हरभरे खरोखरीच अतिशय पौष्टिक, भरपूर प्रथिनयुक्त आणि त्यामुळे पचायला थोडे जडच असतात. भरपूर फायबर, लोह,
फॉस्फरस, फॉलेट आणि मॅग्नेशियम असलेले हरभरे लगेच ऊर्जा देतात. रक्तातील साखर आटोक्यात ठेवतात.
स्त्रियांच्या आरोग्यासाठी चांगले समजले जातात. हिरवे, लाल हरभरे, पांढरे छोले तसेच चण्याची डाळ चवीला चांगली लागत असल्याने यापासून अनेक गोड-तिखट पदार्थ बनवले जातात. गूळ आणि चणे रोजची लोहाची गरज भागवतात. हरभऱ्याच्या पानातही भरपूर खनिजांचा
साठा असतो.
गोड छोले
साहित्य : १ वाटी छोले (काबुली चणे), १ मोठा चमचा चणाडाळ, पाऊण वाटी गूळ, १ वाटी ओलं खोबरं, ४-५ लवंगा, १ चमचा वेलची पावडर, १ मोठा चमचा तूप.
कृती : काबुली चणे रात्रभर भिजत घालावे आणि सकाळी कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावे. शिजताना त्यात चणाडाळही घालावी. छोल्यातील पाणी निथळून बाजूला काढावं. तूप गरम करून त्यात लवंगा घालाव्या. त्या तडतडल्या की त्यात खोबरं आणि गूळ घालून परतावं, गूळ विरघळला की त्यात शिजलेले छोले, वेलची पावडर घालून थोडा वेळ शिजू द्यावं.
निथळून काढलेल्या पाण्यात ताक, चवीला मीठ, थोडी लवंगपूड घालून चांगलं पेयंही तयार होतं.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा