योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सार्वजनिक जगण्यात आपल्याला किती तरी गोष्टी खटकत असतात. अनेक बाबतीत चुकीचं वागणाऱ्यांना एक सजग नागरिक म्हणून चांगला धडा शिकवावा, अशी सुप्त इच्छाही मनात असते; पण प्रत्यक्षात किती लोक अशा लोकांच्या तक्रारी नोंदवायला पुढे येतात? असं म्हटलं की, ‘कशाला ते विकतचं दुखणं! त्यापेक्षा चालू द्या जसं चालतंय तसं..’ अशीच आपली भावना होते. ‘त्या’नं मात्र याबद्दल थोडासा वेगळा विचार करून पाहिला आणि योग्य मुद्दय़ाचा आग्रह धरताना येणाऱ्या अनुभवांना तोंड द्यायची मनाची तयारीही केली.
त्या दिवशी सकाळी पोलीस चौकीच्या बाहेर असलेल्या बाकावर तो शांतपणे बसला होता. चाळिशी नुकतीच झाली असली तरी त्याचे केस बऱ्यापैकी पांढरे झाले होते. सकाळचं कोवळं ऊन त्याच्या अंगावर पसरलेलं होतं. वातावरण निवांत असलं तरी त्याच्या डोक्यात कमालीची खळबळ उडालेली होती; पण आज एक निर्णय पक्का करूनच तो तिथे आला होता.
तेवढय़ात बिल्डिंगमध्ये राहणारा त्याच्याच वयाचा त्याचा मित्र घाईघाईनं तिथे आला आणि म्हणाला, ‘‘अरे, तुझा फोनच लागत नाही. कधीपासून प्रयत्न करतोय.’’ त्यावर तो हसून म्हणाला, ‘‘मी बाहेर पडल्यावर घरून सारखे फोन येतच होते, म्हणून मीच शेवटी तो फ्लाइट मोडवर टाकला.’’
‘‘घरून तुला सारखे फोन येणार हे माहिती असूनही?..’’ मित्रानं त्याच्याकडे जरा रोखून बघत विचारलं.
‘‘हो! मी तक्रार करू नये यासाठी घरातले सगळे शेवटपर्यंत प्रयत्न करत आहेत. बघ ना, त्यासाठीच तर तूही इथपर्यंत आलास; पण मी माझा निर्णय बदलणार नाही. तक्रार तर मी देणार. इथले साहेब दहा मिनिटांत येतील. मग सगळी प्रक्रिया पूर्ण करीन.’’ तो निर्धारानं म्हणाला. त्यावर सुस्कारा सोडत मित्र म्हणाला, ‘‘अरे, आपल्या बिल्डिंगच्या समोरून ‘ट्रिपल सीट’ जाणारी कोण कुठली ती टारगट पोरं. त्या आजींना धडकून पळून गेली हे नक्कीच वाईट झालं; पण आजींना फार काही लागलं नाही हे चांगलंच झालं ना? हे बघ ‘ऑल वेल इफ इट एंडस् वेल’. त्या आजींचीही काही तक्रार नाहीये. असं असताना, तू लेखी तक्रार करावीस, आपल्या बिल्डिंगच्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेलं अपघाताचं फुटेज द्यावं हे काही मला पटत नाही. मुळात हा मुद्दा इतका मोठा आहे, असं मला तरी वाटत नाही.’’
त्यावर तो शांतपणे म्हणाला, ‘‘हा मुद्दा फार मोठा आहे म्हणून मी तक्रार करतो आहे, असं मी कधीच म्हटलेलं नाही. उलट मुद्दा मोठा होऊ नये यासाठी मी ही तक्रार नोंदवतो आहे.’’
‘‘म्हणजे?’’ मित्राच्या चेहऱ्यावर अपेक्षेप्रमाणेच एक भलंमोठं प्रश्नचिन्ह होतं. त्यावर तो म्हणाला, ‘‘मला एक सांग, तू म्हणतो आहेस तसा परवाच्या घटनेचा शेवट चांगला झाल्यावर आपल्या गल्लीतून बेफाम वेगानं गाडय़ा चालवणारे कमी झाले का? ‘ट्रिपल सीट’ फिरणारे आता आपल्याला दिसतच नाहीत का? फुटक्या सायलेन्सरच्या आवाजानं रात्री-अपरात्री आपली झोपमोड आता होतच नाही का? थोडक्यात, गेली काही र्वष आपले जे प्रश्न होते, ते अजून जसेच्या तसेच आहेत ना?’’
‘‘अरे पण, ते सगळे प्रश्न असे अचानक कसे काय गायब होतील?’’ मित्राला त्याच्या बोलण्याचा रोख समजत नव्हता. तेव्हा तो समजावणीच्या सुरात म्हणाला, ‘‘बरोबर! मग ते प्रश्न जर गायब झालेले नाहीत. तर त्याचाच अर्थ पुन्हा एकदा कोणत्या तरी आजी-आजोबांना धडक बसण्याची शक्यता आहे. एखादं लहान मूल सायकल चालवत असताना त्याला अपघात होण्याची शक्यता आहे. आपल्यालाही वाहन चालवताना धोका आहे. त्यातही सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की हे आजी-आजोबा किंवा ते लहान मूल हे तुझ्या किंवा माझ्या घरातलं निघालं तर तेव्हा तो आपल्यासाठी किती मोठा मुद्दा होईल? तसं होऊ नये म्हणून मी तक्रार नोंदवणार आहे.’’
त्यावर त्याची खिल्ली उडवत मित्र म्हणाला, ‘‘तुझ्या एकाच्या तक्रार देण्यानं असा काय फरक पडणार आहे?’’
‘‘काय फरक पडेल ते मला माहिती नाही; पण रस्ता आपल्या तीर्थरूपांचा आहे असं समजून वाटेल तशी वाहनं चालवणाऱ्या काही लोकांना तरी हे समजेल, की बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची लोक तक्रार करतात. मग त्यातून एखादा जरी सुधारला तरी चांगलंच आहे ना?’’ त्याच्याकडे उत्तर तयार होतं; पण ते ऐकून मित्र काळजीनं म्हणाला, ‘‘सीसीटीव्ही फुटेज तू दिल्यावर ती मुलं सापडतील. त्यांच्यावर थोडीफार कारवाईही होईल असं आपण धरून चालू; पण तुला या गोष्टीची कल्पना आहे का, की त्यानंतर ते सगळे तुझा पत्ता शोधत येतील.. तेव्हा काय करशील?’’
‘‘काही तरी भयंकर घडल्यावर आपण किंवा यंत्रणेनं त्यांचा पत्ता शोधत गल्लोगल्ली फिरण्यापेक्षा त्यांनी आपला पत्ता शोधला तर जास्त बरं आहे, अशी मी स्वत:ची समजूत करून घेतली आहे.’’ त्याच्याकडे मित्राच्या याही प्रश्नाचं उत्तर तयारच होतं. त्यावर नेमकं काय बोलावं हे न समजून मित्र काही वेळ गप्प राहिला. पण मग पुन्हा म्हणाला, ‘‘तुला आपल्याकडे गोष्टी कशा घडतात ते मी नव्यानं सांगायला हवंय का? आपल्याकडे तक्रार करणाऱ्याला कुणीही सुखानं जगू देत नाही. त्यात ते ‘ट्रिपल सीट’ फिरणारे लोक किती पोचलेले असतात हे आपल्याला माहिती नसतं. तेव्हा तू कुठे कुठे पुरा पडशील?’’
‘‘नाहीच पडणार. ते मला माहिती आहे. अगदी खरं सांगायचं तर अशी तक्रार आपण सर्वानी मिळून करायला हवी; पण असा विषय लोकांसमोर काढला, की निम्मे लोक पहिल्याच मिनिटाला, आमच्याकडे वयस्कर कुणी नाही किंवा लहान मूल नाही किंवा आम्ही वाहन चालवत नाही, अशी कारणं देतात. पायी चालायचं असेल तेव्हा आम्ही इमारतीच्या कुंपणाच्या आतच फेऱ्या मारतो, असंही सांगतात. त्याउलट काही लोक सगळे प्रश्न आपण आपल्याला सोईस्कर वाटेल अशा प्रकारे सोडवले पाहिजेत, असा पवित्रा घेतात. एका काकांनी मला आपण रात्री १० ते सकाळी ६ रस्त्यावर जाळ्या लावू, असा अजब उपायही सुचवला आणि जाळ्या लावण्यासाठी वेळ देण्याचीही तयारी दाखवली; पण तक्रार करायला माझ्याबरोबर चला, असं म्हटलं तर त्यांच्याकडे वेळ नव्हता. असं असल्यावर काय करणार?’’ तो स्पष्टपणे म्हणाला.
‘‘नेमकं काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे.’’ मित्र हताश होऊन म्हणाला. त्यावर तो म्हणाला, ‘‘तक्रार न करण्याची जी कारणं तू मला अप्रत्यक्षपणे सुचवतो आहेस, ती मला समजताहेत; पण मला एक गोष्ट सांग, आपल्यासाठी आपल्या व्यवस्थेनं जी यंत्रणा बनवलेली आहे त्या यंत्रणेकडे जाऊन तक्रार करताना आपण का घाबरतो? एखादी गोष्ट चुकीची होत असेल तर आपण त्याला ठणकावून चूक का नाही म्हणू शकत? हे किती मोठं अपयश आहे आणि हे अपयश नेमकं कोणाचं आहे? त्या यंत्रणेचं? त्या यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांचं? की फक्त बघत बसणाऱ्या आपल्यासारख्या लोकांचं?’’
‘‘काय माहिती!’’ असं म्हणून मित्रानं हात झटकले; पण त्याच्यासाठी विषय संपलेला नव्हता. तो म्हणाला, ‘‘बरं मला एक साधी गोष्ट सांग. मुळात तुला रीतसर तक्रार करणं, त्या प्रक्रियेतून जाणं, याचा काही अनुभव आहे का? की इतरांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकूनच तू या यंत्रणेबद्दल तुझं मत बनवलेलं आहेस?’’ त्यावर मित्र काहीसा चाचरत म्हणाला, ‘‘खरं सांगायचं तर मला या कशाचाही थेट अनुभव नाही; पण मी जे काही ऐकलंय त्यावरूनच म्हणतो आहे..’’
मित्राचं बोलणं अध्र्यात तोडत तो म्हणाला, ‘‘मग एकदा अनुभव घेऊन बघू. म्हणजे मीच तक्रार नोंदवतो; पण त्यानंतर काय काय होतं ते तू बारकाईनं बघ. एक प्रत्यक्ष अनुभव तुला निश्चित मिळेल. काय? ’’
‘‘मला नको ते अनुभव उगाच ओढूनताणून घेण्याची अजिबात हौस नाही. शिवाय तो अनुभव लोक सांगतात त्यापेक्षा फार वेगळा असेल असं मला वाटत नाही. फक्त इथे सारख्या फेऱ्या मारत राहाव्या लागतील.’’ मित्राला त्याचं बोलणं पटत नव्हतं.
पण तो ठामपणे म्हणाला, ‘‘एक गोष्ट निश्चित घडेल, ती म्हणजे या यंत्रणेबरोबर किमान संवाद तरी सुरू होईल. त्यांना आपल्या अडचणी नेमकेपणानं समजतील. कदाचित अशा अडचणी सोडवताना त्यांना नेमका कुठे त्रास होतो हे ते आपल्याला मोकळेपणानं सांगतील. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?’’
‘‘अडचणी समजणं आणि त्या समजल्यावर त्या सोडवण्यासाठी काम करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या इमारतीसमोरच्या रस्त्यावर जे होतं तेच बहुतेक रस्त्यांवर होत असतं; पण ते दिसत असून तुझी ही यंत्रणा कुठे काय करते?’’ मित्र त्याचा मुद्दा काही केल्या सोडत नव्हता.
‘‘यंत्रणा काहीच करत नाही, हे म्हणणं जरा चुकीचं होईल. कदाचित प्रश्नाच्या आवाक्यापुढे त्यांची ताकद कमी पडत असेल. शिवाय अनेक लोक, संस्था त्यांच्या परीनं यंत्रणेला मदत करतच असतात. तेव्हा आपणही, आपलं छोटंसं का असेना, पण एक पाऊल पुढे टाकू. शिवाय यंत्रणा ही माणसांनीच तयार झालेली आहे. त्यांच्याशी संवाद साधताना माणूस म्हणून संवाद साधू. काही तरी नक्कीच घडेल.’’ तो आत्मविश्वासानं म्हणाला.
त्यावर मित्र काहीही न बोलता उठून निघाला; पण चार पावलं टाकून थांबला आणि वळून म्हणाला, ‘‘या बाबतीत मी जो काही विचार करतोय तो तुला खरंच इतका चुकीचा वाटतो आहे?’’ हे ऐकून तोही आपल्या जागेवरून उठला आणि मित्रापाशी जात त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ‘‘अजिबात नाही. तू जो काही विचार करतो आहेस तो अजिबात चुकीचा नाही. फक्त प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं मी जे म्हणतो आहे ते थोडं जास्त बरोबर आहे. इतकंच माझं म्हणणं आहे.’’
त्यावर मित्र हसून म्हणाला, ‘‘मग ठीक आहे! ‘थोडं जास्त बरोबर’ असण्याबद्दल जर तुला खरोखर इतका विश्वास असेल तर मग बघू या काय होतंय ते. दोघं मिळून तक्रार करू. मग मला जे वाटतं तेही मला पडताळून बघता येईल आणि ते चुकीचं ठरलं तर त्याचा पूर्ण आनंदही अनुभवता येईल.’’