संगणक शिक्षण घ्यावे, अशी खूप इच्छा होती, पण आता वयाची सत्तरी उलटल्यावर हे शक्य होईल काय, असं वाटायचं. पण तरीही मनाच्या हिय्या करून एका क्लासमध्ये प्रवेश घेतला. पहिल्या दिवशी वर्गात प्रवेश
पहिले दोन दिवस थिअरी व संगणक दुरून पाहण्यात गेले. तिसऱ्या दिवशी सरांनी ३/४ विद्यार्थ्यांचे गट करून संगणकावर सराव करण्यास सांगितले. मी मात्र माझ्या गटातील तरुणाईला प्राधान्य देऊन साळसूदपणे मागे राहिले. कारण मनात भीती. न जाणे कोणती तरी की दाबल्याने संगणक बंद पडला तर! मोडला तर? त्यातील माहिती ‘इरेझ’ झाली तर! प्रश्नच प्रश्न!
माझी ही चलाखी आमच्या त्या सरांनी ओळखली आणि म्हणाले, ‘अहो, परीक्षा ऑनलाइन असते. बी अ कम्प्युटर सॅव्ही. मग मात्र मी कंबर कसली. घरातील संगणकावर (ज्याकडे आजवर कटाक्षही टाकला नव्हता.) सराव करायचं ठरवलं. संगणकासमोर बसले. की-बोर्ड पाहिला. पहिल्या रांगेत फंक्शनसाठी कीज् होत्या. १/ २ नाही तर चक्क १ डझन. डझनभर फंक्शन्स बाप रे! टायपिंग करावं म्हटलं तर की-बोर्डवरच्या अक्षरांचा गोंधळ काही विचारू नका. ‘अ’ प्रथम क्रमांकाला हवा ना! पण त्याला दुसऱ्या रांगेत ढकलून तिथे ‘द’ स्थानापन्न झालेला. ‘ढ’च्या आधीच ‘फ’ प्रकटलेला. साधा ‘And’ शब्द टाइप करायला जेवढा वेळ लागला तेवढय़ा वेळात मी तो पन्नास वेळा लिहाला असता. बाकीचे गोंधळ विचारू नकाच. insert च्या वेळी Delete दाबले जाई तर ‘Page upload Page download’ हे नेमके विरुद्धपणे वापरले जाई. अगदी हताश झाले, पण वयानुसार वाढणारा हट्टीपणा आडवा आला. म्हटले, ‘शेंडी तुटो वा पारंबी’ प्रयत्न सोडायचा नाही. मग संगणकाचे पुस्तक, सीडी वगैरे ऐवज गोळा केला. सरावाचा धडाका लागला, मग मात्र की-बोर्डची अक्षरेही सापडू लागली. संगणकाशी मैत्री झाली.
आणि परीक्षेचा दिवस उगवला. माझ्यासाठी तो होता, अटीतटीचा दिवस. परीक्षा ऑनलाइन. शेवटी फुलांचा फ्लॉवरपॉट आला की पास हा संकेत होता. सर्व प्रश्न सोडवले. पुन:पुन्हा तपासले. अखेर स्क्रीनवर फ्लॉवरपॉट आला. गुणही ७४/ १०० मिळाले. मी म्हटलं Yes I can.
आता मी इमेलही करते आणि इंटरनेट सर्फिगही. आता रोजचा दिवस उजाडतो तो वेगळाच आत्मविश्वास घेऊ
.. आणि कीबोर्डशी मैत्री झाली
संगणक शिक्षण घ्यावे, अशी खूप इच्छा होती, पण आता वयाची सत्तरी उलटल्यावर हे शक्य होईल काय, असं वाटायचं. पण तरीही मनाच्या हिय्या करून
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-01-2014 at 06:09 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: And frandship develops with key board