची वेळ कधी ना कधी तरी येणारच आहे, त्या वेळी काय?
एक दिवस विराज आला होता ऑफीसमध्ये. खासगी बोलायचं म्हणाला. म्हटलं बोल ना!
बहुतेक कुठून सुरुवात करावी कळत नव्हतं त्याला. चाचरतच बोलायला सुरुवात केली त्याने,‘‘रात्री अनेकदा वडील िड्रक्स घेऊन घरी यायचे. ते घरी आले मी खूप घाबरून जात असे. मी आमच्या पलंगाच्या खाली लपून बसत असे. रात्रभर जागा असे मी. त्यांना चालतासुद्धा येत नसे. ते आल्या आल्या झोपून जात असत, पण रात्री कधी तरी तीन-साडेतीन वाजता ते आईला हाका मारत सुटत. घरभर खूप वास सुटलेला असे. ते बाथरूममध्ये जाऊन आले की, जाववत नसे. आईला ते शिव्या देत असत. मी आणि माझा धाकटा भाऊ घट्ट आईला चिकटून बसत असू. एकदा आम्ही नवीन घरी राहायला गेलो होतो. त्या घरातला पहिलाच दिवस होता. रात्री आईने जेवायला साबुदाण्याची खिचडी आणि दही केले होते. शिफ्टिंगमुळे आईपण दमली होती. बाबा दिवसभर बाहेर होते. सामान हलवा हलवी मध्ये त्यांनी काहीच मदत केली नव्हती. पण खिचडीबरोबर काकडीची कोशिंबीर नाही म्हणून रागाने त्यांनी खिचडीची प्लेट भिरकावून दिली. नवीन घराच्या िभतीवर गरम साबुदाणा चिकटून बसला. तुपाचे डाग पडले. ..
विराजच्या डोळ्यासमोर जणू तो प्रसंग आत्ता घडत होता. तो म्हणाला, ‘‘आजकाल मुलीपण प्यायला लागल्या आहेत. इतकंच नाही तर त्या व्यसनाधीनही होतायत. माझी दुसरी कोणतीच अट नाही, पण मला पार्टी संस्कृतीमधली मुलगी नको.  ‘‘वडिलांच्या दारूमुळे अशा प्रकारचे परिणाम बालमनावर होत असतात, आणि ते आयुष्यभर पाठ सोडत नाहीत.
अनेकदा व्यसन म्हटलं की दारू, सिगारेट्स, तंबाखू हे आपल्या डोळ्यासमोर येतं, पण या व्यतिरिक्त चॅटिंगचं खूप जास्त प्रस्थ आहे. मोबाइलवर बोलणं, एस एम एस पाठवणं, फेस बुक, याहू मेसेंजरसारख्या त्या सोशल नेटवìकग साइटवर गप्पा मारणं याचंही व्यसन खूप मोठय़ा प्रमाणात बोकाळलं आहे..
पण त्याविषयी पुढच्या लेखात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा