स्त्री अभ्यास, स्त्रीवाद आणि विकलांगता या विषयांत मूलभूत संशोधन करणाऱ्या ज्येष्ठ स्त्रीवादी अभ्यासक आणि कार्यकर्त्या डॉ. अनिता घई. स्त्री चळवळीने विकलांग स्त्रियांना वगळले, असं सांगत त्यांनी अशा स्त्रियांच्या अनुभवांच्या केंद्रीकरणाची गरज व्यक्त केली. तसेच विकलांगता ही व्यक्तींच्या शरीरात वसलेली नसून, ती समाजाने निर्माण केलेली असते, अशी त्यांच्या अभ्यासाची मांडणी होती. डॉ. अनिता घई यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्त्रीवादी विचारांतील योगदानाचा हा ढोबळ आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्येष्ठ स्त्रीवादी अभ्यासक आणि कार्यकर्त्या डॉ. अनिता घई यांचे नुकतेच ( ११ डिसेंबर २०२४) निधन झाले. स्त्री अभ्यास, स्त्रीवाद आणि विकलांगता यांच्या संदर्भात मूलभूत मांडणी करणाऱ्या संशोधक म्हणून त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

अनिता घई या दिल्लीतील ‘जिझस अँड मेरी’ महाविद्यालयात मानसशास्त्राच्या अध्यापक होत्या, नंतर त्यांनी दिल्लीतील ‘आंबेडकर विद्यापीठा’तदेखील अध्यापनाचे काम केले होते. भारतातील स्त्रीविषयक अभ्यासासाठीच्या राष्ट्र पातळीवरील संघटनेच्या (Indian Association of Women’s Studies) त्या अध्यक्ष होत्या. त्यांनी ‘Disability in South Asia: Knowledge and Experience’ आणि ‘Rethinking Disability in India’ सारखे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत. अर्थात त्या विकलांगतेच्या अभ्यासक होत्या, हे म्हणणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. मराठी भाषेत आपल्याकडे अजून ‘disability’ या संकल्पनेसाठी चांगले पर्यायी शब्द विकसित झालेले नाहीत. अर्थात हा फक्त भाषेचा दोष किंवा मर्यादा नसून, त्याबाबतचा ज्ञान व्यवहार विकसित झाला नसल्याचे द्याोतक आहे. हा ज्ञान व्यवहार विकसित करण्यामध्ये अनिता घई यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.

हेही वाचा – पडसाद : गृहिणीकडे स्वमर्जीने खर्च करण्यासाठी निधी हवाच

भारतात विकलांगताविषयक चिकित्सक मांडणी करणाऱ्या मोजक्या अभ्यासकांपैकी त्या होत्या. त्यांनी या संदर्भात मांडणी करणारी पुस्तके लिहिली, या विचार विश्वासाचा विकास करण्यासाठी अकादमिक नियतकालिके सुरू केली, अभ्यासक्रमांमध्ये या विषयांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले. एका अर्थाने अभ्यास, अध्ययन, संशोधन, बदलासाठी हस्तक्षेपी काम या सर्वांना एकत्र पद्धतीने करणाऱ्या त्या व्यक्ती होत्या.

‘Able- bodied ’ आणि ‘disabled ’ म्हणजेच विकलांगता नसलेले आणि असलेले अशा द्वैतात, म्हणजेच आपल्यासारखे आणि इतर अशा दृष्टिकोनातून शरीरांकडे बघणे हे फसवे आहे. कुठलेच शरीर नेहमीसाठी able- bodied नसते, तर केवळ ‘temporarily able- bodied’ असते, म्हणजेच केवळ या क्षणापुरते विकलांगतामुक्त असते. अपघात, दुखापत यामुळे कोणीही कधीही विकलांग बनू शकते. म्हणून आपण त्याचा विचार द्वैतात न करता, एक शृंखलेसारखा केला पाहिजे, अशी आपल्या चौकटींना उलथवून टाकणारी मांडणी त्या सातत्याने करीत राहिल्या. विकलांगता ही व्यक्तींच्या शरीरात वसलेली नसून, ती समाजाने निर्माण केलेली असते अशी मांडणीही त्यांनी केली. म्हणजेच समाजाने प्रमाण/सामान्य शरीर म्हणजे काय याची एक व्याख्या ठरवून घेतली आहे आणि त्या व्याख्येपेक्षा वेगळं शरीर हे विकलांग ठरवले जाते. पण अनिता घई आणि त्यांच्यासारख्या विकलांगताविषयक अध्ययन करणाऱ्या अभ्यासकांचे असे म्हणणे होते की, सर्व प्रकारच्या शरीरांचा विचार आपला समाज बांधताना करत नाही, त्यामुळे प्रमाण व्याख्येत न बसणारी / वेगळी असलेली शरीरे दैनंदिन अवकाशात वावरू शकत नाहीत, आणि विकलांग ठरतात. उदाहरणार्थ जर सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये, वर्गांमध्ये, आपण तोंडी भाषा आणि दृक् -श्राव्य माध्यमाबरोबरच ब्रेल (braille), चिन्हांची भाषा(sign language) यांचा वापर सातत्याने / नियमित केल्यास, सर्व प्रकारची शरीरे शिक्षणापर्यंत समान पद्धतीने पोहचू शकतील. म्हणजेच आपल्या वर्गांच्या रचनेतून विकलांगता निर्माण केली जाते, ती विकलांगता ही त्या व्यक्तींच्या शरीरात स्थित नसते. म्हणून विकलांगता ही सामाजिक असते, वैयक्तिक नसते अशी मांडणी अनिता घई या सातत्याने करीत होत्या. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण विकलांगतेच्या शृंखलेत कुठेतरी विणलेला असतो आणि हे ओळखून त्या बिंदूपासून विकलांगता समजून घेण्यास सुरुवात केली पाहिजे, असा त्यांचा अट्टहास होता.

स्वत: दिव्यांग असणाऱ्या अनिता घई यांनी ही मांडणी केवळ सैद्धांतिक पातळीवर न ठेवता, ती आपल्या दैनंदिन व्यवहारातसुद्धा उतरवली. आपल्या बॅटरीवर चालणाऱ्या व्हीलचेअरमध्ये बसून त्या स्त्री अभ्यासाच्या अनेक परिसंवाद, परिषदांमध्ये सातत्याने आणि सहज फिरत असत आणि स्वत:ला able- bodied अर्थात सक्षम शरीर मानणाऱ्या लोकांना मागे टाकत. काही वर्षांपूर्वी आम्ही त्यांना जेव्हा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त व्याख्यान देण्यासाठी बोलावले होते, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की, त्या अशा कुठल्याही ठिकाणी जाणार नाहीत, जिथे त्या स्वत: जाऊ शकत नाहीत. या कार्यक्रमाची तयारी करत असताना आणि त्यानिमित्ताने विद्यापीठातील वास्तू आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेताना आमच्या लक्षात आले, की आपल्याकडे या संबंधीचा विचार किती अपुरा आणि त्रोटक आहे. तसेच याबाबत काही प्रमाणात सुविधांच्या निर्मितीसाठी सक्ती झाली असली, तरी त्यात मूलभूत विचार बदललेला नाही. पायाभूत सुविधा निर्माण करताना त्याच्या केंद्रस्थानी समाजातील विविध लोकांना त्यांचा लाभ घेता येईल आणि त्यांना दिलेले लोकशाही हक्क उपभोगता येतील हा विचार अजूनही तितकासा रुजलेला दिसत नाही. उदा. – दिव्यांगांना सोयीचे रस्ते, पायऱ्यांऐवजी स्लोप वा सार्वजनिक प्रसाधनांमधली सोय.

अनिता यांच्या लिखाणातून आणखी महत्त्वाचा एका मुद्दा पुढे येत राहिला तो होता, ‘विकलांगता असलेल्या स्त्रिया’ आणि ‘स्त्री चळवळ’ यांच्यातील संबंध. ‘स्त्री चळवळ’ आणि ‘विकलांग हक्कांची चळवळ’ या दोन्ही चळवळींनी विकलांग असणाऱ्या स्त्रियांच्या समस्यांचा विचार केलेला नाही. विशेषत: स्त्री चळवळीने विकलांग स्त्रियांना वगळले आहे, विकलांगता आणि लिंगभाव यांच्या परस्परपूरकतेचा गांभीर्याने विचार केला नाहीये, आणि एकूणच स्त्रीवादी सिद्धांकन (Feminist theory) आणि व्यवहार हा ableist म्हणजेच प्रमाण शरीराला केंद्रस्थानी ठेवणाराच राहिला आहे, अशी मांडणी अनिता घई यांनी केली. त्याचबरोबर, स्त्रीवादी चळवळींनी हे मुद्दे घेणे का महत्त्वाचे आहे हेही अधोरेखित केले. यात केवळ विकलांग स्त्रियांना ‘सामावून’ घेणे हा मुद्दा नव्हता, तर त्यांच्या अनुभवांच्या केंद्रीकरणातून एकूणच स्त्रीवादी राजकारणाचा पोत कसा बदलू शकतो, याकडे घई निर्देशन करीत होत्या.

अनिता घई यांच्या अनेक महत्त्वाच्या संकल्पनांपैकी एक होती – male stare. ब्रिटिश स्त्रीवादी चित्रपट निर्मात्या लॉरा मलव्हे ( Laura Mulvey) यांनी मांडलेल्या ‘male gaze’ या संकल्पनेला विकलांग स्त्रियांच्या शरीरावरील असणाऱ्या नजरेच्या संदर्भात पुनर्सिद्धांकित करीत घई यांनी असे मांडले की, जरी पुरुषी नजर ही वस्तुकरण (objectification) करणारी असली, तर त्यात स्त्रीचे शरीर हे आसक्ती आणि लैंगिकतेचे स्थान म्हणून बघितले जाते. मात्र विकलांग स्त्रीच्या शरीरावर असलेली नजर ही त्या शरीराचे वास्तुकीकरण तर करतेच, पण त्याला फक्त तिटकारा आणि किळस या चौकटीतूनच बघते. त्यामुळे विकलांग स्त्रिया या लैंगिकता विरहित, दयेच्या वाटेकरी म्हणून प्रस्तुत केल्या जातात. त्यांच्या या मांडणीमधून विकलांगता असलेल्या स्त्रिया केवळ उपेक्षित, शोषित, हिंसेच्या बळी नसून, एक पूर्ण माणूस आहेत, ज्यांना इच्छा-आकांक्षा, कर्तेपणा आणि जिजीविषा आहे हे ठळक झाले आणि हे त्यांचे स्त्रीवादी चळवळी आणि स्त्री अभ्यासाला दिलेले खूप मोठे योगदान आहे.

हेही वाचा – ‘भय’भूती : भीतिध्वनी

जरी भौतिक वावराच्या संदर्भात त्यांच्यासाठी स्वावलंबन आणि स्वायत्तता ही मूल्ये अतिशय महत्त्वाची होती, तरी स्त्रीवादी चळवळीतील आपल्या मैत्रिणींना त्या नेहमीच सांगत असत की, स्वायत्तता हे मूल्य व्यक्तिकेंद्री आहे आणि म्हणून स्त्रीवादी भविष्याची कल्पना ही या मूल्यावर आधारित असू शकत नाही. याउलट स्त्रीवादी चळवळींना अधिक मजबूत करायचे असेल तर ‘परस्पर अवलंबित्व’ आणि ‘परस्परपूरकता’ ही मूल्ये जपणे आणि संवर्धित करणे गरजेचे आहे. यासाठी विकलांग असलेल्या आणि या क्षणाला विकलांगतामुक्त असलेल्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे, विकलांगतेचा मुद्दा हा केवळ विकलांग असणाऱ्या लोकांचा प्रश्न नसून, सर्वांचा मुद्दा आहे हे रुजले पाहिजे अशी त्यांची मांडणी होती.
त्यांच्या या आणि अशा अनेक सैद्धांतिक योगदानाबरोबर लक्षात राहील तो म्हणजे त्यांचा अखंड हसरा चेहरा, त्यांचा सळसळणारा उत्साह, विकलांगतेच्या मुद्द्यासंबंधी त्यांची तळमळ, त्याविषयी लोकांच्या अज्ञानाला त्यांनी दिलेली स्पष्ट, परखड तरीही प्रेमळ समज आणि सतत हे मुद्दे पुढे रेटत राहण्याप्रतिची त्यांची निष्ठा. ज्ञानव्यवहार आणि चळवळीच्या राजकारणामध्ये विकालांगतेच्या प्रश्नाला केंद्रस्थानी आणून, स्त्रीवादी राजकारणाचा आणि सिद्धांकनाचा चेहरा बदलण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या अनिता घईंना अखेरचा स्त्रीवादी सलाम!

(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभागात सहायक प्राध्यापक आहेत)

gole.sneha@gmail.com